विशेष मुलांना शालेय शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अद्वितीय काम करणाऱ्या स्वाती महेंद्र मोहिते यांच्याविषयी...
Read More
(Gogaon) अधिकाधिक मुलांनी सरकारी शाळेत शालेय शिक्षण घ्यावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून सोलापूर जिल्ह्यातील गोगाव ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत करात ५०% सूट मिळणार आहे. गोगांव जिल्हा परिषदेच्या शाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि गावातील शिक्षणाचा स्तर उंचावावा, हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे.
कामण येथील आश्रमशाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गिरिजाराम वेल्फेअर फाऊंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. शाळेचे चेअरमन केदारनाथ म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात, फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भोस्कर यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपाडा येथील शांती गोविंद हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रा. मनिष घायाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देऊन त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवतात.”
"भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकात आध्यात्मिक ज्ञानाची शिकवण आहे. भारतात जे आहे आणि इतर विकसित राष्ट्रांकडे जे नाही, ते नेमके हेच आध्यात्मिक ज्ञान आहे. भगवद्गीतेतील समत्व दर्शनाचे तत्वज्ञान हेच भारताचे खरे तत्वज्ञान आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले. केरळच्या कलाडी श्री शारदा सैनिक शाळेत गीतायनम राष्ट्रीय चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने दि. १ सप्टेंबर रोजी ‘आपले विद्यालय आपला स्वाभिमान' हे संकल्प अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. देशातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे सर्वात मोठे राष्ट्रीय विचारांचे संघटन म्हणून देशभरात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची एक स्वतंत्र तयार झाली असून संघटनेच्या वतीने या अभियानात देशातील ५ लाखांहून अधिक शाळांचा सहभाग होत आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन क
अमेरिकेतील गोळीबारांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, बुधवार, दि.२७ ऑगस्ट रोजी मिनियापोलिस चर्चमधील या दुर्देवी घटनेत शाळकरी मुलांना लक्ष्य करण्यात आले. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर हल्लेखोरानेही आत्महत्या केल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असे या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे.
सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षणाचीसुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठी ग्रंथालयांचा विकास, ग्रंथांचा प्रसार होऊन, सर्वसामान्य भारतीयांसाठी ज्ञानाची दारे उघडी ठेवली पाहिजेत. त्यांना वाचन करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार भारतामध्ये डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम रुजविला, जोपासला, वाढविला आणि त्याकरिताच आपले आयुष्यही झिजविले. ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते म्हणून ते ओळखले जातात. नुकतीच त्यांची जयंती झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम. डुंगूरसी महाविद्यालयात दि. १४ ऑगस्ट रोजी भारतीय ज्ञान प्रणाली दिन अर्थात आय. के. एस. डे अत्यंत उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आय. आय टी मुंबईचे अभियंता चैतन्य पडाळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मागच्या वर्षी पासून कीर्ती महाविद्यालयात भारतीय ज्ञान प्रणाली दिन साजरा केला जात आहे, या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, संशोधकांचा उदंड प्रतिसाद लाभतो
लहान वयापासूनच मुलांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्यावर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका भर देत असून शालेय स्तरावर शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळा शाळांमध्ये घेण्यात येत आहेत. अशाच प्रकारच्या कार्यशाळा आज कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ २ उपायुक्त संजय शिंदे व घनकचरा व्यवस्थापन परिमंडळ २ उपायुक्त स्मिता काळे यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्या.
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील सिस्टर निवेदिता शाळेसमोर एक मोठे झाड कोसळल्याने चार पोल व एका ट्रान्सफॉर्मर याचे मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना रात्र अंधारात काढावी लागली. महावितरण कडून ते तातडीने नवीन बसाविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.
हॉकी ठाणे असोसिएशनतर्फे शालेय ९-साईड हॉकी लीगचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. २९ शाळांमधील एकूण ७६ संघांनी या लीगमध्ये सहभाग नोंदवला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना आपली मते प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आणि वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे येथे शाळा अंतर्गत फेरी उत्साहात पार पडली होती. या फेरीतून प्रत्येक इयत्तेतून ६ विद्यार्थी पुढील अंतरशालेय फेरीसाठी पात्र झाले आहेत. एकूण ६० विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, उच्चार, देहबोली व सादरीकरणाच्या कौ
शासनाच्या निर्देशानुसार घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत महापालिकेमार्फत, महापालिकेच्या शाळांच्या माध्यमातून अनेक नवीनतम उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच अनुषंगाने महापालिका परिक्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी, जवानांना "आभार पत्रं" लिहिली आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आपला देश, आपला तिरंगा या बाबतची माहिती अधिक वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने सेवा सहयोग फाउंडेशनच्या बुक बँक प्रकल्पाअंतर्गत मोखाडा (पालघर) व त्र्यंबकेश्वर (नाशिक) तालुक्यातील शाळांना भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.
