भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
Read More
“राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल”, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.