यूती संदर्भात राज ठाकरे साहेबांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २० जून रोजी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी त्यांची भेटही घेतली.
Read More
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत चर्चा सुरु असताना आता उद्धव ठाकरेंनीदेखील आपले मौन सोडले आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीबाबत संकेत दिले आहेत.
राज्यात वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यामुळे अनेक छोट्या पक्षांना आणि मुख्य म्हणजे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला यामुळे स्पेस मिळाली. त्यानंतर राजकारणात पुढे काय होईल कोणता पक्ष कोणासोबत जाईल यावर देखील तर्हेतर्हेच्या चर्चा आहेत. त्यातच मनसे आणि भाजप एकत्र येईल अशी एक मोठी चर्चा राजकीय विश्लेषक तसेच राजकीय नेते देखील करत आहेत. आगामी निवडणुकांना वेळ आहे , याअगोदरच आज भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे
पालघर पोटनिवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. या कालावधीत अनेक घटना घडल्या. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनीदेखील भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.