मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवार, ४ जून रोजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली.
Read More
अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? त्यांच्याकडून पैसे परत घेणार का? यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, ३१ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब लक्षात आली असून तेव्हापासूनच त्यांना लाभ देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. गुरुवार, २९ मे रोजी त्यांनी परभणी येथे माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा आता संपली असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.त्याही पलिकडे जात,संरक्षण खर्चात कपात करुन तो पैसा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरल्याचे विधान त्यांनी केले.वास्तविक,धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कृत्याचा राऊतांनी आणि त्यांच्या पक्षाने निषेध नोंदवणे क्रमप्राप्त होते. पण, त्यात त्यांनी ल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट पुढे आली आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांपैकी आठ लाख महिलांना आता १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या आठ लाख लाभार्थी महिलांना आता १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यभरातील अनेक महिलांनी लाभ घेतला. परंतू, लाडक्या बहिणींना २१०० रुपये लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे.
लाडकी बहिण योजना बंद करणार नसून त्यात काही दुरुस्ती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली. सोमवार, १७ मार्च रोजी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
लाडकी बहिण योजनेतून अनेक लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात थेट आकडेवारी जारी करत सडेतोड उत्तर दिले.
(Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. या योजनेच्या १५०० रुपयांची महिलांना प्रतीक्षा लागली आहे. शासनाकडून अर्ज पडताळणी सुरु असल्याने या हप्त्याला उशीर झाल्याची माहिती आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते सोबत मिळतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या योजनेबाबत भाष्य केले आहे.
(Ladki Bahin Yojana) राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) सोमवार दि. ३ मार्च रोजी सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता. दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी येत
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्च रोजी सभागृहाचे विशेष सत्र होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, ३ मार्च रोजी दिली.
(Ladki Bahin Yojana) महायुती सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मह्त्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेंतर्गत ९ लाख बहिणींना मिळणारा दीड हजार रुपयांचा मासिक हप्ता आता बंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरु होती. या पडताळणीमध्ये सरकारद्वारे दिलेल्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला व बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आली होती.
बदललेल्या निकषांनुसार पुढचे हप्ते कोणत्या बहिणींना मिळणार? काय आहेत हे बदल?
(Ladki Bahin Yojana update e- KYC) राज्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत दर महिन्याला २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी मह्त्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता प्रत्येक वर्षी ई - केवायसी करावी लागणार आहे.
चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणींचा हफ्ता बंद होणार का? अपात्र ठरणाऱ्या महिलांचे पैसे माघारी जाणार असं बोललं जातंय त्यात किती तथ्य आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसिद्धीकरिता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या जाहीरात प्रसिद्धीकरिता सरकारकडून ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी दिली.
(Ladki Bahin Yojana) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' मधील लाभार्थी महिलांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टात गेले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवार, २५ जानेवारी रोजी त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली.
मुंबई : 'लाडकी बहिण योजने'च्या ( Ladki Bahin Yojana ) लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ २६ तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. नवीन अर्थसंकल्पाच्या काळामध्ये लाभार्थींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार केला जाईल. अर्ज पडताळणीपुर्वीच यामध्ये चार हजार महिलांनी योजनेचा लाभ थांबविण्याचे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना योग्य त्या प्रमाणे लाभ मिळणे सोपे होणार आहे.
(Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे. तसेच या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावाला राज्या मंत्रिमंडळाने गुरुवारी दि. १६ जानेवारी रोजी मान्यता दिली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
(Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर निवडणुकांपूर्वी प्रचंड गाजलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेत आली. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर या योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याची जाहीर घोषणा करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार राज्यभरात विविध ठिकाणी अर्जांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे. तेव्हाच या योजनेतील निकष डावलून लाभ घेतलेल्य
(Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थीं महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवार ३ जानेवारी रोजी माहिती दिली आहे. एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज अपात्र करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आधार कार्ड लिंक नसल्याने पैसे रखडलेल्या महिलांनासुद्धा आता पैसे मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
(Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात केव्हा जमा होणार? याकडे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र लवकरच त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून नागपूर येथील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होऊन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आता खातेवाटप होताच डिसेंबर महिन्याचे पैश्यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान या महिन्यात १५०० रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
(Delhi) येत्या नव्या वर्षात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठ्या विकासयोजनांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर त्याच धर्तीवर राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने 'महिला सम्मान योजने'ची घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत महिलांना दरमहा १,००० रुपये मिळणार आहे.
