गेल्या काही वर्षांत वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. म्हणूनच नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तत्काळ तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन क्रमांक, हेल्पलाईन संकेतस्थळ अशी व्यवस्थादेखील सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकार, रिझर्व्ह बँकेसह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींद्वारेही या गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविण्याची मोहीम राबवली जात आहे. तरीही फसवणूक होणार्यांचे प्रमाण आणि अशा गुन्ह्यांमधील रक्कम यांचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हाच यावरील प्रभावी
Read More
रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या समन्वयाने म्यूल खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक प्रणाली स्थापन केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सल्लागार समितीला दिली आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे वृत्त झळकले. “माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन कुणालाही काही संदेश येईल, तर प्रतिसाद देऊ नये,” असे आवाहन कोकाटेंना करावे लागले. व्हॉट्सॲपवरच्या ठगांनी नेमका कसला धुडगूस घातला आहे? अशा ऑनलाईन दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी उपाययोजना काय? त्याचे हे आकलन...
(AAP) दिल्लीतील आप सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. दिल्ली सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत या योजना अद्याप अधिसूचित नाही, त्यामुळे कोणालाही आपली कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागानेही यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे.
Digital arrest गेल्या काही महिन्यांत‘डिजिटल अरेस्ट’ हा सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा, त्याचे नेमके स्वरुप आणि खबरदारी याचा आढावा घेणारा हा लेख...
दिल्लीतील बिजवासन परिसरात सायबर फसवणूक प्रकरणात, एका सीएच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ईडीचे अतिरिक्त संचालक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
(fake notice) राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अनेक नागरिकांना आयुक्तांच्या नावे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून अटक करण्याची धमकी दिली जात आहे. असे कॉल आल्यास अथवा मेसेजेस आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.
देशात डिजिटल क्रांतीमुळे पुढील काही वर्षांत १ अब्ज यूपीआय व्यवहार होण्याची शक्यता आहे. सध्या, जगातील सर्व डिजिटल पेमेंटपैकी ४६ टक्के प्रमाणासह भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास येत आहे, असे कॅशफ्री पेमेंट्सचे सीईओ आणि संस्थापक आकाश सिन्हा म्हणाले.
खतरनाक ! सायबर क्राईम व टेलिकॉम क्षेत्रातील ऑनलाईन घोटाळे, अथवा गैरवापर रोखण्यासाठी टेलिकॉम बँक ऑपरेटरने १.८ दशलक्ष सिमकार्ड ब्लॉक करण्याचे ठरवले आहे. तसा रिपोर्ट प्रसारमाध्यमांनी दिला असून घोटाळेबाजांसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. यावर नियामक मंडळाने कडक कारवाई करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नियामक मंडळांनी या सिमकार्डवर लक्ष ठेवले होते.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार दूरसंचार विभागाने २८,२०० मोबाईल मोबाईल हँडसेट ब्लॉक केले आहेत. यासोबतच या हँडसेटशी जोडलेल्या २० लाखांहून अधिक मोबाईल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्यास सांगितले आहे. त्यांची फेरपडताळणी न केल्यास त्यांना ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये पोलिसांनी मोहम्मद बिलाल हुसेन नावाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे. बिलाल एका मुलीला आणि तिच्या मैत्रिणींना सायबरस्टॉक करत होता. तो युवतीचे आणि तिच्या मित्रांचे मॉर्फ केलेले आणि अश्लील फोटो बनवून इंटरनेटवर शेअर करून मुलीला त्रास देत होता. बिलालच्या कृत्याला कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार केली होती.
गेल्या तीन वर्षांत डिव्हाईसमधील डेटा चोरीत ६०० टक्क्याने वाढ झाली असल्याचे कॅस्परस्की या सायबर सिक्युरिटी कंपनीने म्हटले आहे.कंपनीने आपल्या डिजिटल फूटप्रिंट इंटेलिजन्समध्ये माहिती दिल्यानुसार खाजगी व कार्यालयीन इलेक्ट्रोनिक डिव्हाईसमधील डेटा चोरण्याचे प्रकार वाढले असल्याचे सांगितले आहे.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये या प्रकाराची संख्या १० दशलक्षावर पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर ‘इंडियन साइबर क्राइम कंट्रोल अँड कार्डिनेशन विंग’ अर्थात ‘आयसी४’ लक्ष ठेवणार आहे. कोणताही खोटा मजकूर असल्याचे दिसल्यास तो ताबडतोब हटविण्याचे अधिकार ‘आयसी४’ ला देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे.
भारत सरकारने नुकतेच ‘चक्षु’ नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. या माध्यमातून नागरिक व्हॉट्सअॅप, एसएमएस अशा कोणत्याही माध्यमातून सायबर गुन्ह्यांची तक्रार करू शकतील. त्याविषयी...
'फॉरेन्सिक’ हा शब्द ऐकल्यानंतर, डोळ्यासमोर एसीपी प्रद्युमन यांच्या ‘सीआयडी’ ब्युरोतील डॉ. साळुंखे येतात. चित्रविचित्र रंगांची रसायने, बर्नर वगैरे असं चित्र समोर उभं राहतं. कारण, एक पिढीच तो कार्यक्रम पाहत मोठी झाली आहे. पुढची पिढी थोडा अधिक वास्तववादी वाटावा, असा ’क्राईम पेट्रोल’ हा कार्यक्रम पाहत मोठी होतेय.
अर्धवेळ नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक आणि आर्थिक गुन्हे करणाऱ्या १०० हून अधिक संकेतस्थळांना बंद करण्याची कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना अशा प्रकारांविषयी सावध राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून आणि मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईमध्ये सन २०१८ ते २०२२ या दरम्यान त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये क्रेडीट कार्ड घोटाळे/फसवणुकीचे' सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले असून त्यांचे प्रमाण ६५७ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून समोर आली.
