हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने हा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या निर्णयानंतर, भारत आणि इतर देशांतील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चित आहे.
Read More
( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्
ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील पाच शाळांमध्ये शौचालय बांधकामाचे कार्य जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC Re) आणि विरांगणा महिला मंडळ (VMM Foundation) यांच्या संयुक्त CSR उपक्रमांतर्गत यशस्वीरित्या पूर्ण झाले. या उपक्रमाचा लाभ किनवली, मुगाव, नारायणगाव, वेलोली आणि उमरई या गावांतील विद्यार्थ्यांना झाला आहे.
Subjects beyond exams for students गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल संस्थेतर्फे दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याण मधील सुभेदार वाडा शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 'परीक्षेपलीकडेल विषय' या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक डॉ उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे वैभव ठाकरे आणि भाग्यश्री ठाकरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे दैनिक 'मुंबई तरूण भारत' आणि वेब पोर्टल 'महा एमटीबी' हे माध्यम प्रायोजक होते.
छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमधील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. इतिहास, विज्ञान, संस्कृती आणि कला यांसारख्या विषयांमध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी च्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
( Take aptitude test of 16 lakh students of class 10th BJP Anil Bornare demand to the Education Minister ) दहावीनंतर करिअरची दिशा ठरविणारी कलचाचणी चार वर्षांपासून बंद असून ही कलचाचणी सुरू करण्याची मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
Kashi University campus पंजाबमधील भटिंडामध्ये गुरू काशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिहार येथून आलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, बिहारमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली होती. हाडे तुटली असून विद्यार्थी रक्तबंबाळ दिसत होती आणि मदतीसाठी ओरडाओरड करत होती.
(Indian Student Ranjani Srinivasan Self-Deports) अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिने स्वतःहून देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु असून, सर्व विद्यार्थी अभ्यासात गर्क आहेत. आता परीक्षा म्हटले की, चिंता, तणाव हे ओघाने आलेच. पण, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही परीक्षेच्या काळातील तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास, ‘परीक्षेचा काळ सुखाचा’ असे म्हणता येईल. त्यासाठी नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख...
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या दीर्घकालीन सत्तेला संपुष्टात आणले. जगभरातील काही माध्यमांनी याला ‘ऐतिहासिक’ आणि ‘लोकशाहीचा विजय’ म्हणून सादरही केले. पण, खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे की, हा लोकशाहीचा विजय होता की सत्तांतराच्या प्रयोगाचा एक भाग? आणि हे विद्यार्थी नेते, ज्यांना आत्तापर्यंत ‘क्रांतीचे नायक’ म्हणून गौरवले जात होते, ते खरोखरच देश चालवण्याइतके सक्षम आहेत का? ‘नाहिद इस्लाम’ या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून सक्रिय राज
आजपासून इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा! एव्हाना सर्व विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारीही पूर्ण झाली असेल. तेव्हा, एकूणच या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी काय करावे, पालकांची भूमिका काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख...
९०च्या दशकात औद्योगिक प्रशिक्षणासारखी ( Development Trainer ) वेगळी वाट निवडून शेकडो आदिवासी विद्यार्थिनींना लघुउद्योजिका बनविण्यासाठी प्रयत्न करणार्या दिपाली कुलकर्णी यांच्याविषयी...
(Delhi Bomb Threats) दिल्लीतील विविध शाळांना बॉम्बच्या धमक्या असलेले ईमेल पाठवल्याचे प्रकरण सोडवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थी बारावीच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.
(Republic Day) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी २६ जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. तसेच याबाबत सरकारने परिपत्रकही प्रसिद्ध के
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ( Central Govt. ) ‘नो डिटेन्शन’ धोरणात बदल करून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुत्तीर्ण न करणे धोरण रद्द करण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार इयत्ता पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थीवर्गात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील वर्गात पाठविण्यात येणार नाही.
मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( C. P. Radhakrushnan ) यांची शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे भेट घेऊन संवाद साधला. ‘नेहरू युवा केंद्र संघटन संस्थे’तर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते. “काश्मीर हा भारताचा सर्वात सुंदर प्रदेश आहे आणि जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते,” असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणा
Mohammad Shahid उत्तर प्रदेशातील अमरोह येथे एका कट्टरपंथी शिक्षिकाने एका हिंदू अल्पवयीन विद्यार्थिनींवर निकाह करण्यासाठी दबाव आणला. शिक्षकाचे नाव शाहिद असे असून पीडित विद्यार्थीनीचे धर्मांतरण करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. त्याने पीडितेचा हात पकडून तिच्यावर विनयभंग केला. यामुळे शिक्षकाने अल्पवयीन मुलाला १ लाख रूपये दिले. हा जर विवाह अमान्य केला तर नापास करेल अशी धमकी देण्यात आली असून याप्रकऱणात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दिवाळी उत्साहात संपन्न झाल्याने आता भारतात शाळा पुन्हा एकदा सुरु होतील. त्यानंतर सहामाही परीक्षेचे गुणही समोर येतील. आपण परीक्षेत उधळलेले गुण काय रंग दाखवतात, याची धाकधुक एव्हाना परीक्षार्थींच्या मनात सुरु झालेली असतेच. अर्थात, गुण किती मिळतील, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना काय सांगायचे, हाच मुद्दा त्यात अधिक असतो. ‘मार्क्स’वादाचे हे विकृत स्वरुप फक्त भारतातच फोफावले आहे, अशातील बाब नाही, तर पाश्चात्य देशांतदेखील पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
( ITI )काही विद्यार्थी आदिवासी समाजातून इतर धर्मात धर्मांतरण करून देखील आदिवासींसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेत असल्याचे २०२३ सालच्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेदरम्यान निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात सखोल चौकशीचे निर्देश दिले होते.
नवी दिल्ली : ( PM Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विद्यालक्ष्मी या नवीन केंद्रीय क्षेत्रातील योजनेला मंजुरी दिली आहे. याद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत, दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी, शिक्षण शुल्क आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून तारणमुक्त, गॅरेंटर फ्री कर्ज मिळविण्यास पात्र असेल. ही योजना एका
उमर खालिद... २०२०च्या ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरोधी दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनामागचा एक चेहरा. ‘जेएनयुचा विद्यार्थी नेता’ म्हणून मिरवणार्या उमर खालिदवर दिल्लीत हिंसाचार आणि दंगली भडकाविण्यासारखे गंभीर आरोप आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्यावर असतानाही, खालिदने अशीच भडकाऊ विधाने केली होती आणि त्यानंतरच दिल्लीत दंगली उसळल्या होत्या.
काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिनी नायक यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या राधिका खेरा यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Hindu Students Injustice शाळेत नमाजी टोप्या परिधान केलेल्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसायला सांगतात असा दावा विद्यार्थ्याने केला. आयशा नावाच्या शिक्षिकेवर हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप करत सुनावले आहे. शाळेत नमाजी टोप्या घातल्या जातात मात्र कपाळावर टीळा लावलेला चालत नसल्याची व्यथा स्वत: विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याचे नाव मयंक असून त्याने शाळेत सुरू असलेल्या प्रकाराबाबत सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील ही धक्कादायक घटना आहे.
Waynad Landslide Victim वायनाडमध्ये डुकरांच्या मांसविक्रीवर कट्टरपंथी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्तांना वाचवण्यासाठी केरळच्या काही कम्यिनिस्ट विद्यार्थी संघटनांनी डुकराचे मांस विकले. मिळालेल्या निधीतून भूस्खलनग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. मात्र, यामुळे आता केरळातील कट्टरपंथी तसेच काही मौलवी संतापले आहेत. डुकराचे मांस विकल्याने कट्टरपंथींच्या भावना दुखावल्या आहेत. १० ऑगस्ट रोजी कासारगोडच्या राजापुरम भागात डुकराचे मांस विकल्याची घटना घडली असून यामुळे वाद निर्माण झाला आहे.
बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ( बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता .
प्रभू रामचंद्र आणि मुघल राजा अकबर यांची तुलना करण्याचा अगोचरपणा दिल्लीतील स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षिका शुभ्रा रंजन यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शुभ्रा रंजन “प्रभू रामचंद्र प्रशासकीयदृष्ट्या अकबरापेक्षा कमजोर होते,” असे विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात.
