राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशातच राज्य सरकारने ३१ हजार ७२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
Read More
नेपाळला अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी सकाळपर्यंत पूर्व नेपाळच्या वेगवेगळ्या ठिकाणी किमान ४० जणांचा मृत्यू झाला आहे. काल शनिवार दि. ४ ऑक्टोबर रात्रीपासून, सुरू झालेल्या पावसामुळे नेपाळमध्ये महापूर आला आहे. सोबतच अनेक भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.
बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी- महापूरामुळे बळीराजा फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला असून एसटीच्या कल्याण आगारातील ५० चालक-वाहक कर्मचारी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी शेतकरी बांधवांप्रती माणुसकी जपत आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.
अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली. पण राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत?, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी केला.
राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी दिली.
राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. अशातच जिल्हा नियोजन समितीकडे असलेला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या १० टक्के निधी आपत्तीग्रस्तांना वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेक जिल्हांतील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास'तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'सिद्धिविनायक मंदिर न्यास'चे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती दिली.
राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील एस टी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून, बेजबाबदार वर्तन करुन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या आगारप्रमुखांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी . तसेच अशा प्रकारचे बेजबाबदार वर्तन भविष्यात खपवुन घेतले जाणार नाही! असा सज्जन दम परिवहन मंत्री त
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले.
राज्यात यंदाच्या वर्षी अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पाहणी करून आणि मत्स्य व्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले दि. २५ सप्टेंबर रोजी पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरिस्थिमुळे मराठवाड्यातील शेतीची फार मोठी हानी झाली आहे.हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
(Mumbai Heavy Rain) मुंबईसह राज्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास अखेर सुरु झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून रविवारी जाहीर करण्यात आले. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना धारावीकरांना मात्र वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. गणेशोत्सवापूर्वी झालेला मुसळधार पाऊस आणि इतर विविध कारणांमुळे धारावीतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये मूषकांचा सुळसुळाट वाढला आहे. हा उपद्रव रोखण्यासाठी धारावीकरांनी लाडक्या बाप्पालाच साकडे घातले आहे.
(Patharpunj) देशात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीला महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने मागे टाकले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या पाथरपुंज असे या गावाचे नाव आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हास्यकलाकार समय रैना आणि इतर चार जणांना दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या असंवेदनशील टिप्पणीबाबत यूट्यूब तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक माफी प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.
गेली तीन-चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ॲप आधारित संस्था प्रवाशांकडून आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून अशा आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थावर कडक कारवाई करावी,असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. त्यानुसार गेली दोन दिवस अशा संस्थावर मोटार परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली. सुमारे १४७ ॲप आधारित टॅक्सी सेवावर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३६ टॅक्सी सेवा न
दि. ९ ऑगस्टपासून पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांत अतिवृष्टीने शेतातील पिके जमीनदोस्त केली. प्राप्त माहितीनुसार, आठ लाख हेटर्सवर राज्यात पावसाने पिकांची नासाडी केली, तर पावसाने २१ बळी घेतले आहेत. ही अतिवृष्टी १९ जिल्ह्यांतील १८७ तालुक्यांत झाली असून, ११ जिल्ह्यांत तर दहा हजार हेटर्सपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदेड, वाशीम, हिंगोली, सोलापूर, धाराशिव, सोलापूर, यवतमाळ, अकोला, परभणी, जळगाव आणि अमरावती जिल्ह्यात अधिक नुकसान झाले असल्याने येथे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.
अगदी आकाश खाली कोसळेल असा पाऊस पडतो. त्यामुळे शहरातील खोलगट भागात पाणी साचते. वाहतुकीच्या साधनांवर मर्यादा येते. मग भर पावसात घराबाहेर पडणार्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो, हे चित्र दरवर्षीचेच! पण, यंदा मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नेहमीच येणारा पावसाळा आणि त्यानंतरचा विस्कळीतपणा या सगळ्या गोष्टींची तीव्रता कमी झालेली दिसली. याबद्दल प्रशासन आणि सजग नागरिकांचे अभिनंदन!
(Mumbai Rains Update) मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मच्छीमारांनी खोल समुद्रात जावू नये, असे आवाहन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून त्याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
(Maharashtra Rain Updates) मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासूनपावसाने थैमान घातले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही १९ ऑगस्टला पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकाच्या किनारी भागात मुसळधार पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मागील तीन दिवसांपासून सुरु असलेला पर्जन्यवृष्टीचा जोर दि. १७ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीपासून अधिक वाढला असून नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा नमुंमपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार दक्षतेने कार्यरत असल्याने नवी मुंबईत कोठेही अडचणीचा प्रसंग उद्भभवलेला नाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईत विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.
मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी
मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत सरासरी १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे.
: (Mithi River flood Alert) मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अतिमुसळधार पावसामुळे कुर्ला पुलावरील क्रांती नगर येथे मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग पाऊस असाच सुरू राहिल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचे सर्व यंत्रणांना निर्देश ; आपत्कालीन नियंत्रण कक्षात घेतला परिस्थितीचा आढावा अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी दिले. राज्यभरात सुरु असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात परिस्थितीचा आढावा घेतला.
(Mumbai Rains Update) गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. मुंबई उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्कालीन पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी मुंबई तसेच ठाणे
(Maharashtra Rain Update) गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. मुंबईत शुक्रवारपासून संततधार पाऊस कोसळत आहे. सलग तिसऱ्याही दिवशी पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्याच्या प्रभावामुळे पुढचे दोन दिवस म्हणजेच १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले आहे. दरम्यान, आता मुंबई महापालिकेकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
(Vasai-Virar Heavy Rainfall) गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. वसई- विरारमध्येही सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विरार पश्चिम येथील युनिटेक सोसायटीमधील जवळपास ३५ ते ४० इमारती पाण्याखाली गेल्या आहेत.