मेहनतीनंतर यशाचा दरवाजा उघडतोच. त्यानंतरचा प्रवास हा सातत्याने यशाकडेच जाणारा असतो. मात्र, या यशाची धुंदी ज्यांच्या डोक्यात भिनली, त्यांना शून्यावर येण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी कलाकाराच्या अंगी नम्रता असावी लागते. हीच नम्रता नाटकांमध्ये विविध भूमिका करताना भिनते. जशी ती नाटकांमध्ये भिनते, तशीच ती बालनाट्यांमधूनही भिनते. म्हणून यशाच्या महामार्गावर स्वार असतानाही, मुलांना बालनाट्य आपलेसे वाटते. असे का? याचा घेतलेला हा आढावा...
आदीवासी आणि ग्रामीण भागात व्यसनधीनतेचे प्रमाण वाढत आहे. तरूण पिढीमध्ये देखील व्यसनधीनतेचे प्रमाण अधिक आहे असे दिसून येत आहे. तरूण पिढीला व्यसन लागूच नये याकरिता शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात जनजागृती केली पाहिजे. तरूण या व्यसनधीनतेकडे वळले आहेत. त्यांचा आजार समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढले पाहिजे, असे मत डॉ. कृष्णा भावले यांनी व्यक्त केले.
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित, अभिनव भारत शिक्षण संस्था, नांदेड व ज्ञान भारती विद्यामंदिर यांच्या सहयोगाने श्री गुरु गोविंदसिंघजी साहित्यनगरी भक्ती लॉनस, येथे दि. २ व ३ ऑगस्ट या दोन दिवसीय २० व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
‘सृजन’ या मुंबईत आयोजित कलाप्रदर्शनाच्या माध्यमातून ऋतुचक्राच्या वेगवेगळ्या छटा कलारसिकांना अनुभवायला मिळतात. ‘रहेजा स्कुल ऑफ आर्ट्स’च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारलेला हा अनुभव कसा आहे, याचा घेतलेला परामर्श.
सेवा संस्था तर्फे नागपंचमी निमित्ताने मॉडेल स्कूल या शाळेमध्ये सर्प या विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना शनिवार दिनांक २६जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत तशा प्रकारचे परिपत्रक शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ रोजी ऑरेंज आणि दिनांक २६ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा, रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे.
पालघरच्या डहाणूतील जनजाती समाजाच्या विशेषतः येथील शाळकरी मुलांच्या विकासासाठी झटणारे हरेश्वर वनगा यांच्याविषयी...
महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये तीन भाषांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत शिक्षण मंत्रालयाने लोकसभेत माहिती दिली.
शिक्षकांना त्यांची हक्काची दस्तऐवज आता मिळणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शाळांना आदेश दिले. या निर्णयाचा फायदा मुंबईतील उत्तर पश्चिम दक्षिण शिक्षण निरीक्षक जिल्ह्यासह ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्यावतीने ‘परख’ हा ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवाल’ नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांचे विविध विषयातील संपादणूक जाणून घेतली. यामध्ये देशातील सर्वच राज्ये आणि केंद्र प्रदेशातील शिक्षणव्यवस्थेचे चित्र स्पष्ट झाले आहे. या अहवालाचा घेतलेला आढावा...
