पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या गवताळ पठारावर काळ्या रंगाच्या कोल्ह्याचे दर्शन झाले आहे (black jackal). गेल्या वर्षभरापासून हा कोल्हा या भागात वावरत असून गेल्या आठवड्याभरापासून त्याचे पुन्हा दर्शन घडू लागले आहे (black jackal). या कोल्ह्याचा रंग प्रामुख्याने काळा असला तरी, त्याला मेलेनिस्टिक कोल्हा असे म्हणता येणार नाही. (black jackal)
Read More
उरण तालुक्यातील खोपटे-जेएनपीटी रस्त्यावर बुधवार रात्री कोल्हा ( jackal ) जखमी अवस्थेत आढळून आला. ( jackal ) वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या या कोल्ह्याचा बचाव करुन त्याला पुढील उपचाराकरिता मुंबईत दाखल करण्यात आले. ( jackal )
चेंबूरमधील रहिवासी भागातून पकडलेल्या सोनेरी कोल्ह्याला मंगळवारी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. शनिवारी हा कोल्हा अशक्त अवस्थेत चेंबूरमधील रहिवासी भागात आढळला होता. मुंबईतील दक्षिण- पूर्व किनारपट्टी प्रदेशातून कोल्ह्याच्या बचावाची ही पहिलीच घटना आहे. ( jackal chembur )
मालवण तालुक्यातील धामापूर पेठवाडीतील एका ग्रामस्थाच्या विहीरी मध्ये कोल्हा पडलेला आढळून आला. याबाबत वन विभागाला कळवण्यात आले. कुडाळ वन परिक्षेतत्राचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या रेस्क्यू पथकाने सुमारे २० फूट खोल विहिरीतून या सोनेरी कोल्ह्यास सुखरूप बाहेर काढले.
उसाच्या कापणीमुळे आईपासून दुरावलेल्या कोल्ह्याच्या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्यामध्ये वन विभाग सातारा आणि स्थानिक वन्यजीवप्रेमी संस्थेला यश मिळाले आहे. रविवारी रात्री सातारा जिल्ह्यातील जिहे-कटापूर येथे ही घटना घडली.
नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात दर्शन
कोल्ह्याच्या जोडीने दिला पिल्लाला जन्म
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांनी मंगळवारी मध्यरात्री 'गाॅल्डन जॅकल' प्रजातीमधील एका कोल्ह्याला जीवदान दिले. निर्जलीकरणामुळे हा कोल्हा येथील एका इमारतीच्या आडोशाला थकलेल्या अवस्थेत लपून बसला होता. रहिवाशांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वन्यप्राणी बचाव संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या स्वयंसेवकांनी या कोल्ह्याला ताब्यात घेऊन वन विभागाकडे सुपुर्द केले.