आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा विधानभवानात सुरू होता. आव्हाडांचा ठिय्या, पोलीसांना लाथाबुक्क्या अशा घटनांनी परिसर दणाणून गेला होता. विधानसभा अध्यक्षांना याबद्दल निवेदन द्यावे लागले. संपूर्ण प्रकरणात काय घडलं? जाणून घ्या या पूर्ण व्हिडिओतून...
Read More
( including 16 sarpanches, 6 corporators, including former chairman join BJP hingna vidhansabha) नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्जवला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
( Chief Minister Devendra Fadnavis in vidhansabha on jaykumar gore case ) मंत्री जयकुमार गोरे यांना अडकावण्यात शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे आणि आ. रोहित पवार यांचा हात आहे. गोरे यांच्याविरोधात तयार केलेले व्हिडिओ आरोपींनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले असून त्या तिघांमध्ये अनेक फोन कॉल झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
Delhi Vidhansabha Election 2025 दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचा संदेश स्पष्ट आहे. दिल्लीकरांनी स्वीकारलेले भाजपचे विकासाचे राजकारण, झिडकारलेले ‘आप’चे भ्रष्ट आणि विचारसरणीहीन कर्कश राजकारण आणि काँग्रेसवर दाखवलेला अविश्वास... तेव्हा, दिल्लीच्या निकालांचा अशा विविध कोनांतून अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
Delhi Vidhansabha 2025 वाल्मिक समाज आणि वंचित महापंचायतच्या सदस्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Vidhansabha 2025) पार्श्वभूमीवर आपविरोधात आंदोलन केले आहे. या निदर्शनादरम्यान, दिल्लीतील लेडी हार्डिंग हॉस्पिटलजवळून जात असलेल्या आपच्या निवडणूक प्रचार करणाऱ्या वाहनाची आंदोलकांनी तोडफोड आंदोलकांनी तोडफोड केली.
Delhi Vidhansabha 2025 अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून २० हजार मतांनी पराभूत होतील, असा दावा आता दिल्लीचे भाजप उमेदवार परवेश शर्मा यांनी केला. त्यांनी कागदोपत्री हा दावा केला आहे. संबंधित कागदपत्रातून त्यांनी अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी दिल्लीच्या लोकांच्या दाराशी जाऊन प्रचार करावा लागेल असे त्यांनी कागदावर नमूद केले आहे.
(Sharad Pawar) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ६ जानेवारीच्या आत सगळे पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. महाराष्ट्रातील निवडणूकीमध्ये नियम पाळले नसल्याचा दावा शरद पवार गटाच्या उमेदवारांनी केला आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना, आम आदमी पक्षाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. रेवडी वाटप करणाऱ्याच्या विचारात असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी घरचा आहेर द्यायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री महिला सम्मान योजना नामक नवी योजना केजरीवाल घेऊन येत आहेत, पण हे करण्याआधी केजरीवाल हे महिन्याकाठी एक हजार रूपये महिलांच्या खात्यात जमा करणार होते, ज्यात त्यांना अपयश आले आहे असे मत, आम आदमी पक्षाचे रविंदर सोलंकी यांनी व्यक्त केले.
(MLA Kiran Samant) शिवसेना आमदार किरण सामंत यांनी नाव न घेता उबाठा नेते तसेच माजी आमदार राजन साळवी यांच्यावर आरोप केला आहे. निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदे यांना गाफील ठेवलं होतं, ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते नंतर माघार घेतली, असा आरोप किरण सामंत यांनी केला आहे.
(CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या 'भारत जोडो (Bharat Jodo) अभियाना'त तब्बल ४० शहरी नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विरोधकांचा खरा चेहरा उघड केला.
(CM Devendra Fadanavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बोलताना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देत चांगलेच सुनावले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मागील ५ वर्षांमध्ये त्यांच्यावर केलेल्या व्यक्तीगत टीका - टिप्पणीसाठी टीकाकारांचे कान उपटले आहेत.
(CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला भाषणातून थेट उत्तर दिले आहे. उबाठा आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या माझं सरकार या शब्दावर आक्षेप घेतला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जाधव यांना खडेबोल सुनावले.
(CM Devendra Fadnavis) विधानसभा जिंकण्यासाठी विरोधकांनी ‘व्होट जिहाद’चा नारा दिला. मालेगाव येथील काही जणांच्या खात्यात ११४ कोटी रुपये जमा झाले. सीराज महंमद याने हे पैसे १४ खात्यांमध्ये वर्ग केले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ राज्यातूंन २०१ खात्यांमध्ये पैसे आले. हे पैसे १ हजार खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. यांतील ६०० कोटी रुपये दुबईतून आले होते. त्यांमधील १०० कोटी रुपये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी वापरले गेले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
महाविकास आघाडी आता विरोधात असल्याने अशी आग लावण्याची कामे करणार - सदाभाऊ खोत Sadabhau Khot | Maha MTB
Vidya Thakur : पुढील पाच वर्षांत गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य असेल, अशी ग्वाही आमदार विद्या ठाकूर यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. महाविकास आघाडीच्या दिग्गजांना पराभवाची धूळ चारत, महायुतीने विधानसभेचे मैदान मारले आहे. अशातच आता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून. निवडून आलेल्या उमेदवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरू आहे. विरोधकांनी दिनांक ७ डिसेंबर रोजी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. घडामोडींच्या याच धमश्चचक्रीत आता राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तिथेच दुसऱ्या बाजूला मविआचा चांगलाच सुपडा साफ झाला. विधानसभेच्या निवडणुकांचा हा निकाल विरोधकांच्या मात्र अद्याप पचनी पडल्याचे दिसून येत नाही. ईव्हीएम वर दोषारोप करण्याचे काम महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र महायुतीचे सरकार कामाला लागले असून, जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सगळे नेते सज्ज झाले आहेत. अशातच आता विधानसभा अध्यक्ष पदी पुन्हा राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड होणार असल्याची माहित
प्रवीण दरेकरांनी राऊतांना चांगलच झापलं!
कलाकारांचे व्हिडिओ किंवा त्यांचे चेहरे वापरुन ते मॉर्फ करत त्याचा गैरवापर करण्याचे अलिकडे प्रमाण फार वाढले आहे. अशात २०२५ मध्ये दिल्लीत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अभिनेते पंकज त्रिपाठी भाजप पक्षा विरोधात प्रचार करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा नसून आम आदमी पार्टीने पंकज यांच्या जाहिरातीमधील एक व्हिडिओ मॉर्फ करुन भाजप विरोधात पंकज बोलत आहेत असं दाखवण्यात आलं आहे.
Harshavardhan Patil : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय विठोबा भरणे यांचा विजय झाला. कधी स्वतंत्र तर कधी काँग्रेसच्या सोबत जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव नेमका का झाला ? एकेकाळी मुख्यमंत्री पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा झाली होती, त्यांची आता पिछेहाट का झाली ? सत्तेची समीकरणं इंदापुर मध्ये नेमकी कशी बदलली ? हेच जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून.
महाराष्ट्रामधील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपला पराभव मान्य करायचाच नाही असा चंग बांधला आहे. पराभवाच्या धक्क्यानंतर, ईव्हीएम वर खापर फोडून स्व:ता नामनिरळे होण्याचा प्रकार आघाडीतल्या नेत्यांनी सुरू केले आहे. अशातच आता एका कथित स्टींग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सय्यद शुजा या युवकाने असा दावा केला आहे की ईव्हीएम मशिन हॅक करून कुठल्यातरी एका पक्षाच्या पारड्यात तो जास्त मतं टाकू शकतो.
