'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.
Read More
गणेशोत्सव आला की सर्वदुर उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण निर्माण होते. सामान्यांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत सगळेच गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठ्या आनंदात गणेशोत्सव पार पडतो. मात्र, पुण्यात हा उत्सवाचे वेगळेच रंग दिसून येतात. उत्सव म्हणजे उर्जा आणि उर्जा म्हणजे मनोरंजन क्षेत्र चित्रिकरण असो किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असो गणरायाच्या आगमनासाठी कलाकारांचे ढोलताशा पथक दरवर्षी सज्ज असते. यावर्षी देखील कलाकारांच्या ढोलताशा पथकाने कंबर कसली आहे. दरवर्षी वादक म्हणून गणेशाचे पारंपारि