मुंबई : आयटी जगतातील आशियातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असलेली इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी तब्बल ३१५ कोटींचे दान केले आहे. आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी राहिलेले नंदन यांनी या संदर्भात एक निवेदन सादर केले आहे. ही रक्कम त्यांनी आपल्या कारकीर्दीत महत्तावाचा भाग असलेल्या आयआयटी बॉम्बेला दान केले आहेत. त्यांनी दान करतानाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून आयआयटी बॉम्बे आपल्या करियरमध्ये महत्त्वाचा भाग आहे.
Read More
जगातील श्रीमंतांच्या यादीतील अव्वल असणारे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठे विधान केले आहे. 'भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जनतेची गरीबी दूर होण्यास मदत होऊ शकते, त्यासाठी सरकारने आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे.', असे ते म्हणाले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातली आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच इन्फोसिसचे समभाग १६ टक्क्यांनी घसरले. इन्फोसिसच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळेच हा परिणाम जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा फटका गुंतवणूकदारांना बसला.
आधार प्रणालीचे प्रणेते आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी आता डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात क्रांती आणणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आणि ‘सामान्य माणसाचा अधिकार’ असणारा ‘आधार’ सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला जोरदार लक्ष्य केले.
मतिमंदांचे ‘प्रारब्ध’ बदलविणारे ‘आधार’ !