न्यु इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थीक घोटाळ्यामुळे शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत न्यु इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर बंदी आणली आहे. १२२ कोटींच्या घोटाळ्यात बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना १५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दल विविध स्तरांमधून प्रतिक्रीया उमटत असताना, बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासक विद्याधर अनास्कर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.
Read More
राज्यातील नागरी सहकारी बँकांसमोरील अडचणीचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.