Anil deshmukh

गोंदण कलेच्या सर्वंकष संशोधनासाठी अभ्यासगट स्थापण करणार! - सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचे निर्देश

महाराष्ट्रात विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमधे विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमधे आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे. मात्र पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री एँड.आशिष शेलार यांनी नुकतेच दिले.

Read More

सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे १०० पर्यटन स्थळांवर साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योग दिन!

२१ जून २०२५ रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर ५० महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाद्वारे विशाखापट्टनम येथे साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Read More

महाराष्ट्रात डिजिटल कृषिक्रांतीची नांदी ; ‘महाॲग्री-एआय’ धोरण मंजूर; तंत्रज्ञानांच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि उत्पादनक्षम बनवणार

शेतीची पारंपरिक चौकट मोडून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्राची शेती आता डिजिटल युगात झेप घेणार आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) आधारित नवकल्पना थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवणाऱ्या ‘महाॲग्री-एआय’ धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. ड्रोनपासून रोबोटिक्सपर्यंत आणि हवामान अंदाजापासून ‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’पर्यंत विविध तंत्रज्ञानांच्या माध्यमातून, राज्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि उत्पादनक्षम करण्याचा निर्धार या धोरणातून दिसून येतो.

Read More

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी आयुक्

Read More

आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्

Read More

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं

Read More

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read More

भारतीय संस्कृतीचे प्रचार-प्रसारक ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’

भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121