अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक असलेली ‘पंचायत’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या चौथ्या सिझनचा ट्रेलर आज ११ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Read More
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात बुधवार, २६ मार्च रोजी रघुनाथ धोंडो कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
'जय जय स्वामी समर्थ’ या सुप्रसिद्ध मालिकेच्या सेटवर भेट देण्याचा नुकताच योग आला. तिथे पोहोचल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. मालिकेतील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ सगळ्यांचाच हा केवळ एक कामाचा भाग नाही, तर त्यांच्यासाठी हा एक आध्यात्मिक प्रवास ठरला आहे. मी समर्थांचे नाव जरी घेतले, तरी मन शांत होते. मनातील अस्वस्थता दूर होते आणि भक्तिभाव अधिक गहिरा होतो. त्यांच्या स्मरणाने संकटांवर मात करण्याची नवी ऊर्जा मिळते.
ठाणे : “आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, निरामय जीवन जगता येते. मात्र, बदलत्या काळानुसार आरोग्यनीती बदलली आहे. काळाच्या ओघात अनेक घरगुती उपाय सांगणारा आजीबाईचा वटवा काळाच्या ओघात लोप पावत आहे. ही रुढी, परंपरा आपणच जपली पाहिजे,” असा मौलिक ( Rambhau Mhalgi ) सल्ला वैद्य सुविनय दामले यांनी दिला.
पणजी : “राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी ( Manoj Bajpayee ) यांनी ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेतला होता. यावेळी, संवाद साधताना त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला भक्कम होण्यासाठी स्वतंत्र चित्रपटांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असून त्यामुळेच जगभरात आपली छाप उमटेल,” असा विश्वास व्यक्त केला.
सध्या चित्रपट असो किंवा वेबसीरीज भयपट आणि हॉरर कॉमेडी कलाकृतींना प्रेक्षक विशेष पसंती देताना दिसत आहेत. अशातच आता 'पौर्णिमेचा फेरा’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर ही वेबसिरीज झळकली आहे.
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांना पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत. यात ‘रेहना है तेरे दिल मै’, ‘रॉकस्टार’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश असून राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ हा चित्रपटही या यादीत येतो. दरम्यान, लवकरच लोकप्रिय ‘रामायण’ हा अॅनिमेशनपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंत अशी एकही व्यक्ती क्वचित असेल ज्यांनी हे अॅनिमेटेड रामायण पाहिले नसेल.
(Konkan) विषारी सापांचे माहेरघर कोकणचे किनारी सडे Species & Habitats Awareness Programme. The First Ever Wildlife Video Series In Marathi.
अभिनेता रितेश देशमुख लवकरच मराठी बिग बॉसच्या पर्वाचं सुत्रसंचलन करणार असल्यामुळे चर्चेत होताच. पण आता तो ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवण्यास सज्ज झाला आहे. रितेश देशमुखने ओटीटीवर पदार्पण केले असून 'पिल' या वेब सीरिजच्या माध्यमातून तो फार्मा उद्योगातील सत्य उघडकीस आणणार आहे. या सीरीजचा ट्रेलर लाँच नुकताच झाला.
क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोने (Zepto) कंपनीने ६६५ दशलक्ष डॉलर्सने आपले फंडिग वाढवले आहे. तशी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, सिरीज एफ (Series F) फंडिगमधून हा निधी कंपनीने जमा केला आहे. या निधीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात मोठी वाढ होत अस्तित्वात असलेल्या ३.६ अब्ज डॉलर्सवरून दुप्पटीने वाढला आहे. या सिरीज एफ मध्ये Stepstone Group, Nexus Venture Partners, Glade Brook Capital, Goodwater, Lachu Groom या कंपन्यांचा समावेश आहे.
‘सैराट’ हा मराठी चित्रपटसृष्टीला सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी आत्तापर्यंत ‘फॅंड्री’, ‘झुंड’ असे दर्जेदार चित्रपट दिले. आता वेब सीरीजच्या माध्यमातून ते ओटीटी माध्यमावर येत असून ‘मटका किंग’ ही वेब सीरीज ते दिग्दर्शित करणार आहेत. विशेष म्हणजे 'मटका किंग'मध्ये अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत मराठमोळे कलाकार झळकणार आहेत.
