तृणमूल काँग्रेसचा नेता प्रवक्ता रिजू दत्ता याने म्हटले आहे की, “शर्मिष्ठा ही माझी मुलगी असती, तर तिचे श्राद्ध घातले असते, तिच्याशी संबंध तोडले असते, ती काही लहान नाही,” तर दुसरीकडे शर्मिष्ठा पानोली हिला ममता बॅनर्जीच्या सरकारने अटक केली आहे. शर्मिष्ठाने मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत म्हणेे. सर्व धर्माचा आदर करावा, हे मान्यच आहे. मात्र, सदोदित एकाच धर्माचा आदर कसा राखण्यासाठी संपूर्ण कायदा-सुव्यवस्था यंत्रणा राबवणे, म्हणजे लोकशाहीला कलंक आहे. हा कलंक ममता बॅनर्जीचे सरकार दिमाखात मिरवतही आहे. मात्र,
Read More
दिवाळी उत्साहात संपन्न झाल्याने आता भारतात शाळा पुन्हा एकदा सुरु होतील. त्यानंतर सहामाही परीक्षेचे गुणही समोर येतील. आपण परीक्षेत उधळलेले गुण काय रंग दाखवतात, याची धाकधुक एव्हाना परीक्षार्थींच्या मनात सुरु झालेली असतेच. अर्थात, गुण किती मिळतील, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना काय सांगायचे, हाच मुद्दा त्यात अधिक असतो. ‘मार्क्स’वादाचे हे विकृत स्वरुप फक्त भारतातच फोफावले आहे, अशातील बाब नाही, तर पाश्चात्य देशांतदेखील पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या व शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मागील ४० वर्षांपासून दरवर्षी राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतिसत्र भरवत असते. यंदाचे ४१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक कृतिसत्र शनिवार दि. २० व रविवार दि २१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के. आ. बांठीया माध्यमिक विद्यालय व एन. एन. उच्चमाध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल, जि. रायगड येथे संपन्न होणार असल्याचे संघाचे उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दमोह येथील 'गंगा जमना उच्च माध्यमिक विद्यालय'ची मान्यता रद्द केल्याची घोषणा केली आहे. याच शाळेतील टॉपर विद्यार्थिनींचे हिजाब घातलेले पोस्टर व्हायरल झाले आहेत. तपासणीत शाळेच्या कामकाजात अनेक गैरप्रकार आढळून आले.
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी निकाल शुक्रवारी (दि. 2) ऑनलाईन पद्धतीने जाहिर करण्यात आला. त्यात राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. तर, सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा आहे. गत वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे.
पिंपरी : करिअर घडविण्याचा वाटा निवडण्यासाठी लक्ष लागून राहिलेल्या बारावीचा निकाल गुरुवारी (दि. २५) जाहिर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी वेगवेगळया पाच संकतेस्थळ देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागाचा निकाल जाहिर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमा
फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे.
“तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला.
विद्यार्थ्याला शेंडी ठेवण्यास नकार देत जोपर्यंत शेंडी कापणार नाही तोपर्यंत वर्गात प्रवेश देणार नाही, असा आदेश शिक्षकाने दिला आहे. छत्तीसगडच्या जिल्हा कांकेरमध्ये सेंट जोसफ हायर सेकंड्री स्कुलमध्ये गुरुवार दि. २१ ऑक्टोबर रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाला झालेल्या मानसिक त्रासाविरोधात त्याच्या पालकांनी तक्रार केली असून हा प्रकार आमच्या धार्मिक भावनाही दुखावल्याचे कुटूंबियांचे म्हणणे आहे.
२१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत होणार परीक्षा
स्त्रिया आज सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. कोणतेही क्षेत्र असे नाही त्या क्षेत्रात स्त्रियांना आपला ठसा उमटविला नाही. स्त्रियामध्ये नेतृत्व गुण असून ही नेता म्हणून निवडीच्या वेळी त्यांना मात्र दुय्यम ठरविले जाते, असे मत अस्तित्व मतिमंद मुलांच्या शाळेच्या सचिव आणि रोटरी प्रांत असिस्टंट गव्हर्नर राधिका गुप्ते यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता २५ एप्रिलला, तर दुय्यम सेवा परीक्षा ३ मे ऐवजी १० मे रोजी होणार आहे. मात्र, एमपीएससी ने हा निर्णय घेण्यास उशीर केल्याने परीक्षेसाठी पुण्यात थांबलेल्या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या १७ जुलैपासून घेण्यात येणार असल्याची माहीती राज्य शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.