वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.
Read More
अंधेरी आणि धारावीतील काही भागात ५ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार
पाणी कपात न करण्याचा निर्णय