मुंबई आणि पुणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु आहे. दरम्यान काही विद्यार्थांना पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता, ही अडचण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना सांगितली असता जे परिक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत,
बांगलादेशात आरक्षणविरोधी हिंसाचार भडकल्यानंतर ४,५०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. यासोबतच परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, नेपाळमधील ५०० विद्यार्थी, भूतानचे ३८ आणि मालदीवमधील एक विद्यार्थी बांगलादेशातून भारतात पोहोचला आहे. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालय भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर पोलिसांनी मदरशात ९ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. बुधवार, दि. ३ जुलै मदरशाच्या एका हाफिज आणि मौलवीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. हाफिजचे नाव दिलनवाज, तर मौलवीचे नाव रकीमुद्दीन आहे. या दोघांनी शनिवार, दि. २९ जून २०२४ मदरशात मुलावर अनैसर्गिक बलात्कार केला.
बांगलादेशच्या बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिकणाऱ्या उत्सब कुमार ज्ञान या हिंदू विद्यार्थ्याला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून कट्टरपंथी जमावाने बेदम मारहाण केली. उत्साबने सोशल मीडिया ग्रुपवर प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आधी 'अपमानास्पद संदेश' पोस्ट केला आणि नंतर तो डिलीट केल्याचा आरोप आहे.
उत्तराखंडमधील मदरशांमध्ये बिगर-मुस्लिम मुलांना इस्लामिक शिक्षण दिले जात असल्याचे समोर आले आहे. या मुलांची संख्या १९६ असल्याचे सांगण्यात येत आहे. काही मदरशांचे सरकारी शाळांशी संबंध असल्याचेही आढळून आले आहे. तरीही सर्व सरकारी मानकांची पूर्तता करण्यात आलेली नाही. राज्यातील या मदरशांमध्ये भारतातील अनेक राज्यांतील विद्यार्थी दाखल झाल्याचे आढळून आले.
कर्नाटकातील हुबळी येथे नेहा हिरेमठ या २४ वर्षीय तरुणीची फयाझ नावाच्या मुलाने चाकू भोसकून हत्या केली. नेहा हिरेमठ या काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती. फयाझने महाविद्यालयाच्या आवारात तरुणीवर वार केले.ही घटना बी व्ही भूमराद्दी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडली. नेहा तिथे MCA च्या प्रथम वर्षात शिकत होती. बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथील फयाझ हा याच महाविद्यालयातून बीसीएचे शिक्षण घेत होता आणि तो नेहाचा वर्गमित्रही होता.
केरळसारख्या सुशिक्षित राज्यात एकीकडे डाव्या सरकारविरुद्ध खंबीर भूमिका घेणारे राज्यपाल दिसून येतात, तर दुसरीकडे या देशात जन्म घेऊनही ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास एक महिला नकार देते! देशविरोधी, देशविघातक शक्ती त्या राज्यात विषारी बीजे कशी पेरत आहेत, त्याची कल्पना यावरून येते. पण, अशा विषवल्लीच्या विरुद्ध राष्ट्रवादी शक्ती त्या राज्यात पाय घट्ट रोवून उभ्या राहत आहेत, भारतविरोधी शक्तींना समर्थपणे तोंड देत आहेत. एक ना एक दिवस ही विषवल्ली राष्ट्रवादी शक्ती उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत!
विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देणे, महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांचा शोध घेणे आणि नवउद्यमींचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिले आहे. स्थानिक पातळीवर उद्योजक घडावेत, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. २६ जानेवारी रोजी दिली.
राज्य सरकारने राज्याला प्राप्त झालेल्या अधिकाराचा विचार करत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गात विद्यार्थी किमान उत्तीर्णतेसाठी आवश्यक असलेले मार्क मिळू शकला नाही, तर विद्यार्थी त्याच वर्गात राहू शकेल, असा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. त्यामुळे आपल्या राज्यात पाचवी आणि आठवीला काही प्रमाणात विद्यार्थी क्षमता प्राप्त नसल्यास, त्याच वर्गात नापास होऊ शकतील. त्या निर्णयाचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणामही समोर येण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना मदरशांमध्ये शिकणाऱ्या हिंदू मुलांसह गैर-मुस्लिम मुलांची ओळख पटवण्याच्या निर्देशाचे पालन करण्यात विलंब केल्याबद्दल समन्स बजावण्यात आला आहे.