राज्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे. तसेच त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी दिले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते १६ ऑगस्ट सकाळी ८.३० पर्यंत सरासरी १३४.६८ मिमी. आणि १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० पर्यंत सरासरी १०५.७० मिमी. पावसाची नोंद झालेली आहे. तसेच आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ४३.२० मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
(Solapur Heavy Rain) सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत सोलापूरमध्ये १०६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी ४ ऑगस्टच्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा पाऊस झाल्याची माहिती आहे.
केडीएमसी हद्दीतील रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह प्रवासी आणि सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या महापालिकेने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाची पाहणी बुधवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली. कामाचा दर्जा राखा अन्यथा ठेकेदाराची हयगय केली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी अधिकारी वर्गासह खड्डे बुजविणाऱ्या ठेकेदारांना दिला आहे.
मुंबई शहरातील पावसाचे प्रमाण आणि पूरस्थितीचा अचूक अंदाज घेण्यासाठी आयआयटी मुंबई आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी एकत्र येऊन एक नवी हायपरलोकल रेन अँड फ्लड अलर्ट सिस्टिम सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे मुंबईतील विविध परिसरांमधील पर्जन्यमानाची अचूक माहिती आणि पाण्याच्या साचण्याबाबत तात्काळ सूचना दिल्या जातील. या प्रणालीमुळे नागरिकांना वेळेत सावधगिरी बाळगता येईल आणि स्थानिक प्रशासनालाही मदत होणार आहे.
अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी शनिवारी सांगितले.
धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबईची तुंबईची झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेलाही बसलेला दिसून येत आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांना केले आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना शनिवार दिनांक २६जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत तशा प्रकारचे परिपत्रक शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ रोजी ऑरेंज आणि दिनांक २६ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा, रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे.
मुंबई शहरासह उपनगरात सध्या पावसाची तुफान बँटिंग सुरू आहे. मुंबईतील सर्वच भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा दि. २७ जुलैपर्यंत मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) २५ आणि २६ जुलैदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईसाठी पुढील काही दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. सोमवारपासून गुरुवारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक, रेल्वे आणि विमानसेवा यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या दिशेने येणारे एअर इंडियाचे विमान सोमवारी २१ जुलैला सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँन्डिंगच्या वेळी धावपट्टीवरून बाहेर सरकल्याची घटना घडली. सतत पडणाऱ्या पावसामुळे धावपट्टीवर पाणी साचल्याने विमान उतरतेवेळी धावपट्टीच्या बाहेर गेले.
जगात प्रत्येक क्षेत्रात वेगाने विकास होत असताना, अलीकडे भारताने केलेली प्रगतीदेखील नोंद घेण्यासारखीच. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्किल इंडिया’तून त्याचे प्रभाव सर्वदूर दिसत आहेत. नुकत्याच जगातील एका सर्वांत मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने, आपली पहिली ‘सिटीज ऑन द राईज लिस्ट’ लॉन्च केली आणि त्यात भारतातील टॉप दहा शहरांवर प्रकाश टाकला. रोजगार बाजारपेठ आणि आर्थिक संधी वाढणार्या या देशातील महानगरात, महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश असल्याने आगामी काळात हे महानगरदेखील गतीने विकास करेल. हे झपाट्याने विक
श्रावण मास काळात सण आणि व्रत वैकल्य मोठ्या प्रमाणावर केले जातात. असा हा श्रावण अगदी जवळ आल्याने विविध प्रकारच्या फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे. श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुलबाजार गजबजण्यास सुरुवात झाली आहे. या संपूर्ण ३० दिवसांसाठी फुले उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. या काळात सजावट व पुजेसाठी फुलांची खरेदी केली जाते. मात्र, यंदा फुलबाजारावर अवकाळी पावसाची छटा असल्याने मागील दहा ते १५ दिवसांपासूनच सर्वच फुलांचे दर चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. फुलांच्या दरामध्य
अपंग व्यक्तींविषयी असंवेदनशील भाष्य केल्याच्या प्रकरणी कॅामेडियन समय रैना, विपुन गोयल, बलराज सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांना मंगळवार, दि.१५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.जयमाला बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि त्याचा उपयोग इतरांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करण्यासाठी होऊ शकत नाही.”
हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसाने रौद्र रूप घेतले असून, राज्यात मोठा विध्वंस झाला आहे. २० जूनपासून ६ जुलैपर्यंत सातत्याने पाऊस सुरूच आहे. या काळात तब्बल १९ वेळा ढगफुटी झाली आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात २३ ठिकाणी पूर आला आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन घडले आहे. त्यामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतील ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘रंग मल्हार’ या कलाप्रदर्शनात महिला चित्रकारांच्या सशक्त अभिव्यक्तीची प्रचिती येते. त्यांच्या या अभिव्यक्तीमध्ये पावसाची, निसर्गाची वेगवेगळी रूपं उमटलेली बघायला मिळतात. अशा या कुंचल्यातून साकारलेल्या अभिव्यक्तीचा घेतलेला हा आढावा...
(Maharashtra Weather Update) राज्यात सध्या काही भागात जोरदार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ४ जुलै आणि ५ जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(Delhi) दिल्लीमध्ये हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ ते ११ जुलै दरम्यान, पहिल्यांदाच क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) द्वारे कृत्रिम पावसाची चाचणी करण्यात येणार आहे. आयआयटी कानपूरच्या तांत्रिक साहाय्याने हा प्रयोग करण्याची दिल्ली सरकारची योजना आहे. दिल्लीतील प्रदूषण पातळी वाढल्यामुळे, सरकारने हा निर्णय घेतला आहे.