तेलंगणातील हैदराबाद शहराजवळील कांचा गाचिबोवली वनक्षेत्रातील जंगलतोडीच्या प्रकरणाची बुधवार दि. २३ जुलैला झालेल्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी तेलंगणा सरकारची कानउघाडणी करत म्हटले की, “एका रात्रीत बुलडोझर चालवून जंगल नष्ट करणे शाश्वत विकास ठरू शकत नाही.”
Read More
निसर्गभ्रमंती करताना, वन्यजीवप्रेमी, पक्षीनिरीक्षकांचेही मार्गदर्शन व्हावे आणि जंगलाची चिरशांतता भंग होऊ नये, म्हणून अॅपच्या माध्यमातून यशस्वी प्रयोग करणार्या निसर्गसखा सलील चोडणकर यांच्याविषयी...
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन शुक्रवार दि. ११ जुलै रोजी आठ परदेशी वन्यजीवांची तस्करी उघडकीस आली (exotic wildlife seized). बॅंकाॅकमधून आलेल्या या वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशात पाठवण्यात आले आहे (exotic wildlife seized). गेल्या महिन्याभरात मुंबई विमानतळावरुन पकडलेले हे परदेशी वन्यजीव तस्करीचे हे सातवे प्रकरण असून यामाध्यमातून ३७२ वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले आहे. (exotic wildlife seized)
दापोली तालुयातील वन्यजीव संवर्धनाच्या कामात तळमळीने काम करणार्या तुषार श्रीधर महाडिक या तरुणाविषयी...
गेल्या महिन्याभरात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीची सहा प्रकरणे उघडकीस आली आहेत (exotic wildlife trafficking).
राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी दै. 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. शेलार यांची दुसऱ्यांदा या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीमार्फत राज्यातील वन आणि वन्यजीव संदर्भातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मान्यता देण्याचे काम होईल.
कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे (crop compensation for wildlife). यावर माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले (crop compensation for wildlife). रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. (crop compensation for wildlife)
वाडा तालुक्यातील गारगाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाला गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी राज्य वन्यजीव मंडळाने परवानगी दिली (state wildlife board). मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयामध्ये राज्य वन्यजीव मंडळाची २४ वी बैठक पार पडली (state wildlife board). या बैठकीत गारगाई धरणाबरोबरच जायकवाडी पक्षी अभयारण्यातील सौर उर्जा प्रकल्पाला देखील मंजुरी देण्यात आली. (state wildlife board)
गेली वर्षानुवर्षे या पदावर ठिय्या मांडून बसलेल्या लोकांना यंदा वन विभागाकडून घरचा रस्ता दाखवण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. (hon. wildlife warden appointment)
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
गोगलगायी, बेडूक अशा चाकोरीबाहेरच्या वन्यजीव प्रजातींवर संशोधनाचे काम करणारे प्राध्यापक डॉ. ओमकार विष्णूपंत यादव यांच्याविषयी...
वन्यजीवांच्या संवर्धन, उपचार आणि देखभालीसाठी उद्योजक अनंत अंबानी यांच्या संक्लपनेमधून साकार झालेल्या जामनगर येथील 'वनतारा'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली (vantara wildlife rescue and rehabilitation center). यावेळी त्यांनी 'वनतारा'मध्ये सुरू असलेल्या वन्यजीव संवर्धन, उपचार आणि देखभालीच्या कामांची पाहणी केली (vantara wildlife rescue and rehabilitation center). तसेच पंतप्रधान काही वन्यजीवांसोबत रमलेले देखील दिसले. (vantara wildlife rescue and rehabilitation center)
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील गिर वन्यजीव अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. त्यानी आशियाई सिंहांना जवळून पाहिले होते. तसेच त्यांनी जंगल सफारीचा आनंद घेत आपले फोटोशूटही केले. दुसऱ्या एका फोटोत नरेंद्र मोदी हातात कॅमेऱा घेऊन सिंहाकडे पाहताना दिसतात. एक मादी सिंहिणी आपल्या बछड्याचा मिठी मारताना दिसते.
वन्यजीव संशोधन क्षेत्रातील माहिती संकलन पद्धतींमध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत (World Wildlife Day). मात्र, गेल्या पाच वर्षांत राज्यात ड्रोन आधारित वन्यजीव सर्वेक्षण प्रणालीचा अवलंब वाढला आहे (World Wildlife Day). आजच्या ‘जागतिक वन्यजीव दिना’निमित्त जाणून घेऊया ड्रोन सर्वेक्षण पद्धतीविषयी... (World Wildlife Day)
‘कांदळवन कक्षा’अंतर्गत सुरू होणार्या ‘मरिन सेंटर ऑफ एक्सलन्स’ संदर्भातील बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुमार यांनी राज्यातील सागरी कासवसंवर्धनातील बदलांविषयी विस्तृतपणे चर्चा केली. याच चर्चेचा आधार घेऊन प्रत्यक्ष किनार्यावर काय परिस्थिती आहे, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
समाजात विविध प्रकारची लोकोपयोगी कार्य करणारी खूप माणसं आहेत. मात्र, आज काळाची गरज ओळखून निसर्गाला आपले मित्र बनविणार्यांपैकी राजीव पंडित हे खासच! त्यांच्याविषयी...
