अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा सीईटी, नीट आणि जेईई सारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी भाजपकडून एक अभिनय उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षांसाठी योग्य प्रकारे सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. "ऑनलाइन मॉक टेस्ट पेपर सिरियल सेट" हा उपक्रम भाजप प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी मोफत सुरू केला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच याच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
Read More
भाजपच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले आणि शरद कांबळे यांचे आवाहन
धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागामध्ये कठोर निर्बंधकाळात ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या संचालिका व भाजपच्या युवा नेत्या दिव्या ढोले नागरिकांच्या मदतीला दिवसरात्र न बघता तत्परतेने धावून गेल्या. या काळात उल्लेखनीय मदतकार्य करत त्यांनी येथील नागरिकांच्या मनात आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविला. त्यानिमित्ताने ‘कोविड योद्धा देवदूत’ ठरलेल्या दिव्या ढोले यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सचिव दिव्या ढोले यांनी कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागलेल्या अडचणींवर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. दरम्यान, “मुंबई महापालिका प्रशासनाच्या शिक्षण विभागाने शहरातील नागरी आणि अनुदानित शाळांना जी मुलं खासगी शाळा सोडून इयत्ता पहिली ते दहावीच्या प्रवेशासाठी सरकारी शाळांमध्ये येत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सोडण्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नसले, तरीही नागरी व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत,“ असे दिव्या ढोले यांनी म्
शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुलभरीत्या प्रवेश देण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयामध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करून त्यांना राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्वतंत्र पोर्टलद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या समोर काही मुजोर शिक्षणसंस्था आणि संस्थाचालकांमुळे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोनामुळे खालावलेली आर्थिक किंवा इतर कारणांमुळे ज्यांचे शालेय शुल्क बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आले आहेत.