जंगलातील हत्यार घेतलेले नक्षलवादी आणि त्या नक्षलवाद्यांनी शस्त्र कुणाविरोधात कुठे कधी वापरावे याचे नियोजन करणारे, त्या नक्षलवाद्यांना सर्वस्तराचे समर्थन मिळवून देणारे शहरी नक्षलवादीही या देशाचे शत्रूच. युद्धात झालेल्या मनुष्यहानीपेक्षा नक्षलवाद्यांनी केलेली मनुष्यहत्या गंभीर आहे. मात्र, केंद्र सरकारच्या विशेष कारवाईमुळे आणि राज्याच्या विशेष समन्वयामुळे, ठिकठिकाणी नक्षली आत्मसमर्पण करत आहेत. त्या अनुषंगाने नक्षलग्रस्त परिसर आणि तेथील वास्तवाचा घेतलेला मागोवा...
Read More
“शहरी नक्षलवादी चळवळी संविधानविरोधी असून लोकशाही व्यवस्थेविरुद्ध जहाल विचार पसरवण्याचे काम करतात. त्यामुळे अशा फुटीरतावादी प्रवृत्तींना रोखण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आवश्यक आहे,” असे विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी स्पष्ट केले.
एका शिक्षकाला कॉपी पकडल्यामुळे एका खोट्या गुन्ह्यात तब्बल ११ वर्ष आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. केरळच्या थोडुपुझा अतिरिक्त सत्र न्यायालयाने नुकतेच ११ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर या प्राध्यापकांना निर्दोष मुक्त केले आहे. जंगलात बंदुकीच्या आधारे लढणारे नक्षलवादी आता सुटबूट घालून शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याविरुद्ध एका कार्यकर्त्याने केलेले अपमानजनक विधान हे हिंदू धार्मिक स्थळांना बदनाम करण्याच्या शहरी नक्षलवाद्यांच्या मोहिमेचा एक भाग असल्याचे, बेलथंगडीचे आमदार हरीश पुंजा यांनी रविवारी दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सांगितले.
अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलांसारखे वागत नाहीत, त्यामुळे तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. शनिवारी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन लक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केला आहे.
देशात नक्षलवाद्यांनी जंगलांमध्येच नव्हे, तर शहरांमध्येही पाय रोवण्याचा मोठा डाव रचला होता. अगदी आतापर्यंत शहरी नक्षल तंत्र इतके बळकट झाले होते की त्यांनी वैचारिक क्षेत्रावरही दहशत माजवली होती. लिहायचे तेच जे त्यांनी सांगितले, बोलायचे तेच जे त्यांनी मंजूर केले आणि ऐकायचे तेच जे त्यांच्या प्रचारातून आले, असा एक प्रकारचा दबाव समाजावर टाकला जात होता.
Naxalism “जंगलातून माओवादी हद्दपार होत असले तरी शहरी नक्षलवाद्यांचा धोका अजूनही कायम आहे,” असे विधान नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानिमित्ताने शहरी नक्षलवाद्यांची समाजात खोलवर विषपेरणी करणारी कार्यशैली आणि राष्ट्रविरोधी षड्यंत्रे उलगडणारा हा लेख...
दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला
"भारताच्या विकासामुळे आता काही जणांना अडचण निर्माण झाली आहे. केवळ राजकारणासाठी आणि स्व:ताचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काही लोक देशाच्या एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत"असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अर्बन नक्षलवाद्यांच्या विरोधात आपल्याला आता लढायचे आहे असा संदेश मोदींनी दिला. राष्ट्रीय एकत्मता दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी गुजरात मधल्या केवाडीया येथे बोलत होते.
कोरेगाव भीमा येथील २०१८ सालेल्या हिंसाचारातील आरोपी आणि संशयित नक्षलवादी वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष मुक्त करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. जी. एन. साईबाबावर दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप असून, त्याला नक्षल चळवळीचा ‘मास्टर माईंड’ असेच संबोधले जाते. त्यानिमित्ताने जी. एन. साईबाबा आणि एकंदर ‘शहरी नक्षलवाद’ याचा मागोवा घेणारा हा लेख...