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतील प्रलंबित निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यातील ३२ अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना याद्वारे आर्थिक मदत मिळणार आहे. महसूलमंत्री आणि नागपूर तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
खासगी शिकवणीवर्गांच्या अनियंत्रित शुल्कावर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र खासगी शिकवणीवर्ग अधिनियम लवकरच लागू होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्याचप्रमाणे काही शाळा विशिष्ट व्यक्ती किंवा दुकानांकडून शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारींवर कारवाई केली जाईल, असे भुसे यांनी आश्वस्त केले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागातील एका शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मासिक पाळी तपासणीसाठी जबरदस्ती कपडे उतरवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलीसांकडून तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
शहापूरच्या शाळेतील कृत्य हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत या घटनेवर संताप व्यक्त केला.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दि. ८ आणि ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. यासाठी राज्याभरातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याभरातील शाळा शाळा बंद राहणार असा संभ्रम विद्यार्थीं-पालकांमध्ये तयार झाला होता. मात्र शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ८ आणि ९ जुलै रोजी संपावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपासून समोर येत होती. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शाळा सुरू राहणार की बंद राहणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
संकल्प संस्था गेली १२ वर्षापासून चेंबूर गोवंडी शिवाजी नगर मानखुर्द या एम/पूर्व विभागात वस्ती विकास प्रकल्प अंतर्गत शैक्षणिक आरोग्य,महिला सक्षमीकरण आणि वस्ती संघटन या विषयावर कार्य करीत आहे. मानखुर्द येथे संकल्प संस्था आणि आरिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एम/पूर्व मानखुर्द विभागातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. यासाठी संकल्प संस्थाचे अध्यक्ष विनोद हिवाळे तसेच आरीन फाऊंडेशनचे अध्यक्ष नितेश मिसाळ यांनी पुढाकार घेतला.
आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. सं
एर्नाकुलम शहरात शालेय मुलांमध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. ४ जुलै रोजी एका याचिकेला उत्तर देताना नमूद केले आहे. ही बाब गंभीर आहे, असे म्हणत न्यायालयाने राज्य सरकारकडे या समस्येचे निराकरण करण्यासाठी कृती आराखडा मागितला आहे. या प्रकरणात याचिकाकर्ते केरळ राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण (KELSA) आणि आपल्या मुलाच्या व्यसनाधिनतेमुळे चिंतेत असलेल्या आईने अल्पवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली
१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती
लोकशाही शासनव्यवस्थेचे खरे यश यातच असते की, यामध्ये वेगवेगळ्या विचारधारांना वाव मिळतो. विविध समूहातील लोक मुक्तपणे आपली मतं मांडू शकतात. वादविवाद, चर्चा या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते आणि एक समृद्ध समाज प्रगतिपथावर चालत राहतो. या मार्गावर चालताना, संघर्षाचे अनेक पेच प्रसंग उभे राहतात. त्यावेळी त्या त्या लोकशाही व्यवस्थेमधील समाज, तिथल्या शासन यंत्रणा, न्यायव्यवस्था या संघर्षाला कसे सामोरे जातात, यावरून त्या राष्ट्राचे भविष्य ठरते. संघर्षाचे हे क्षण नेहमीच मोठे असतात असे नाही; कधी कधी अत्यंत छोट्या
केडीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर वाढविण्यासाठी, त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.
मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करा तसेच शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा, अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १७ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत महापालिके च्या नागरिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय कायाकल्प कार्यक्रमाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत. या अभियानातंर्गत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील दत्तनगर नागरी आरोग्य केंद्रास राज्यात सहावा क्रमांक आणि महापालिका हद्दीत पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नापासून सुमारे २०० किमी अंतरावर आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या ग्राझमध्ये मंगळवारी,दि. १० जून रोजी एक भयानक गोळीबार झाला आहे. बोर्ग ड्रायर्सचुत्झेंगासे शाळेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच देशभक्ती, शिस्त, व्यायामाची सवय आणि संघटितपणाची भावना रुजविणे हा आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद खुलवण्यासाठी झटणार्या निर्वाणा स्कूलमधील लक्ष्मी विनायक लेले यांच्याविषयी...
‘रॅंचो स्कूल’ म्हणजेच द्रुक पद्मा कार्पो स्कूलला अखेर CBSE मान्यता मिळाली. या शाळेची स्थापना २० वर्षापूर्वी झाली होती. २००९ मध्ये आलेल्या ३ इडियट्स मुळे देसभर प्रसिद्ध झालेली ही शाळा.
अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात 'ऋणानुबंध@२५'चे आयोजन करण्यात आले. वर्ष २०००च्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनी एकत्र येऊन शाळेचे 'ऋणानुबंध' कृतज्ञतेच्या सामाजिक बांधिलकीने जपले.
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?