सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टे पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त (१) विक्रम कुमार यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पस्थळास भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला.
Read More
मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली असून आग लागण्याची घटना दुपारी एक वाजता घडली. दरम्यान, सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या भीषण आग दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जयंत सहस्रबुद्धे गेल्याची बातमी वाचून बसलेला धक्का, हा माझ्यासाठी साधा धक्का नाही. कारण, ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्या विचारसरणीवर आहे, ती व्यक्ती या जगात नाही, यावर विश्वास ठेवणे वेदनादायक आहे. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात, पण आपल्या आयुष्याला समृद्ध करणार्या त्यातील काही व्यक्तींना आपण सदैव गुरुस्थानी पाहतो. १९८० ते १९९९ या काळात संघकार्य करताना अनेक विदूषींचा सहवास लाभला. त्यात प्रामुख्याने संघ प्रचारक होते होते. १९९०-९२ या काळात जयंतजी वांद्रे ते सांताक्रुझ या शांतीनगर भागात प्रचा
मुंबईत पाणीप्रश्न ज्वलंत का झाला?
फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ (एफआयएनएस) संस्थेच्या वतीने गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ एका विशेष व्याख्यानाचे आयोजन
महापालिकेतर्फे सांताक्रूझ पूर्व येथे नेहरू रोडवर मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक होत असून त्याचे भूमिपूजन मंगळवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वत:पासून सुरू झालेल्या विकासाची प्रेरणा ही समाजोत्थानाचा केंद्रबिंदू झाली. नि:स्वार्थी प्रेरणेने केलेले काम समाजात पोचपावती मिळवतेच आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांताक्रुझच्या 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे काम. वस्तीतील लोकांसाठी शौचालय असावे, या जिद्दीने वस्तीतील काही युवक एकत्र आले आणि त्यांच्या समाजकार्याची महती वैश्विक स्तरावर पोहोचली.
मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या मानखुर्द येथील बेस्ट कर्मचार्यांच्या पुनर्वसनाबाबत पुन्हा एक नवी गंभीर समस्या पुढे आली आहे.