सातार्यातील चाळकेवाडी पठारावरुन, नव्याने शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीचे शोधकर्ते डॉ. अमित सय्यद यांच्याविषयी...
राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवासा राव यांची मुलाखत (pccf wildlife m.srinivasa rao)
सध्या मुंबईनजीकच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाटातील जंगलांमध्ये फुलपाखरांचे थवेच्या थवे दिसू लागले आहेत. काही किमीचे स्थलांतर करून ही फुलपाखरे इथल्या जंगलाच्या आसर्याला आली आहेत. फुलपाखरे स्थलांतर कशा पद्धतीने करतात, त्यांची दिशा काय असते, कालावधी कोणता असतो, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
मासेमारीच्या निरनिराळ्या पद्धती आणि मत्स्यसंवर्धन यांचे अतूट नाते आहे. या दोघांमधील सहसंबंध काही वेळा हितवर्धक ठरतात, तर काहीवेळा मत्स्यप्रजातींच्या जीवावर उठतात. ‘निळ्या देवमाशाच्या शोधात’ या लेखमालिकेमधून आपण या सहसंबंधाचा उलगडा करणार आहोत.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ची उपयुक्तता आणि त्याचे जाणवणारे तोटे हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ‘ए-आय’ने काही क्षेत्रांमध्ये क्रांती करण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे क्षेत्र हे त्यामधील एक. ‘ए-आय’चा वापर करून ओळख पटवण्यामध्ये किचकट ठरणार्या पक्ष्यांची ओळख आपण चुटकीसरशी कशी करू शकतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. याच संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
कोल्हापूरमधील वन्यजीवांच्या संरक्षणाचा वसा उचलून त्यांच्यासाठी खर्या अर्थाने रक्षक ठरलेले प्रदीप अशोक सुतार यांच्याविषयी...
पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे ? Dr. Jane Goodall
(Wildlife Conservation) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात वन्यजीव आणि त्यासंबंधी काम करणार्या संवर्धकांना विशेष स्थान देण्यात आले आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर असो, की वन्यजीव संवर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्काराचे नियोजन असो, वन्यजीवांसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश संकल्पपत्रात करण्यात आला आहे. वन्यजीव क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वन्यजीव संवर्धनामधील अनेक समस्यांवर तोडगा निघ
भारतामध्ये आढळणार्या काही पक्ष्यांची नावे ही ब्रिटिश सैन्यदलातील अधिकारी कर्नल साईक्सच्या नावावरुन देण्यात आली आहेत (Colonel William Henry Sykes). भारतीय पक्ष्यांवर अभ्यास करणार्या बर्याच ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञांपूर्वी आपल्याला कर्नल साईक्स यांचे भारतीय पक्षीसंशोधनामधील योगदान जाणून घेणे आवश्यक आहे (Colonel William Henry Sykes). असे का, तर कर्नल साईक्सने आपल्या पक्षीसंशोधनकार्यात जपलेले भारतीयत्व (Colonel William Henry Sykes).
पक्षीनिरीक्षकांना ‘पक्षीमित्र’ असे का म्हणायचे? ‘पक्षीमैत्रिणी’ (women ornithologists) असे कधीच का कोणी म्हणत नाही? कदाचित ‘पक्षीमित्र’ हा सर्वसमावेशक शब्द असावा असे मानून याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. पक्षीनिरीक्षण क्षेत्रातील महिला पक्षी अभ्यासकांचे योगदान दुर्लक्ष करण्याजोगे नाही (women ornithologists). अशाच काही पक्षीमैत्रिणींचे योगदान या लेखातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...( women ornithologists )
महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. अशा पक्ष्यांचा धावा आपण आता तरी ऐकायलाच हवा (future of bird diversity of Maharashtra). भविष्यात महाराष्ट्रातील काही पक्ष्यांवर संवर्धन आणि संशोधनाच्या अनुषंगाने काम करणे आवश्यक आहे. अशाच काही पक्ष्यांविषयी तज्ज्ञांनी मांडलेली मते...( future of bird diversity of Maharashtra )
ग्रामीण भागात राहून, तिथल्या मातीशी इमान राखून वन्यजीव क्षेत्रासारख्या चोकीरीबाहेरच्या क्षेत्रात काम करणार्या आकाश भीमराव पाटीलविषयी...