राज्यात सायबर चोरट्यांची संख्या वाढली असून आता मुंबईतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका वृद्ध जोडप्याला ११ कोटी रुपयांचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल चार कोटी रुपयांनी गंडवले आहे. दक्षिण मुंबईतील ही घटना आहे.
वाढत्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘सायबर कमांडो’ अशी विशेष शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे.
आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. यावेळी ६ कोटींहून अधिक लोकांनी आयकर परतावा भरला आहे. आयटीआर फाइल केल्यानंतर, करदाते त्यांच्या आयटीआर फाइलवर प्रक्रिया होण्याची आणि परतावा मिळण्याची प्रतीक्षा करतात
मुंबई : गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात राज्य सरकारने त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात केला आहे.
'झट मंगनी पट शादी’ अशी म्हण प्रचलित आहे. मात्र, काडीमोड हवा असल्यास किचकट न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते. भारतीय हिंदू विवाह कायदे कौटुंबिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आहेत. मात्र, अनेकदा हेच कायदे दीर्घकालीन प्रक्रियेमुळे त्रासदायक ठरतात. ज्याप्रमाणे ‘झट मंगनी पट शादी’ होत असते. त्याचप्रमाणे काडीमोडही झटपट करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुकूलता दाखवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन २०४७’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीच्या कृती आराखड्याविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शिबीराच्या अध्यक्षस्थानी होते.
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे गेल्या दोन महिन्यात १२० चिनी आयडी बंद करण्यात आले आहेत. याद्वारे खोट्या संदेशांच्या आधारे मालवेअर लिंक्स पाठविण्याचे षडयंत्रदेखील उध्वस्त करण्यात यश आले आहे.
देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढ होतं आहे. गेल्या वर्षभरात सायबर क्राईम संबधित https://cybercrime.gov.in/ या वेबसाईटवर २० लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि ४० हजार एफआयआर नोंदवण्यात आल्या.यामुळे सर्वसामान्यांनी सतर्क होणे गरजेचे आहे. एकीकडे देशात डिजिटल व्यवहार वाढत आहेत, तर दुसरीकडे डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. येथे आम्ही तुम्हाला 8 प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती देणार आहोत.
गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ‘भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर’ (आय४सी)ची स्थापना ‘सायबर’ गुन्ह्यांचा समन्वित आणि सर्वसमावेशक पद्धतीने सामना करण्यासाठी करण्यात आली. एकूणच राष्ट्रीय सुरक्षेस अधिक भक्कम करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांचे धोरण महत्त्वाचे ठरताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर शाह यांनी दि. २८ मार्च रोजी ‘आय४सी’च्या कामकाजाचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी ‘आय४सी’मध्ये कार्यरत अधिकार्यांशी संवाद साधला आणि व्यवस्थेची समीक्षा केली. त्यानिमित्ताने एकूणच सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद
दूरसंचार विभागाने बनावट ओळख वापरून जारी केलेले १५ लाख मोबाईल नंबर बंद करण्यात आलेत, अशी माहिती केंद्रीयमंत्री देवूसिंह चौहान यांनी दि. २९ मार्च रोजी दिली आहे. यावेळी केंद्र सरकारने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत तरुणीला गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून तिच्या वडिलांच्या खात्यातील सुमारे ९९ हजार ९९९ रुपयांवर डल्ला ,मारला असून दहिसर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत सुमारे ९६ हजार रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करणारे 'पोलीस बाप्पा गीत'
“तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला.
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी केला गैरवापर
पोलिसांनी जनतेला दिला सतर्कतेचा इशारा
वहारांचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. या आव्हानाला सामोरे जाण्याच्या सज्जतेमुळे महाराष्ट्र पोलिस सायबर पोलिसिंगच्या दृष्टीने देशात अव्वल ठरणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुंबई इंडियन्स विरूद्ध बेंगळुरू रॉयल चॅलेंजर सामना पाहण्यासाठी आलेल्या ५४ क्रिकेट शौकिनांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार
भारतीय जनता पक्षाचे संकेतस्थळ मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली असून संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर एक संदेश झळकतो आहे. या संदेशामुळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ हँक झाले असल्याची चर्चा होत आहे.
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने एका ब्लॉगद्वारे अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ कोटी फेसबुक वापरकर्त्यांचे डेटा चोरी केल्याचा खुलासा नुकताच केला.
नरीमन पॉईंट येथील स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसच्या शाखेतील १४३ कोटींची रक्कम सायबर हल्लेखोरांनी देशाबाहेर वळती केल्याची तक्रार बॅंकेने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली आहे.
फेसबुक या सोशल मीडियावर महिलेचे बनवाट अकाउंट उघडून त्यात अश्लिल संदेश टाकून बदनामी केल्या प्रकरणी स्था.गु.शाखा तथा सायबर क्राईम जळगावने कारवाई करुन इसमास जेरबंद केले .
सायबर क्राइम आणि बालकांवर होणारे अत्याचार कसे थांबवाल ,आणि वाहतुकीचे नियमांची आवश्यकता, या विषयी काशिनाथ पलोड शाळेत पोलिस विभागा तर्फे विशेष कार्यशाळानुकतीच घेण्यात आली,
लहान मुलांना सकारात्मक, योग्य व सुरक्षित अशा प्रकारचे डिजिटल कंटेंट उपलब्ध झाले पाहिजे याकरिता सर्वच क्षेत्रातील तज्ञांनी विचारमंथन करून उपाययोजना केली पाहिजे.