सध्या सर्वत्र पंचायत ३ वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. कथानकासोबतच प्रत्येक कलाकारही प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. यातील प्रल्हाद चाचा अर्थात फैजल मलिक यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यामुळे नोकरी गेल्याचा एक किस्सा सांगितला आहे.
लोकप्रिय वेब सीरीज पंचायत या सीरीजचे दोन्ही भाग प्रेक्षकांचा फार आवडले. यानंतर तिसरा भाग कधी येणार याची वाट पाहात असताना आज (२८ मे २०२४) पासून Amazon Prime Video वर पंचायत सीझन ३ प्रदर्शित झाला आहे. परंतु, प्रदर्शित होताच संपुर्ण सीझन Leaked झाल्याची घटना समोर आली असून मेकर्सना मोठा धक्का बसला आहे.
प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच धमाकेदार विषय प्रेक्षकांकरिता घेऊन येतचं असतो . 'रानबाजार'च्या जागतिक यशानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला 'पुरुष' ही नवीन वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. नुकतेच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या वेबसिरीजची घोषणा करण्यात आली असून या टीझरला रसिकांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.
विविध वस्तूंचा संग्रह करणारी जगभरात अनेक माणसे असतात. मात्र, अशा अनोख्या संग्राहकांना एकत्र आणणार्या नाशिकच्या छंदोमयी प्रसाद देशपांडे यांच्याविषयी...
अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या फॅमिली मॅन या वेब सीरीजची क्रेझ प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. 'फॅमिली मॅन ३' (Family Man 3) कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. फॅमिली मॅनचे दोन सीझन लोकप्रिय झाल्यानंतर आता तिसरा सीझन लवकरच येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'फॅमिली मॅन ३' (Family Man 3) च्या शूटींगला सुरुवात झाली असून श्रीकांत तिवारीला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
'चंद्रा' या गाण्यामुळे अधिक लोकप्रिय झालेली अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसत आहे. अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने (Amruta Khanvilkar) हिंदी मनोरंजनसृष्टीतही नशीब आजमावलं. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या चित्रपटांत ती झळकली आहे. आणि आता लुटेरे या वेब सीरीजच्या माध्यातून तिने ओटीटीवर पदार्पण केले आहे. याच लुटेरे सीरीजच्या शुटींगदरम्यानचा एक भयावह किस्सा नुकताच तिने एका मुलाखतीत सांगितला.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेल्या सावरकरांचे संपुर्ण जीवन या चरित्रपटात रणदीपने मांडले आहे. या चित्रपटाबद्दल आपले मत नोंदवताना सिद्धांत बनकर याने ‘महाएमटीबी’शी बातचीत करताना, “खरं हिंदुत्व जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryveer Savarkar) चित्रपट आवर्जून पाहावा”, असं तरुणाईला आवाहन केले आहे.
मालिका, नाटकांपासून ते अगदी चित्रपटांपर्यंत, आजवर विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या मुक्ताच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्याकोर्या चित्रपटाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तिच्याशी साधलेला खास संवाद.
चित्रपटगृहांपेक्षा घरबसल्या किंवा कुठेही प्रवास करताना मोबाईलवर चित्रपट किंवा वेब सीरीज पाहण्याला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे. प्रेक्षकांच्या सोयीनुसार त्यांचे मनोरंज करण्याचा ध्यास हाती घेतलेल्या अनेक ओटीटी (Mirzapur Season 3) वाहिन्यांनी त्यांच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरीजची घोषणा केली आहे. नुकतीच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या नव्या चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा केली असून यात बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर’ (Mirzapur Season 3) ते ‘फॅमेली मॅन’ या वेब सीरीजचा सम
अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar) हिचा २००८ पासून एकाचवेळी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरु झाला. एकामागोमाग एक दर्जेदार कलाकृतींचा ती भाग होत गेली. आणि आज हिंदी चित्रपटसृष्टीत सईने (Sai Tamhankar) आपल्या नावाची सही प्रेक्षकांच्या मनावर कोरुन ठेवली आहे. काही दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सवर 'भक्षक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात सईने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा (Sai Tamhankar) सई ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरीजमध्ये दिग्गज महिला कलाकारांसोबत झळकणार आहे.
