अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपाटांचे रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १०६२ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये विशेष प्रिमियर आयोजित करण्यात आला होता ज्याच्यासाठी अल्लू अर्जूनसह रश्मिका मंदाना आणि इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात एका महिलेला जीव गमवावा लागला होता.
Read More
'पुष्पा २: द रुल' हा अल्लू अर्जूनचा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत ‘पुष्पा २’ चित्रपटाने १४०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रिमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला होता. आणि त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. श्रीतेज असं त्या मुलाचं नाव असून या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका
‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन प्रेक्षकांचा आवडता अभिनेता झाला आहे. 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढून नवा इतिहास रचला आहे. दरम्यान, जितका या चित्रपटात अल्लू अर्जूनचा अभिनय गाजला त्याच प्रमाणे अभिनेता फहाद फालिसच्याही अभिनयाची तितकीच चर्चा झाली. पण या चित्रपटातील त्याची भूमिका कदाचित फारशी प्रेक्षकांना आवडली नसल्यामुळे अशी माहिती मिळत आहे की फहाद फासिल 'पुष्पा ३'मध्ये दिसणार नाही.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट चित्रपट पुष्पा २ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापुर्वीच रेकॉर्ड मोडला होता. आणि आता ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांमध्येच ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनीत पुष्पा २ या चित्रपटाची ३ वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहात होते. अखेर ५ डिसेंबर २०२४ रोजी पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला असून लवकरच पुष्पा ३ येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पुष्पा २ चित्रपटासाठी प्रेक्षकांना तीन वर्ष वाट पाहावी लागली होती. आता पुष्पा ३ साठी किती वेळ वाट पाहावी लागणार हे समोर आलं आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनिक पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात तेलुगू भाषेसह हिंदी, तमिळ, कन्नडा आणि बंगासी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापुर्वीच प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि आता बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली आहे. मात्र, चित्रपटाचा निर्मात्यांना मोठा धक्का लागला आहे कारण हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे.
लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहिर होणार आहे. सध्या सगळ्यांचेच लक्ष निकालाकडे लागले असले आहे. अशात आता भारताचे पहिले निवडणूक आयुक्तांच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे. विद्या बालन यांचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.