वेव्हज परिषद केवळ एक इव्हेंट न राहता एक व्यापक चळवळ ठरली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १८ जुलै रोजी केले आहे.
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
Devendra Fadanvis on Bullet train राज्यात २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमी कॉरिडॉर समिट २०२५मध्ये ते बोलत होते.
( One card for local, metro, mono and bus Devendra Fadanvis ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “येत्या महिनाभरात ‘मुंबई वन’ या सिंगल स्मार्टकार्डची अंमलबजावणी सुरू होईल,” अशी घोषणा केली आहे. “या एका कार्डच्या आधारे मुंबईमध्ये कोणत्याही वाहतुकीच्या पर्यायाने लोकांना प्रवास करता येणार आहे. लंडनच्या ‘ऑयस्टर’ कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुकर आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बसप्रवासासाठी वापरता येणार आहे.
( maharashtra cabinet will be paperless ) फडणवीस सरकारच्या यापुढच्या कॅबिनेट ‘पेपरलेस’ होणार आहेत. राज्यात लवकरच ई-मंत्रिमंडळ प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार असून, असा निर्णय घेणारे करणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य ठरणार आहे.
( Devendra Fadanvis on healthcare in the state ) “राज्यातील आरोग्यसेवेला आता बळकटी मिळणार आहे. आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करावा,” असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ’मिशन’ म्हणून राबविण्यात यावा,” अशा सूचना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी दिल्या.
कठोर मेहनत, संयमी वृत्ती, विकासाची जिद्द, संघटनेचे बळ आणि जनसेवेचा ध्यास यांचे अतुलनीय मिश्रण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! विरोधकांनी राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही यथेच्छ चिखलफेक केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकांवर अढळ राहिले. तेव्हा, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ ते ‘अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता हैं’ याचा प्रत्यय यंदाच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिला. फडणवीसांच्या अशा या उंच गरुडभरारीच्या अद्वितीय यशाचा आलेख मांडणारा हा लेख...
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नमो एक्स्प्रेस सोडण्यात आली.
पुणे येथील कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर दि. १९ मे २०२४ रोजी पहाटे २.३० वाजता झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी सकाळी ८.१३ वाजता गुन्हा नोंदविला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी यात सक्रियतेने कार्यवाही केली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. ११ जुलै रोजी विधान परिषदेत स्पष्ट केले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या घटनेत पुणे पोलीस आयुक्तांसह दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
“स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांना लावण्यात येणार आहेत. यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही, तर वीजबचतीचा पैसा वापरण्यात येणार आहे,” अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी विधानसभेत दिली. ‘नियम 293’ अन्वये उपस्थित ऊर्जा विभागाच्या विषयातील बाबींना त्यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, “चुकीच्या गोष्टी सांगून तुम्ही जिंकलात, पण स्मार्ट मीटरची योजना तयार कोणी तयार केली, तर ती महाविकास आघाडी सरकारने. आम्ही सामान्य नागरिकांना स्मार्ट मीटर बसविणार नाही
'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ ऑगस्ट रोजी, विधानभवनात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्राला आधी न्याय मिळू शकला असता. कारण, जे मध्य प्रदेशने केले ते आधी करा, हे आम्ही दोन वर्षे झालीत, महाराष्ट्र सरकारला सांगतो आहोत. पण केवळ ‘टाईमपास’ केला,” असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून टीका केली.
राज्य सरकारचे सातत्यपूर्ण अपयश
भारतातील पुरातन संस्कृती आणि त्यातील कौशल्यांविषयी बोलताना “गंजविरोधी लोखंडाचा शोध भारतात दोन हजार वर्षांपूर्वीच लागला आहे,” असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देशाच्या प्रत्येक भागातील ’स्वदेशी’ आणि ’व्होकल फॉर लोकल’च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव आणि कला आणि कौशल्य यांच्या प्रदर्शनाची संधी देणार्या ‘हुनर हाट’ची 40वी आवृत्ती 16 एप्रिल ते 27 एप्रिलदरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात सुरु आहे.
संजय राऊतांची संभावना स्वतःवर डाव आला की, रडकुंडीला आलेल्या रडव्यासारखी मात्र नक्कीच होईल. कारण, त्यांच्या धमकीतून शिवसैनिकाचा आत्मविश्वास नव्हे, तर घायकुतीला आल्याची भावनाच ओसंडून वाहत होती.
ठाकरे सरकार या अधिवेशनात ओबीसींच्या इम्पिरिकल डेटाचा ठराव मांडणार आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही. परंतु, तरीही ओबीसींसाठी आम्ही या ठरावाला पाठिंबा देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्रातला ‘माधवं फॉर्म्युला’ पाळला गेला नाही. राष्ट्रवादीचे चरणकमल पुजण्याआधी एकनाथ खडसे यांनी आपल्या नाराजीचे एक कारण जाहीर केले होते. ‘माधवं’ म्हणजे काय? तर म्हणे, माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी हे समीकरण! तर खडसेंच्या मते, देवेंद्र यांनी माळी, धनगर आणि वंजारी या समाजाचे राजकारण केले नाही. बरे झाले खडसे यांनीच हे स्पष्ट केले. तसेही ‘सब समाज को साथ लिये’चा संकल्प असलेल्या राजकीय पक्षाने राजकीय भुकेसाठी महाराष्ट्रात केवळ लोकसंख्या जास्त असलेल्या समाजाचा विचार करावा, हे कोण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह हे आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेते संयुक्तरित्या युतीची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती, खा. संजय राऊत यांनी दिली.
नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान केवळ शेतकर्यांच्या कुटुंबास हानी पोहोचवून जाते असे नाही तर त्याचा परिणाम राज्याच्या व देशाच्या अर्थकारणावर होत असतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा जाहीर करणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील मैदानावर १६ सप्टेंबर रोजी विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी आतापर्यंत सात हजारांवर रुग्णांची नोंदणी झालेली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९०१० व नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५१४ सदनिकांच्या विक्री सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामगिरी निवासस्थानी करण्यात आला.
महिलांची तस्करी हा जगातील दुसरा सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय आहे. शिवाय पुढील १० वर्षात हा व्यवसाय अमली पदार्थ व्यवसायाच्या पुढे जाऊन जगातील सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय होण्याची भीती आहे.
पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून ५ कोटींची मदत जाहीर झाली आहे.