उरणमध्ये एका निष्पाप तरुणीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. आज सकाळीच पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक केलीये. दाऊदने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीये. मात्र, दाऊदला अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबी उघड केल्या आहेत. हे प्रकरण लव्ह जिहादचं आहे की, आणखी काही यावरही पोलिसांनी भाष्य केलंय. दरम्यान, उरण हत्या प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत ते जाणून घेऊया.
Read More
लग्नाची मागणी, फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि बरंच काही.. उरण हत्या प्रकरणात आता अनेक नवनवीन खुलासे पुढे येताहेत. उरणमधील तरुणी यशश्री शिंदेच्या हत्येबाबत मुख्य आरोपी दाऊद शेखने पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली तर दिलीच, शिवाय ही हत्या कशी केली, त्यामागे काय कारण होतं? तो यशश्रीला कधीपासून ओळखत होता? त्यांच्यात नेमकं काय घडलं? या सगळ्याची कबुलीही त्याने दिलीये. हीच माहिती जाणून घेऊया.
उरण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दाऊद शेखने २२ वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या केली होती.
उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख हा यशश्री शिंदेकडे लग्नाची मागणी करत होता. तसेच लग्न न केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी ही माहिती दिली आहे.