राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर ‘महामेष’ योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरू करण्यात आली. या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा, म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली.
Read More