“सरदार सरोवर प्रकल्पाची पायाभरणी देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी केली. मात्र, तो प्रकल्प माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला. या प्रकल्पात अडथळा आणून भारताचा विकास रोखण्यासाठी शहरी नक्षलवादी दीर्घकाळ सक्रिय होते. हे विकासविरोधी घटक आजही सक्रिय असून त्यांचा बिमोड करणे गरजेचे आहे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला.
पुण्यातील एल्गार परिषद प्रकारांतील प्रमुख आरोपी अर्बन नक्षल गौतम नवलाखाला तुरुंगातून फोन तसेच व्हिडिओ कॉल करण्यास परवानगी देता येणार नाही असे राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा प्रमुख नेता असलेल्या श्रीधर श्रीनिवासन याच्या स्मरणार्थ घेतलेल्या सभेत सहभागी झाल्याची साक्ष कोरेगाव-भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या हर्षाली पोतदारने दिली आहे. ११ आणि १२ जुलै रोजी झालेल्या कोरेगाव-भीमा आयोगाच्या मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरील चौकशीवेळी पोतदार हिने साक्ष दिली आहे.
संशयित नक्षलवादी आणि कथित कवी, सामाजिक कार्यकर्ता वरवरा राव याचा कायमस्वरूपी जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्याचप्रमाणे राव यास मुंबई सोडून जाण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी राज्यसभेत बोलत होते. या भाषणातून त्यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ले केले
मिलिंद तेलतुंबडेचा ‘जनयोद्धा’ असा उल्लेख करत नक्षलवाद्यांनी त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकी दिली आहे. गेल्या आठवड्यात गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर नक्षलवाद्यांनी मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख ’जनयोद्धा’ असे करत त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे पत्रक जारी केले आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून सहा राज्यात ‘बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.
मिलिंद तेलतुंबडे हा शेकडो वनवासींच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेला कुख्यात माओवादी होता. त्यामुळे ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमावर्ती भागातील माओवादी संघटनेच्या प्रभुत्वाला एक मोठा धक्का आहे. मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा झाल्याने माओवादी संघटनेवर काय परिणाम होतील, हे समजून घ्यायचे असेल, तर त्याची माओवादी संघटनेत काय भूमिका राहिलेली आहे, हे समजून घ्यावे लागेल.
मी माझी लढाई पूर्णपणे लढलो आहे. माझा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि त्यात ईमानदार राहीलो आहे", 'श्रद्धेय फादर स्टॅन स्वामी भावपूर्ण श्रद्धांजली' हे आम्ही म्हणत नाही तर शिवसेनेच्या ख्रिश्चन आघाडी, जळगाव तर्फे बॅनर लावण्यात आलेले आहे. फादर स्टॅन स्वामीच्या कारागृहातील मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर, अशा प्रकाराचा आशय आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून टीकेचा सामना करावा लागत आहे.
फादर स्टॅन स्वामींवर सरकारी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात आली होती. पण आपल्या मस्तवालपणापायी त्यांनी ते नाकारले आणि ‘होली फॅमिली’ रुग्णालयाची निवड केली व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मोदीद्वेषाची विकृती डोक्यात भरलेल्या संजय राऊतांनी लबाडी करत त्याचा उल्लेखही केला नाही व त्याच्या मृत्यूला हत्या ठरवले. त्यावरून राऊतांना शिवसेनेतला शहरी माओवादी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तुम्हाला खुले पत्र लिहीतोय चेहरेही पाहून घ्या म्हणत थेट इशारा दोन दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला पत्र लिहून मतलबी राजकारण्यांपासून सावध रहा, असा सल्ला दिला होता. त्यावर राजकारण सुरू असताना आता मराठा समाजाकडून सुद्धा नक्षलवाद्यांना खुल पत्र लिहिण्यात आले आहे. मराठा समाजाला नक्षलवाद्यांचा फुकटचा सल्ला नको, म्हणत मराठा युवा संघाने नक्षलवाद्यांना कठोर शब्दात उत्तर दिले आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण आणि नक्षलींशी संबंध असल्याच्या आरोपात अटक असलेल्या आनंद तेलतुंबडे यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.