Kalyan : रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. प्रसंगी प्रवाशांना आपले प्राण ही गमवावे लागत आहे. त्यामुळे दिवा ते सीएसटी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करणार आहे. कल्याण ग्रामीणचा विकास हेच ध्येय असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
(Balasaheb Thorat) काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. खरंतर महाराष्ट्रातल्या निवडणूक धामधुमीत महाविकास आघाडीकडून मुख्यंमत्रीपदाच्या शर्यतीत असणार हे नाव अशा इतक्या वर्षांपासून मतदारसंघावर पकड असणाऱ्या नेत्याला या निवडणुकीत एका सर्वसामान्य घरातून आलेल्या महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभूत केले. हे नेमकं कसं घडलं? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून.
(Radhakrishna Vikhe Patil) मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवार २८ नोव्हेंबरपासून आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसहीत मविआला खडेबोल सुनावले.
(Jharkhand) झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या विजयानंतर भाजप समर्थकांना धमक्या येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच झारखंडमधील साहिबगंज मोहम्मदपुर गावातील भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांकडून गावातून हाकलून देण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली आहे.
मराठवड्यात जरांगे फॅक्टर फोल का ठरला ? ( Mahayuti )
महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसला पराभव पतकारावा लागला. अशातच आता काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्व एक वेगळाच डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. प्रादेशिक पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा असा मनसुबा काँग्रेस आखत असल्याचा धक्कादायक दावा माजी राजदूत के.सी. सिंह यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या आधीपासूनच महाविकास आघाडीची सत्ता येणार, निकाल लागताच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आणि सत्तेत बसणार, अशी अनेक स्वप्ने मविआतील नेत्यांनी बघितली होती. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री सोडाच पण विरोधी पक्षनेतेपदी बसण्याचीही संधी त्यांना जनतेने दिली नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष. मात्र, जागावाटपापासून तर प्रत्यक्ष मतदानापर्यंत त्यांना कायमच मित्रपक्षांसमोर आपण मोठं असल्याचं वारंवार सिद्ध करावं लागलं. लोकसभेच्या निकालानंतर अगदी आकाशात असलेली काँग्रेस विधानसभेनंतर पार जमि
निकाल येण्याच्या आधीच महाविकास आघाडीत घमासान! MahaVikas Aghadi
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल अखेर जाहिर झाला आणि महायुती सरकारला महाराष्ट्रतील जनतेने कौल दिला. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या तीन्ही पक्षांच्या गळ्यात लोकांनी विजयाची माळ घातली. अशातच आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी लिहीलेलं पत्र व्हायरल झाले आहे.
: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि जनतेने महायुतीला कौल दिला. भाजप सहीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला बहुमत मिळालेले आहेत. महाविकास आघाडीला जनतेने नापसंती दर्शवली असून, मविआचा साफ पराभव झाला आहे. अशातच आता जनतेचा हा कौल आम्हाला मान्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
(Mahayuti) महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचा महानिकाल जाहीर होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
(Charkop Vidhansabha Election Result 2024) भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चारकोप विधानसभा मतदारसंघातून योगेश सागर यांचा ९१ हजार १५४ मतांच्या फरकाने सलग चौथ्यांदा विजय झाला आहे. गेल्या १५ वर्षे ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळीस जनतेने पुन्हा एकदा विजयाचा कौल त्यांने दिला च्या बाजूआहे.
(MVA) विधानसभा निवडणुकीच्या महानिकालाला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. त्यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन चर्चा रंगल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने सलग तिसऱ्यांदा महायुतीला पसंती दर्शवली असून, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार विराजमान होण्याचा अंदाज मतदानोत्तर कलांमधून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे यंदाही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.
(Maharashtra) महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६४.५८% मतदान नोंदवण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या मतदानामुळे हा आकडा वाढला असून सुधारित आकडेवारीनुसार राज्यात एकूण ६५.११% मतदान झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी पाहता ६६ टक्क्यांचा आकडा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
Mangal Prabhat Lodha : ३० वर्षांतील विकासकामांच्या जोरावर मंगल प्रभात लोढा विजयी होतील, असा विश्वास स्थानिक मतदारांनी व्यक्त केला.
