संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात बुधवार दि. २ जुलै रोजी आरोपी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांना काही शर्तींवर दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्या. हरीश वाडियानाथन शंकर यांच्या खंडपीठाने प्रत्येकी ५०,००० रुपयांचे जामीनपत्र आणि दोन जामीनदारांच्या अधीन आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले.
Read More
संसद सुरक्षा भंग प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा हाऊस न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवली आहे. त्याचवेळी संसदेच्या सुरक्षेसाठी आता केंद्रीय औद्योगिक पोलिस दलाकडे (सीआयएसएफ) जबाबदारी देण्यात आली आहे.
'शिख फॉर जस्टिस'चे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी संसद भवनात घुसून गोंधळ घालणाऱ्या लोकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 13 डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी टाकून गोंधळ घातला. त्यात सहभागी असलेल्या ७ जणांपैकी ६ जणांना (विशाल-वृंदा, नीलम देवी, अमोल शिंदे, सागर शर्मा, डी मनोरंजन) पोलिसांनी अटक केली आहे. हे सहा आरोपी 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि काही काळापासून ही घटना घडवण्याचा कट रचत होते. संसदेत हे कृत्य करण्यापूर्वी त्यांनी रेके केल्याचेही बोलले जात आहे.
संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करत सुरक्षा दलाशी संबंधित ८ सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना निलंबित करण्यात आले आहे ते सर्व लोकसभा सचिवालयातील सुरक्षा कर्मचारी आहेत. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व सुरक्षा कर्मचारी आरोपी ज्या ठिकाणी दाखल झाले त्याच ठिकाणी तैनात होते.