अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने २०२४ हे वर्ष विशेष गाजवलं. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या या चित्रपटाला एका महिलेच्या मृत्यूमुळे गालबोट देखील लागलं होतं. आता असाच प्रकार अभिनेता रामचरण याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाबाबत घडलं आहे. राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटनंतर अशीच दुर्दैवी घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण यांनी आरआरआर चित्रपटामुळे संपूर्ण जगाला वेड लावलं. आता मात्र ते अभिनेता नव्हे तर निर्मिगणती क्षेत्रात नशीब आजमावताना दिसत असून त्यांची पहिली निर्मिती असलेला द इंडिया हाऊस या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असून त्यापुर्वी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गणरायाचा आर्शिवाद घेतला आहे. हम्पीच्या विरुपक्ष मंदिरात टीमने देवाची पुजा करत हत्तीचा आर्शिवाद घेतला आहे.
'द काश्मीर फाइल्स' आणि 'कार्तिकेय २' चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी तेलुगू चित्रपट उद्योगातील ज्येष्ठ अभिनेते राम चरण यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्या दोघांनी मिळून नवीन चित्रपट तयार करण्याचे ठरवले आहे. तो चित्रपट भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित असेल. या चित्रपटाचे नाव 'द इंडिया हाऊस' असे असेल, ज्यामध्ये निखिल सिद्धार्थ आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाच्या टायटल अनाऊंसमेंटचा व्हिडीओही रिलीज झाला आहे, ज्याला खूप पसंती दिली जात आहे.
बाहुबली फेम एसएस राजमौली यांच्या पुढच्या वर्षीच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' मध्ये दिसणार देशातील बड्या कलाकारांची झलक!