१०-१२ दिवसांपूर्वी पालघरला घडलेल्या साधूंच्या हत्येने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा देश हादरून गेला. तीन असहाय्य जीव घेण्याची ही निर्घृण वृत्ती पाहून प्रत्येक संवेदनशील मन सुन्न झालं. एका अत्यंत वयोवृद्ध माणसावर हात उचलण्याची क्रूर आणि पाशवी वृती आणि बुद्धी या जमावामध्ये आली कुठून असा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडला असणार आहे. आपल्या कृतीवर बहुतांश वेळा आपल्या विचारांचा प्रभाव असतो, आणि आपले विचार आपण समोर ठेवलेल्या आदर्शांप्रमाणे पक्के होत असतात. या जमावासमोर नेमका कोणता आदर्श असेल म्हणून त्यांना हे कृत्
दीड वर्षे अटकेला गुंगारा : सर्वोच्च न्यायालयानेच दिले शरणागती पत्करण्याचे आदेश
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा घणाघातमुंबई : शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारांच्या व्यक्तिंकडून 'सीएए' आणि 'एनआरसी'सारख्या विषयांवर देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुस्लिम आरक्षण हा देखील मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पाटील म्हणाले की, "सीएएमुळे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होण
कोरेगाव भीमा-प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी हजर रहावे लागणार.सोमवारी याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शरद पवार यांनाही साक्षीसाठी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
शरद पवारांनी ‘शहरी नक्षलवाद’ शब्दाच्या वापरालाही विरोध केला. परंतु, शहरी नक्षलवादप्रकरणी गाडले गेलेले वास्तव पुन्हा एकदा उजेडात आले आणि शरद पवारांच्या डबल ढोलकी, विघातक राजकारणाची साक्ष देऊ लागले.
नागरिकांच्या सुरक्षेची जितकी जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची आहे, तितकीच ती खुद्द नागरिकांचीही आहे. त्यामुळे सरत्या वर्षातील घटनांमधून धडा घेऊन नागरिकांनी आपल्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यासाठी काय करता येईल, याची माहिती देणारा हा लेख...
हिंसा, एनआरसी, मुस्लिम, विरोधकी आणि शहरी नक्षलवादी मोदींकडून प्रत्येक गोष्ट स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील गृहखात्याचे मंत्री असलेल्या आर. आर. पाटील यांनी सुधीर ढवळेला बेड्या ठोकल्या, तेव्हा शरद पवार झोपले होते काय? आणि आता झोपेतून जागे झालेल्या पवारांना आता हे सगळेच देशविरोधी लोक अनुसूचित जाती-जमाती, वंचित, शोषितांसाठी काम करणार्या प्रेषितासारखे वाटतात. असे का? कारण देश तोडण्याच्या कामात अडकलेल्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने वेसण घातले व फडणवीसांचे नाव आले की, पवारांना जातीयवादाची खुमखुमी येते.
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा विचार करताना सामान्य दलित कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत. त्यानिमित्ताने नक्षल्यांना प्रत्यक्ष हिंसाचाराच्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून मात्र आपण सजग असले पाहिजे. संवेदनशील भागात पोलिसांच्या, सशस्त्र दलाच्या जवानांच्या हिंसाचारात गुंतलेल्या आरोपींचा त्यात विचार करणे दलित चळवळीचा अपमान ठरेल.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदविण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात नियमित हजर राहण्याचे निर्देश राज्य सरकारतर्फे देण्यात यावेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. सरकारी पक्षाने तसा रितसर अर्ज दाखल करण्यासही न्यायालयाने सांगितले. दरम्यान, आज दुपारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
नक्षलवादी कारवायात सहभागी वकिलाचा जामीन फेटाळला
१९६७ मध्ये इंदिरा गांधी यांनीच हे विधेयक आणलं होतं, असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मुंबईसह अन्य मोठ्या शहरांत विशेषतः पुण्यात पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणारे अनेक डावे कंपू कार्यरत आहेत. प्रत्यक्षात या गटातल्या मंडळींचे धागेदोरे थेट हिंसक अशा नक्षलवादी, माओवादी, जहाल-अतिडाव्या संघटनांपर्यंत 'फ्रंटल ऑर्गनायझेशन'च्या रूपाने पोहोचलेले असतात आणि आताच्या संतोष शेलार आणि प्रशांत कांबळेसंबंधीच्या वृत्ताने हीच बाब अधोरेखित झाली.