Amboli bush frog : या कारणांमुळे आकसला आंबोलीतील बेडकांचा आकार
'डब्ल्यूडब्ल्यूएफ'च्या 'लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट - २०२४' (wwf living planet report 2024) या अहवालनुसार गेल्या ५० वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संख्येच्या सरासरी प्रमाणात ७३ टक्क्यांनी घट झाली आहे. १९७० ते २०२० या सालादरम्यान केलेल्या सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे (wwf living planet report 2024). यामधील सर्वाधिक घट ही गोड्या पाण्यातील परिसंस्थेमधील असून त्यापाठोपाठ जमिनीवरील आणि सागरी परिसंस्थेतील जीवांमध्ये झालेली घट चितांजनक आहे. (wwf living planet report 2024)
(Konkan) विषारी सापांचे माहेरघर कोकणचे किनारी सडे Species & Habitats Awareness Programme. The First Ever Wildlife Video Series In Marathi.
वन्यजीव तस्करी करणाऱ्या बड्या मोहऱ्यासह टोळीचा छडा लावण्यात डब्लु डब्लु ए (वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन) या वन्यजीव संरक्षक संघटनेला यश आले आहे. मेरठहून बांद्रा टर्मिनस (मुंबई) येथे येणाऱ्या ट्रेनच्या एसी कंपार्टमेंटमधुन पोपटांची तस्करी करणाऱ्या रेल्वे अटेंडंटला मुंबई, वनविभाग आणि डब्लु डब्लु ए च्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत क्रॉफर्ड मार्केटमधील वन्यजीव तस्करीतील मुख्य आरोपी मोहम्मद ईब्राहिम याच्यासह चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, एक दुर्मिळ रेड ब्रेस्ट
दुष्काळात होरपळणा-या नामिबियाला अनंत अंबानी यांच्या वनतारा संस्थेकडून मदतीचा हात पुढे केली जाणार आहे.
वन्यजीव अभ्यासक श्रीकर अष्टपुत्रे यांचे गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले. साताऱ्यातील जोर-जांभळी संवर्धन राखीव क्षेत्राच्या निर्मितीसाठी त्यांनी पायाभूत काम केले होते. श्रीकर अष्टपुत्रे हे एका आयटी कंपनीमध्ये काम करत होते. परंतु वन्यजीव क्षेत्राच्या आवडीमुळे त्यांनी या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान अवगत करून वन्यजीव अभ्यासाला सुरूवात केली.
महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात (sahyadri konkan wildlife corridor) ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीला केंद्रस्थानी ठेवून 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने (डब्लूसीटी) कोल्हापूर वन विभाग आणि 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या मदतीने तयार केलेल्या अहवाल कराडमध्ये पार पडलेल्या 'सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदे'त प्रसिद्ध करण्यात आला (sahyadri konkan wildlife corridor). या अहवालात सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्य
समाजमाध्यमांवर ‘साय भाय’ बनून समाजाला वन्यजीवविषयक शास्त्रीय ज्ञानाची लस देणार्या निनाद अमोल गोसावी या अवलियाविषयी..
अमरावतीच्या 'कूला वाईल्ड फाऊंडेशन'ने जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांची (wildlife roadkill) नोंद अॅपच्या मदतीने केली आहे. तीन वर्षांमध्ये फाऊंडेशनच्या संशोधकांनी नागरिकांच्या मदतीने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एकूण ३३६ वन्यजीवांची नोंद केली आहे (wildlife roadkill). या कामाची दखल 'युरोपिअन जर्नल ऑफ इकॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने घेतली असून लवकरच यासंबंधीचा शोध निबंध प्रकाशित होणार आहे. (wildlife roadkill)
मुंबईत समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत वाढलेल्या आणि सागरी संशोधक म्हणून कार्यरत प्राची हटकर यांच्याविषयी...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेलची (cyber cell) निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीप्रमाणे सायबर सेल स्थापन झाला आहे. (cyber cell)
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपात दोन पिल्लांची भर पडली आहे (gadchiroli elephant). बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी या कळपातील माद्यांनी दोन पिल्लांना जन्म दिला आहे (gadchiroli elephant). त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तींची संख्या २६ झाली आहे. (gadchiroli elephant)
वन्यजीव संशोधनामधील ’कॅमेरा ट्रॅपिंग’सारख्या अत्याधुनिक तंत्राची कास धरत चिपळूणमधील (chiplun wildlife) शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या गावांमधील वन्यजीवांची नोंद केली आहे. ’सह्याद्री निसर्ग मित्र-चिपळूण’ यांनी ’डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लि.’ कंपनीच्या सहकार्याने राबवलेल्या ’ई-बायोडायव्हर्सिटी’ प्रकल्पाअंतर्गत मुलांनी आपल्या गावातील जैवविविधतेची नोंद केली (chiplun wildlife). ’कॅमेरा ट्रॅपिंग’च्या माध्यमातून या मुलांनी त्यांच्या आसपासच्या परिसरात वावरणारे पाणमांजर, पिसूरी हरिण, बिबटे, कोल्हे आणि मगरींसारख्या