Nitesh Rane लाडकी बहीण योजनेच्या अधिकाधिक लाभार्थी या मुस्लिम आहेत. त्यामुळे दोन हून अधिक अपत्य असलेल्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे म्हणत नितेश राणे यांनी आपली परखड भूमिका व्यक्त केली आहे. हा तर एक ट्रेलर होता, जर हिंदू एक झाला तर तुम्हाला पिक्चर दाखवेल, असे बांगलादेशातील हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत त्यांनी ११ डिसेंबर २०२४ रोजी हे वक्तव्य केले आहे.
Devendra fadanvis विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी दि: २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाईव्ह येत त्यांनी मतदारांना मुंबई येथे संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी "लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना छप्पर फाड के झाडू लागाके निवडून दिले", असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
निवडणूक जवळ आली म्हणून ‘लाडकी बहीण’ दिसते. १ हजार, ५०० रुपये देऊन कोणाचे घर चालते, हे सांगावे.” इति उद्धव ठाकरे. अर्थात, पैशाची किंमत कोणाला? ज्यांना कमतरता आहे त्यांना! तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना १ हजार, ५०० काय, १५ कोटी रुपयेदेखील चिल्लरच वाटतील. १०० कोटींचे प्रकरण ज्यांच्या सत्ताकाळात घडले, त्यांना १ हजार, ५०० रुपयांची काय कदर? काही लोक म्हणतात, उद्धव ठाकरेंना हे विचारण्याचा अधिकार आहे. कारण, त्यांच्या ३४ वर्षांच्या ‘लाडक्या बाळा’ची संपत्ती २३ कोटी आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सोबत्या
महाविकास आघाडी तसेच स्वत:ला राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणवून मिरवणार्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला भूलथापा देण्याचेच काम केले. मविआच्या पंचसूत्रीतून आणि उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यातून केवळ अव्यवहार्य योजनांच्या आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. पण, या फसवाफसवीच्या पंचसूत्रीने आणि खोट्या वचनांनी मतदारांना कदापि भूलविता येणार नाही, ही खूणगाठ आता उद्धव ठाकरे आणि मविआने बांधून घ्यावी.
( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ) राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून या योजनेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या. अशातच या योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
भविष्यात लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. बुधवारी महायूतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायूती सरकारने केलेल्या कामांचं रिपोर्ट कार्ड २०२२ सादर केलं.
(Kalyan) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यापासून आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक समाजहिताच्या योजना लागू करत सामाजिक निर्णयांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या लोकोपयोगी कामांनी प्रभावित कल्याणमधील ५० लाडक्या बहिणींनी राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कोकण वसाहत परिसरात झालेल्या लाडकी बहीण सन्मान योजनेच्या कार्यक्रमा
राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप लाभ मिळालेला नाही त्या आता अर्ज करू शकतात. पालकमंत्री दादा भुसे यांनी याबद्दलची माहिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य प्रदेशमधील लाडकी बहिण योजना बंद झाली याबाबत संजय राऊतांनी पुरावा दिला तर ते जे सांगतील ते मी करायला तयार आहे, असं थेट आव्हान भाजप नेते नितेश राणेंनी दिलं आहे. मध्य प्रदेशमधील लाडकी बहिण योजना बंद झाली, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. याबाबत आता राणेंनी त्यांना पुरावा मागितला.
(Kalyan West Vidhansabha) "मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दीड हजार रुपयांचे मोल कसे कळणार?" अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला.
यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना हे गिफ्ट दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्यात येतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या घरी जाणार आहेत. सोमवारी यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रमांतर्गत नवनवीन संकल्पना आकर्षक देखाव्यांच्या स्वरुपात आपल्याला पहायला मिळतात. अश्याच प्रकारचा एक जनहितार्थ उपक्रम ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने यंदाच्या वर्षी हाती घेतला आहे. शासकीय योजनांचा प्रचार - प्रसार करणे तसेच गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे.
राज्यात लाडकी बहिण योजनेचा राज्यात जोरदार प्रचार प्रसार सुरू आहे. लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. या योजनेसह महिला सक्षमीकरणाच्या अन्य महत्त्वाच्या योजनांबद्दल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारत महाएमटीबीने साधलेला संवाद...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. या योजनेला आता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या महिला येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकतात.
ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई-गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी केले.