ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात, भारतातील समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर देशाच्या जीडीपीमध्ये १६,००० कोटी रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे मालवाहतूक खर्च आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे वस्तूंच्या किंमती ०.५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
Read More
शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून सोमवार दिनांक २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत अर्थात ३८ तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर (वगळून) आणि पनवेलसह दरम्यान अप आणि डाउन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बाधित होणार्या ग्रामस्थांच्या मनात नुकसान भरपाई आणि अन्य मुद्द्यांबाबत मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे.