लहान मुलाच्या सर्वात जवळ त्याची आई असते आणि तिचे जास्त प्रयत्न असतात ते मूल घडवण्यामागे... परंतु, पैशाअभावी किंवा अज्ञानामुळे काही महिला ते करू शकत नाहीत. म्हणून स्त्रियांना सक्षम करणे व त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या सर्वाचा विचार करून गरीब मुले व महिला यांसाठी ‘सिद्धी’ म्हणजे ‘प्रसिद्धी’ ही आपण म्हणू शकतो. ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्थे’ची स्थापना एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. नावाप्रमाणेच ही संस्था महिलांसाठी कार्यरत आहे. परंतु, गरीब मुले आणि शैक्षणिक कार्यातही या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले
Read More