मुझफ्फरनगरमधील एका महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींनी बुरखा घालून नुकताच रॅम्प वॉक केला म्हणून, ‘जमियत-ए-उलेमा’चे मौलाना मुर्करम कासमी म्हणाले की, “त्यांनी मुसलमानांच्या भावना भडकावल्या आहेत. बुरखा हे कोणत्याही फॅशन शोचा हिस्सा असूच शकत नाही.“ चांगल्या घरच्या मुस्लीम मुलींनी पूर्ण पोषाखात रॅम्प वॉकही करायचे नाही, असे म्हणणारे लोक या समाजात आहेत.
ठाणे महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीत शिक्षण घेणार्या सात हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) ही भारतीय उपखंडातील १४० वर्ष जुनी सर्वांत मोठी पर्यावरण संशोधन संस्था आहे.
मणिपूर पोलिसांनी शुक्रवारची सुट्टी बेकायदेशीरपणे घोषित केल्याप्रकरणी एका विद्यार्थी संघटनेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. जॉइंट स्टुडंट्स बॉडी ऑफ मणिपूर नावाच्या विद्यार्थी संघटनेने दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सांगितले होते की आता राज्यात शुक्रवारी सुट्टी असेल.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर येथे अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला-मुलींसाठी आयटीआय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे आयटीआय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या सहकार्याने सुरु करण्यात येणार आहे.
ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या विवाहितेवर तिच्या पतीसमोरच ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी कॉलेजला सुट्टी संपवून पतीसोबत घरी जात होती. तसेच आरोपींनी पीडितेला मारहाण करून लुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेस्थानी ३ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यातच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सद्दाम खान आणि इम्तियाज अली फरार आहेत. दोघेही काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) शी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या निषेधार्थ ABVP कार्यकर्त्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी निदर्शने केली.
ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०१४ रोजी ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधांमुळे बोजवारा उडाला आहे.गेल्या अनेक दिवसापासून वीज पुरवठा खंडित,पाणी पुरवठा बंद,भिंतीच्या प्लास्टरची पडझड, जागोजाग साचलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेची वानवा आदींमुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजयुमो आणि युवासेनेच्या (शिंदे गट) यांच्यावतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.तसेच, दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दि
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील एका सरकारी उच्च माध्यमिक शाळेत 'जय श्री राम' लिहिल्याबद्दल शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली. कठुआ जिल्ह्यातील बानी भागात दहावीच्या एका हिंदू विद्यार्थ्याला मुख्याध्यापक आणि शिक्षकाने ब्लॅकबोर्डवर 'जय श्री राम' लिहिल्याबद्दल मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
फायनान्स व अकाऊंटिंगशी संबंधित कोर्सेसमध्ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थीनींच्या संख्येमध्ये २५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे झेल एज्युकेशन या भारतातील आघाडीच्या फायनान्स व अकाऊंट्स एड-टेक व्यासपीठाने नुकतेच केलेल्या संशोधनामधून निदर्शनास आले. या वाढीचे श्रेय अनेक घटकांना जाते,ज्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वाचे वाढते प्रमाण त्यांना याच क्षेत्रामधील त्यांचे ज्ञान व कौशल्ये अधिक निपुण करण्यासाठी संधींचा फायदा घेण्यास प्रेरित करत आहे. दुसरी
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' चे आयोजन केले आहे राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत व शैक्षणिक संस्थांना दि. 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करून सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.
ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडीओ मध्ये एनसीसी युनिट हेड विद्यार्थ्याकडुन कनिष्ठ विद्यार्थ्याना प्लास्टिक रॉडने बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. या चित्रणामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांनी छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण या शाळेतील विद्याथ्र्यासोबत गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला. अभिनव शाळेत यंदाच्या वर्षी तब्बल दोनशे नवीन प्रवेश झाले. त्याबद्दल हेमलता पवार यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा:यांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आहे.
आपल्या अल्प अशा आयुष्यामध्ये विलक्षण काम करताना जयंतरावांनी भारतीय विज्ञान तथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावरील दृष्टिक्षेप यावर मौलिक कार्य केले. भारत सरकारच्या भारतीय स्वातंत्र्याच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जयंतरावांनी हा विषय जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले.