अभिनेता रणबीर कपूर याची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट अॅनिमल याने २०२३ मध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड मोडित काढत प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया मिळवल्या. ॲनिमलच्या यशानंतर अॅनिमल पार्कची घोषणा निर्माते आणि दिग्दर्शकांनी केली होती. या चित्रपटात अभिनेता सौरभ सचदेवा याचीही महत्त्वाची भूमिका होती. आणि त्याने या चित्रपटाबद्दल माहिती देत म्हटले आहे की, “ॲनिमल पार्क रिलीज व्हायला अजून वेळ लागू शकतो”.
Read More