दक्षिण मध्य मुंबईत मतदारांचा कौल कुणाला? Mumbai South Central VidhanSabha
Byculla : भायखळ्यातील जनता एकदा फसली, पुन्हा फसणार नाही, असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी व्यक्त केला.
१५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघ : राम भजन कंपाउंड, विक्रोळी पूर्व Vikroli | Maha MTB
१६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ Ghatkopar | Maha MTB
लोकसभा निवडणुकीत पृष्ठभागाखाली असलेला धार्मिक मतदानाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आता उघडपणे समोर आला आहे. काही मुस्लीम संघटनांची मजल मतांच्या बदल्यात बेकायदा आणि अवाजवी मागण्या करण्यापर्यंतही गेली. एकप्रकारे राज्यातील हिंदू मतदारांना हे आव्हान दिले गेले. गंमत म्हणजे, शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणार्या पक्षांनीच या उघड जातीयवादी व घटनाविरोधी आवाहनाला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाला वाचविण्यासाठी हिंदू मतदारांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची गरज आहे. मतदान करणे हे क
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ही विकासाच्या मुद्द्यांबरोबरच ‘व्होट जिहाद’ विरुद्ध ‘मतांचे धर्मयुद्ध’ अशी प्रकर्षाने दिसून आली. त्यानिमित्ताने अलीकडच्या काळात देशभरात घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली असता, हिंदूंची सामाजिक-राजकीय परिघातील एकता, हिंदूंचे हिंदुत्ववादी पक्षांना उत्स्फूर्त मतदान का आवश्यक आहे, त्याची प्रचिती यावी. अशाच हिंदू एकतेचा गजर अधोरेखित करणार्या वर्तमानातील घटनांचे हे प्रतिबिंब...
(Supriya Sule) "गौरव तुम्ही माझ्या फोनचे उत्तर का देत नाही, आता निवडणूका घोषित झाल्या आहेत. आम्हाला बिटकॉईन तातडीने हवे आहेत. आता बिटकॉईनची जी किंमत आहे त्यानुसार त्याला चांगली किंमत मिळणार आहे. तुमच्याकडे बिटकॉईनची रोख रक्कम तुमच्याकडे आहे. मला पैसे हवे आहेत, गुप्ता कुठे गायब आहे. मला माहिती नाही पैशांची गरज आहे," राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेल्या एका ऑडिओ क्लीपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
(Nashik) विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानप्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. याचदरम्यान नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो मतदारांना आणून पैसे वाटप केल्याचा आरोप समीर भुजबळांनी केला आहे.
(Beed) बीड विधानसभा मतदारसंघातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड विधानसभेत एका अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे लोकांमध्ये चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते अबु अझमी यांनी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुफ्ती सलमान अझरी या मौलवीची भेट घेतली. या भेटीदरम्यान ईशनिंदा विरोधी कायदा अस्तित्वात यावा या संबंधी दोघांमध्ये चर्चा झाली.
महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दादर येथे जनसमुदायाला संबोधिदत केले. मोदींना ऐकण्यासाठी हजारो लोक या सभेला जमले होते. याच सभेमध्ये काही विदेशी राजदूत सुद्धा उपस्थित होते जे पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी आले होते.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात आले होते. अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात सभांच्या निमित्ताने आलेल्या पंतप्रधानांची मराठी अभिनेत्याने भेट घेतली आहे. तसेच, त्याने फोटो शेअर करत एक अविस्मरणीय क्षण असं कॅप्शन देखील या फोटोला दिलं आहे.
(Rajesh More) डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तेरा उमेदवार असले, तरी विद्यमान आ. राजू पाटील आणि माजी आ. सुभाष भोईर यांच्याशी मोरे यांची थेट लढत असल्याचे मानले जात आहे. आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. समोर तुल्यबळ उमेदवाद असताना राजेश मोरे येत्या विधानसभेच्या