अकार्यक्षम आणि अपुर्या उपाययोजनांमुळे बांगलादेश व्याघ्र संवर्धनात मागे पडत चालला आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळदेखील पुरेसे आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकारी आणि गैरसरकारी संस्थांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमधून काढलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने आजपर्यंत व्याघ्र संवर्धनासाठी तब्बल ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. आकडेवारी पाहता, २००४ मध्ये ४४० वर असलेली बंगाल वाघांची (पँथेरा टायग्रिस टायग्रिस) संख्या २०१८ मध्ये ११४ वर घसरली. ’जागतिक वन्
'हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा'वरील (samruddhi mahamarg) 'वाईल्डलाईफ ओव्हरपास'वर पहिल्यांदाच वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. या महामार्गावर वन्यजीवांच्या सुखकर हालचालींकरिता 'ओव्हरपास' आणि 'अंडरपास' बांधण्यात आले आहेत. (samruddhi mahamarg) यामधील 'ओव्हरपास'वरुन विविध प्रजातींचे वन्यजीव ये-जा करत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. रस्ते प्रकल्पांमध्ये वन्यजीवांच्या भ्रमणाकरिता अशा प्रकारे 'ओव्हरपास' बांधण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. (samruddhi mahamarg)
फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणार्या तुषार प्रल्हाद काळभोर यांच्या आजवरच्या प्रयोगशील प्रवासाची ही कहाणी...
नागझिर्याचे कायमस्वरुपी निवासी, पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारे पक्षीमित्र, निसर्ग निरीक्षणाच्या आवडीतून सामाजिक बांधिलकी जोपासणार्या किरण पुरंदरे या निसर्गवेड्या माणसाची ही कहाणी...
‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघा’ची (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींची ‘लाल यादी’ कालबाह्य होत चालल्याचे मत पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन शास्त्रज्ञांनी नुकतेच व्यक्त केले. उत्तर थायलंडमध्ये एका नवीन पालीच्या प्रजातीवर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांनी ही भूमिका मांडली आहे. तेथील जैवविविधता जतन करण्याची गरज मोठी आहे. येथील नवीन शोधलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याच्या प्रक्रियेमध्ये (IUCN) लाल यादीचा समावेश आहे.
गोष्ट आहे बांगलादेशमधली, पाच वर्षांपूर्वी जिथे ‘वाघ नाहीसे होतात की काय?’ अशी चिंता भेडसावत होती, तेच सुंदरबन आता वाघांचे नंदनवन झाले आहे. भारत बांगलादेश अशा दोन्ही सीमेवर पसरलेल्या सुंदरबनमधील वाघांची संख्या सकारात्मकरित्या वाढत आहे.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात चिघळलेल्या मानव-हत्ती संघर्षावर उतारा म्हणून ठोस उपाययोजनात्मक बाबी राबवण्याचे निर्देश वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले ( Sindhudurg elephant ). या प्रश्नासंबंधी भागधारकांची बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. बैठकीत उपस्थित गावकऱ्यांनी हत्ती पकड मोहिमेचा ग्राहक धरला, तर वन अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईमध्ये जलदपणा आणण्याच्या अनुषंगाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ( Sindhudurg elephant )
वसईच्या ग्रामीण भागात विरार पूर्वेकडील खार्डी कोशिंबे गावाच्या हद्दीतील तळ्याचापाडा परिसरात अज्ञात हिंस्त्र रानटी प्राण्याने दोन कुत्रे, एक मांजर व गायीचे वासरू फस्त केल्याचे आढळुन आले आहे . मागील पंधरा दिवसांपासून घडलेल्या या घटनेने परिसरातील राहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . तो प्राणी बिबट्याच असावा असे येथील जुने जाणते रहिवाशी सांगत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .त्यामुळे आता या भागातील जंगला शेजारी शेती असलेले शेतकरी संध्याकाळी लवकर घरी परतत आहेत .
अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहराच्या किनारपट्टीवर मृत समुद्री सिंह आणि डॉल्फिन विक्रमी संख्येने वाहून आल्याची घटना नुकतीच घडली. हे जलचर आजारी पडून, निर्जीव होऊन किनार्यावर वाहून आले. याबाबत स्थानिक शास्त्रज्ञांनी आता चिंता व्यक्त केली आहे. जून महिन्यात सुमारे एक हजारांहून अधिक समुद्री सिंह या व्यतिरिक्त ११० डॉल्फिनदेखील मरण पावले. यामध्ये समुद्रात किंवा चॅनेल बेटांवर मरणार्या जलचरांचा समावेश नाही.