करोना काळानंतर प्रेक्षक ओटीटीकडे अधिक वळला. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ओटीटीवर घरबसल्या प्रेक्षकांना जगभरातील आशय विविध भाषांमध्ये पाहायला मिळतो. सध्या कार्यरत असणाऱ्या अनेक ओटीची वाहिन्यांपैकी नेटफ्लिक्स वाहिनी अधिक प्रेक्षकांना भावते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने (Netflix) कंबर कसली आहे. खास भारतीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने आगामी चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने २९ फेब्रुवारी रोजी तब्बल १९ नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यापैकी काही चित्रपट, वेब सीरिज रिलीजच्या
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (SNDT) सर विठ्ठलदास ठाकरसी विद्याविहार (जुहू आवार) येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी जगराणी विशेष व्याख्यानमालेचा कार्यक्रम पार पडला. ‘भारतीय महिला ऋषींचा बौद्धिक वारसा’ असा या व्याख्यानमालेचा विषय होता. यावेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक जयंत कुलकर्णी आणि अधिष्ठाता महेश भागवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, भारतीय ज्ञान, संस्कृत एवं योग केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्र तिवारी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी आस
भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. तसेच, टीम इंडियाकडे ३२२ धावांची बहुमोल आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
भारत व इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळविण्यात येत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावांचा डोंगर उभारला. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने २ बाद २०७ धावा केल्या आहेत. बेन डकेट १३८ धावांवर तर जो रूट ९ धावांवर खेळत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले आहे. दुसरा कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड असून आणखी २ दिवसांचा खेळ बाकी आहे.
देशात २०१५ साली झालेल्या शीना बोरा हत्याकांडामुळे हाहाकार माजला होता. आपल्या पोटच्याच मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीवर करण्यात आळा होता. आता याच सत्यघटनेवर आधारित डॉक्युमेंट्री वेब मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ' असे या वेब मालिकेचे नाव असून या मालिकेचे पोस्टर समोर आले आहे. शीना बोरा हत्याकांडावर भाष्य करणाऱ्या या वेब मालिकेचे चार सीझन भेटीला येणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुध्द कसोटी मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर आता टीम इंडिया आपला मोर्चा आगामी अफगाणिस्तानविरुध्दच्या टी-२० मालिकेकडे वळविला आहे. याकरिता टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत मैदानात उतरणार आहे.
नव्या वर्षाचे स्वागत सगळ्यांनी फार जल्लोषात केले. याच जोषात मनोरंजनसृष्टी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. २०२४ या नव्या वर्षात अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय ओटीटी वाहिनींवर देखील अनेक मालिका, चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊयात ओटीटीवर नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी जानेवारी महिन्यात आशयांची मेजवानी काय असणार आहे.
हिंदी मनोरंजनसृष्टीत नेपोटिझम अर्थात घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते असा आरोप केला जातो. यासाठी दिग्दर्शक करण जोहर याचे नाव अग्रगणी असून आजवर त्याने साकारलेल्या चित्रपटांमध्ये त्याने स्टार कलाकारांच्याच मुलांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. आता याच नेपोटिझमच्या मुद्द्यावर करण जोहर वेब मालिका घेऊन येत आहे. 'शोटाईम' या त्याच्या आगामी वेब मालिकेत अभिनेता इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
प्रेक्षकांनी गेल्या काही काळात चित्रपटगृहांपेक्षा अधिक पसंती ओटीटी वाहिन्यांना दिली आहे. त्यातही नेटफ्लिक्स या ओटीटीवर जगभरातील विविध प्रकारचा आशय अनेक भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकांचा कल नेटफ्लिक्सकडे अधिक दिसून येतो. अशात आता नेटफ्लिक्सने आपल्या यूझर्सच्या वापराचा डेटा आणि सर्वाधिक पाहिलेले चित्रपट आणि वेब मालिका कोणत्या आहेत याची यादी जाहिर केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे यात भारतीय चित्रपट आणि मालिकांचा समावेश आहे.
