(CARACAL and ICOMM) भारताच्या संरक्षण क्षेत्रातील 'मेक इन इंडिया' अर्थात भारतातच शस्त्रांत्रे निर्मीतीचा एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यूएईतील CARACAL (EDGE ग्रुपची घटक कंपनी) आणि भारतीय ICOMM (MEIL ग्रुपची सहाय्यक कंपनी) यांनी हैदराबाद येथे अत्याधुनिक लघुशस्त्र उत्पादन कारखाना सुरू केला आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत सुरु झालेला हा कारखाना यूएईमधून भारतात तंत्रज्ञान हस्तांतरणाने सुरु होणारा पहिला संरक्षण शस्त्रास्त्र प्रकल्प आहे.
Read More
भारताच्या संरक्षण उत्पादन वाढीच्या यशोगाथेत आयकॉम या मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या समूह कंपनीने मोठी झेप नोंदवली. आज 21 फेब्रुवारी 2023 ला आयकॉमने युएईतील एज समुहाच्या कॅराकल सोबत संरक्षण क्षेत्रात प्रथमच तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) साठी भागीदारी आणि परवाना करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, आयकॉम 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत भारतीय बाजारपेठेसाठी कॅराकलच्या लहान श्रेणीतल्या शस्त्रांस्त्राची स्थानिक पातळीवर निर्मिती करेल.