सुरतहून अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. नंदुरबार परिसरात घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अशा अनेक घटना सध्या होत असल्याने प्रवाशांमध्ये दरम्यान गोंधळ उडाला होता. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सदर घटनेसंदर्भात तपास सुरु असून त्या ठिकाणी एक मनोरुग्ण आढळून आल्याचे प्रशासनाने सांगितले. (Astha Express Nandurbar)
Read More