मिथिला पालकर ही कप सॉंग मुळे खरं तर प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने तिचे अभिनय कौशल्य मराठी चित्रपट, हिंदी वेब मालिकेत दाखवलेच. मात्र, चित्रपटांपेक्षा मिथीला वेब मालिकेत जास्त रमली. पण मुरांबा या मराठी चित्रपटात तिने उत्तम भूमिका साकारत मराठी प्रक्षकांनाही आपलेसे केले. परंतु, मुरांबा या चित्रपटानंतर पुन्हा ती मराठीत झळकलीच नाही. त्यामुळे मिथिला मराठीत काम का करत नाही? असे अनेक प्रश्न तिला विचारले जाऊ लागले. यावर नुकत्यात एका मुलाखतीत तिने मराठीमध्ये काम न करण्यामागचे कारण सांगितले आहे.
फ्रेयर एनर्जी, भारतातील आघाडीची तंत्रज्ञानक्षम छतांवर बसविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा सुविधा (रूफटॉप सोलर) कंपनीने रू. 58 कोटींची इक्विटी गुंतवणूक सुरक्षित केली आहे.भारतातील किरकोळ ग्राहकांसाठी (घरमालक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) सौरऊर्जेशी निगडीत संक्रमणाला गती देणाऱ्या शाश्वत बदलांत फ्रेयर एनर्जी आघाडीवर आहे.
मुंबईत ६०-७०च्या दशकात गुन्हेगारीचा विळखा फार मोठा होता. त्या काळातील गुन्हेगारी विश्व आजवर अनेक चित्रपट आणि वेब मालिकांमधून दाखवण्यात आले. पुन्हा एकदा त्या विश्वाचा वेगळा पैलु मांडणारी ‘बम्बई मेरी जान’ ही वेब मालिका लवकरच Amazon prime या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. सुजात सौदागर यांचे दिग्दर्शन असेलल्या या वेब मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून यात गुन्हेगारी विश्वातील थरारक मुंबईची गोष्ट पाहायला मिळत आहे.
तृतीयपंथी गौरी सावंत यांनी आपल्या जीवनात ‘गणेश ते गौरी’ हा लढा नेमका कसा दिला, त्यानंतर तृतीयपंथी समाजासाठी त्यांनी केलेले कार्य, हे अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये उत्तमरित्या आपल्या अभिनयातून साकारले आहे. रवी जाधव दिग्दर्शित ही वेब सीरिज दि. १५ ऑगस्ट रोजी ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली असून, त्यानिमित्ताने सुष्मिता सेन सोबत साधलेला हा खास संवाद...
मराठी चित्रपटसृष्टीत ‘नटरंग’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच संगीत नाटक हे मोठ्या पडद्यावर मांडत आपली दिग्दर्शकीय कारकिर्द सुरू करणारे रवी जाधव. त्यांनी आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट दिग्दर्शित केले. मराठीत तर त्यांनी आपले पाय रोवलेच; शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ‘मै अटल हूँ’ हा चित्रपट असो किंवा मग ‘चिडीया उड’ आणि आता ‘ताली’ ही वेब सीरिज असो, विविध विषय सातत्याने चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न रवी जाधव करताना दिसतात. ‘ताली’
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या राजकुमार राव याची आगामी वेब मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारच्या ‘गन्स अँड गुलाब्स’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होतीच. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राज आणि डीके दिग्दर्शित या आगामी कॉमेडी थ्रिलरसाठी चाहते उत्सुक आहेत. दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन सोबत राजकुमार राव अशी कलाकारांची फौज हा चित्रपटात झळकणार आहे.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाला अचानक धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. तसेच, तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही खेळणार नसल्याचे त्याने सांगितले.