नक्षलवादाची समस्या सोडविण्याचा मार्ग विकासाची प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करणे आणि कोणतीही दयामाया न दाखवता नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणे, हाच आहे. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत हाच मार्ग अवलंबला आणि काटेकोरपणे अमलातही आणला.
भालजींचा स्टुडिओ जाळणे हा अभिव्यक्तीवर हल्ला नव्हता, शीख किंवा काश्मिरी पंडितांवरचे हल्ले ‘मॉब लिंचिंग’ नव्हते.
राष्ट्रीय विचारांशी बांधिलकी असणाऱ्या दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे वाचकांना विचारशील व उपक्रमशील करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याच संकल्पनेतून सध्या नव्याने चर्चेत आलेल्या ‘शहरी माओवादाचे संकट’ या विषयावर नाशिक येथे कॅ. स्मिता गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
वरवरा राव हे प्रकरण जितके वर दिसते तितकेच ते खोलही आहे. हिमनगाचे हे वरचे टोक असूनखरा भाग खालीच दडलेला आहे.
राहुल गांधी यांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, नक्षल्यांनी शेकडो दलित-आदिवासींची हत्या केली. तो दिवस दूर नाही, जेव्हा तेच आदिवासी या नक्षल्यांना पकडून त्यांचेही तुकडे तुकडे करून ठार मारतील आणि त्यांना मदत करणार्यांनाही धडा शिकवतील!
क्रांतीचे, गोरगरीबांच्या हिताचे नाव घेऊन स्वतःच्या जीवनधारेला सत्तासधन कसे बनवावे, यामध्ये नंबर एक क्रमांकावर कोण असतील तर ते नक्षलवादी. हे लोक कामधंदे तर काही करत नाहीत. गाववाल्यांना शस्त्राच्या बळावर घाबरवून, त्यांच्याकडून बळजबरीने पैसे वसुलायचे, तिथल्या उद्योजकांना, व्यावसायिकांना इतकेच काय सरकारी विकासकाम करणार्या कंत्राटदारांकडूनही हप्ता बांधायचा, हे त्यांचे आर्थिक स्रोत. अर्थात, हप्ते गोळा करण्याची हद्द गावापुरतीच मर्यादित राहत नाही, ही गोष्ट अलहिदा.
भारतीय माध्यमांतील बहुसंख्य मंडळी डाव्या विचारांवर पोसलेली आहेत आणि जे कोणी व्यवस्थेला आव्हान देत देशाच्या मुळावर उठतात, ते ते या लोकांना क्रांतिकारक वाटतात. म्हणूनच या लोकांना नक्षलवाद्यांसहित देशविघातक शक्तींमागे टाळ्या पिटत फिरावेसे वाटते. मग तो प्रा. साईबाबा असो की याकूब वा अफजल वा जेएनयुतील ‘भारत तेरे टुकडे होंगे’चा नारा देणारी टोळी असो!
नागपूरात शहरी नक्षलवादाच्या समर्थनार्थ काही ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते. हे बॅनर लावणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शहरी नक्षलवाद काय आहे, शहरी नक्षलवाद्यांचे कार्य कसे चालते, शहरी आणि जंगलातील नक्षलवादी एकमेकांना कसे पूरक काम करतात, याचीच माहिती या लेखातून जाणून घेऊया...
समाजातील महापुरुष, जाती, धर्म, शासनविरुद्धची खोटी माहिती आदी पोस्टची खातरजमा न करता फॉरवर्ड करणे घातक होते