अहेरी विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी अजित पवारांनी धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिली असून शरद पवार गटाकडून त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना तिकीट देण्यात आले आहे.
Read More
(Aheri Vidhansabha) अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अहेरीत यंदा बापलेकीत सामना रंगणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, अहेरी विधानसभेचं राजकीय समीकरण काय आहे? ते या व्हिडीओतून जाणून घेऊया.
विजय वडेट्टीवार हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे राईट हँड असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा गौप्यस्फोट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. तसेच यासंदर्भातील चर्चेत आपण उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी चर्चा करताना त्यांनी हा खुलासा केला.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. जयंत पाटीलांच्या दाव्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत, असं मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी म्हटलं आहे.
नागरिकांचे आरोग्य व जनहित विचारात घेवून नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.