नवी दिल्ली : करोना काळानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा ओटीटी माध्यमाला अधिक पसंती दिल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी अनेक नवोदित आणि दिग्गज कलाकारांनी आपला मोर्चा ओटीटी माध्यमाकडे वळवला. मात्र, ओटीटी वाहिनीवर दाखव
मोठ्या पडद्यावर मराठी चित्रपटांची जादू रंगत जात असताना, दुसरीकडे ‘ओटीटी’वर मराठी कलाकार हिंदी कलाकारांच्या साथीने कल्ला करताना दिसतात. प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, अमेय वाघ, सचिन पिळगांवकर, अमृता सुभाष, उपेंद्र लिमये अशा अनेक मराठी कलाकारांनी मराठी चित्रपट किंवा मनोरंजनसृष्टीचा वारसाच खरंतर ’ओटीटी’ वर इतर भाषिक आशयनिर्मितीच्या गर्दीत पुढे नेला. इतकेच नाही, तर हिंदीतील ताकदीच्या कलाकारांसोबत आपला अभिनय कुठेही फिका पडणार नाही, याची खबरदारीदेखील मराठी कलाकार क्षणोक्षणी घेताना दिसले.
जगदीश खेबूडकर यांचे गीत आणि प्रभाकर जोग यांचे संगीत लाभलेल्या शीर्षकातील काव्यपंक्ती. ‘हसले हसले, हरवून मला मी बसले’ असे या काव्यातील प्रेमाकर्षणात बुडालेली नायिका अगदी लडीवाळपणे वर्णन करते. पण, खरंच या हसण्यात, हसविण्यात फक्त कुणा प्रेमिकेच्याच नाही, तर समस्त मानवाच्या दु:खालाही हरवून बसण्याची क्षमता आहे. तेव्हा नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक हास्य दिनानिमित्ताने हास्यमहती वर्णन करणारा हा लेख...
अभिजित पानसे हे एक बिनधास्त व्यक्तीमत्व. त्यांची स्वतःची अशी रोकठोक मत आहेत. गेली अनेकवर्ष राजकारणात सक्रीय असलेल्या पानसेसरांमध्ये एक संवेदनशील कलाकार दडलाय. रेगे, ठाकरे, रानबाजार अशा अनेक कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्यात लपलेल्या कलाकाराने आपल्याशी अप्रत्यक्ष संवाद साधला, आपल्याला विचार करायला भाग पडलं. म्हणूनच एक प्रयोगशील लेखक, काही तरी हटके, वेगळं आणि ठासून मांडणी करणारा दिग्दर्शक व अभिनेता अभिजित पानसे सरांशी रान बाजारच्या निमित्ताने मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला.
अनुप सोनी यांनी मारली अमृता सुभाषच्या थोबाडीत!
सध्याचा जमाना हा ट्रेंडचा जमाना आहे. एखादा ट्रेंड आला की सगळे तोच फॉलो करू लागतात. शिवाय मालिका, चित्रपट या सर्व माध्यमात सिक़्वेलची फॅशन आली आहे
या सिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील त्यांनी लिहिलेली पोस्टमनची पत्रे प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे वेबसिरीजच्या माध्यमातून अरविंद जगताप आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
‘जेईई’, ‘एनईईटी’ आणि ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांऐवजी मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’ उपलब्ध होणार आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या 'व्हर्च्युअली वाईल्ड' या आभासी सफरीच्या मालिकेच्या पाचव्या भागाचे अनावरण अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे ह्यांच्या हस्ते सोमवारी दि. २३ रोजी करण्यात आले.
केंद्र सरकारने भारत सिरीज म्हणजे BH रेजिस्ट्रेशन नंबर करीत एक पायलट प्रोजेक्ट केला होता. त्याची आता संपूर्ण देशात अंमलबजावणी होणार आहे. या नंबरप्लेट्स मुळे वाहनचालकांना खूप मोठा फायदा होणार आहे
व्हीडिओ कंटेंट निर्मात्या नेटफ्लिक्सचा भारतातील व्यावसायवृद्धीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कंपनीने याचे खापर टिव्ही केबल ऑपरेटर्सवर फोडले आहे.
अल्पावधीत पदकविजेत्या सायनाला हरवून प्रसिद्धीझोतात आलेल्या नागपूरच्या मालविका बनसोडच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...