स्वारगेट अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील पीडितेने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले असून त्यात पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या घटनेला आणखी नवे वळण मिळाले आहे.
Read More
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी मध्यरात्री गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानक. या गजबजलेल्या बस स्थानकात मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने महाराष्ट्राला हादरा बसला. घटना घडल्यानंतर जवळपास २४ तासानंतर ती उघडकीस आली. गेले ३ दिवस या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांना गुंगारा देत होता. घटनेनंतर जवळपास ६० तासानंतर पोलिसांना मिळालेले क्लूज, त्यानंतर आरोपीच्या मागावर असलेली अडीचशेहून अधिक पोलिसांची फौज, ५० हुन अधिक सीसीटिव्ही कॅमेरे, रात्रभर केलेला तपास, डॉग स्क्वाड, शिरुरच्या गुणाट गावातल्या नाग
(Pune Crime Case Swargate) पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. २६ वर्षीय पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली असता ही घटना घडली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bangladeshi अवैध घुसखोरास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बांगलादेशी घुसखोर हा २००४ पासून भारतात वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याला शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीचे नाव हे एहसान हाफिज शेख असून घुसखोराचे वय वर्षे ३४ होते.
पुणे पोलिसांकडून २१ बांग्लादेशींना अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दल सांगितले. या बांग्लादेशींकडे बनावट मतदान कार्ड, भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळले असल्याचेही किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे शहरात गणेशोत्सव कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे शहरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली आहे.
वैद्यकिय शाखेत शिक्षणासाठी पाकिस्तानातून पुण्यात आलेल्या खलीद गोमेई मोहमद हसन या युवकाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच ठणकावले आहे. खालीद पुण्यात शिक्षणासाठी सहकुटूंब रहाण्यासाठी आला होता. त्याचा (Indian Visa) व्हिसा २०१७ मध्येच संपला होता. मात्र, त्यानंतर त्याने नवीन व्हिसासाठी अर्जही केला नाही. इतकी वर्षे तो आपल्या पत्नी आणि मुलांसह पुण्यातच राहू लागला. याप्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने त्या युवकाला पुन्हा एकदा पाकिस्तानात जाण्याचा आदेश दिला आहे. "भारत देश हा उदारमतवादी आहे याचा गैरफायदा घेऊ नये.",
पुणे अपघात प्रकरणात दोन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. तपासात योग्य सहकार्य न करणे आणि वरिष्ठांना वेळेत अपघाताची माहिती न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली.
पुणे अपघात प्रकरणात नवी अपडेट्स समोर येत आहे. विशाल अग्रवाल यास अटक झाल्यानंतर तपासाला दिशा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, येरवडा पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पीआय व पीआय अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलीस तपास करत असून नवीन माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे पोलीसांच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या असून कारच्या चालकाने सांगितले की, गाडी 'तो'च चालवत होता, त्यामुळे गाडी नेमकी कोण चालवत होता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन केला होता, असे सदर प्रकरणी समोर आले आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत शहरातील तब्बल ५० पब व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुणे प्रशासनाच्या धडक कारवाईनतंर बार व पब मालक, कर्मचारी संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कारवाईविरोधात बार व पब मालक, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुणे पोलिसांनी दिल्लीतून ९७० किलो एमडी ड्रग्ज जप्त केल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी त्यांचा सन्मान केला आहे. यासाठी पुणे पोलिसांचे अभिनंदन करतानाच त्यांनी २५ लाख रुपयांचा पुरस्कारही जाहीर केला. तसेच भविष्यातही ड्रग्ज फ्री महाराष्ट्राची मोहिम सुरु ठेवण्याबाबत विश्वास व्यक्त केला.
पुणे पोलिसांची अमली पदार्थ संदर्भात केलेली कारवाई ही अतिशय अभिमानास्पद असून अलिकडील काळातील ही अशा प्रकारची देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.आज येथे त्यांनी अलिकडेच पुणे पोलिसांनी जे जवळपास 3600 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त केले त्यात सहभागी पोलिस अधिकार्यांचा सन्मान केला असून या कामगिरीबाबत 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.येथे आयोजित एका छोट्या समारंभात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग
पुण्यात दि. ०४ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एनआयबीएम रस्त्यानजीक असलेल्या दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
पुण्यामध्ये पकडण्यात आलेले दहशतवादी ऑनलाइन व्हिडिओ पाहून प्रभावित झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच धार्मिक कट्टरता आणि जिहाद पसरविणारी पुस्तके, मजकूर, ऑनलाईन कंटेंट उपलब्ध झाला. यासोबतच विविध मुस्लिम धर्मगुरूंची बयाने ऐकून ही मुले प्रभावित झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आतापर्यंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एकूण ५०० जीबीचा डाटा जप्त करण्यात आला आहे. त्या डाटामध्ये पुण्यातील छाबड हाऊससह काही संवेदनशील ठिकाणांची माहिती, छायाचित्रे, गुगल मॅप आणि स्क्रीन शॉट देखील आढळून आले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांचे इस्लामची शिकवण असलेल्या पवित्र गोष्टींसाठी बलिदान देणे, जिहाद करणे यासाठी ब्रेन वॉशिंग करण्यात आलेले होते. त्यामधूनच त्यांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबला. त्याचे प्रशिक्षण घेतले. धर्मासाठी जिहाद करुन जन्नत प्राप्त करण्याची या दोघांनी मानसिकता तयार केली होती असे तपासात समोर आले आहे. आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी दोघांच्या पोलिस कोठडीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
पुणे : फेसबुक पेजवर हिंदूधर्म विषयी आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पेजवर अंगावर भगवी वस्त्र परिधान केलेल्या अर्ध नग्न महिलेचा अश्लील हावभाव करीत असलेला व्हिडिओ टाकून त्याच्यामागे भगवान श्रीरामांसंबंधीचे गीत टाकून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे.
पुणे ; पतीने दुसरे लग्न केल्यामुळे चिडलेल्या पहिल्या पत्नीने पतीच्या ईमेल आयडीचा वापर करीत थेट त्याची कंपनी आणि बिगर मुस्लिम प्रवास करीत असलेली कॅब बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.
पुणे : अभ्यासासाठी प्रियकराच्या खोलीवर गेलेल्या युवतीने किरकोळ वादामधून धारदार सुर्याने हल्ला करीत प्रियकराचा खून केला. ही घटना वाघोली येथील यशवंत रायसोनी महाविद्यालयाजवळ सोमवारी पहाटे घडली. विशेष म्हणजे यावेळी अन्य विद्यार्थी देखील खोलीमध्ये अभ्यास करीत बसलेले असताना ही घटना घडली. या घटनेत हल्लेखोर प्रेयसीनेदेखील स्वत:च्या हाताची शीर कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या एका पदाधिकार्याने किरकोळ कारणावरुन एका जोडप्याशी भांडणे करीत थेट कापून टाकण्याची धमकी दिली. तसेच, गाडीवर चढून विंडस्क्रीनची काच फोडत महिलेला शिवीगाळ केली. ही घटना औंध रस्त्यावर घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण, धमकावणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे.
पुणे : पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने काही दिवसांपुर्वी छापा टाकत आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सुरु असलेल्या सट्टा रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आलेली होती. दरम्यान, या सट्टेबाजीचे दुबई कनेक्शन समोर आले आहे. पुणे-मुंबई-नागपूर आणि दुबई असे या सट्टेबाजीचे लागेबांधे असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणार पब चालकासह व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : एका भरधाव व्हॅनिटी व्हॅनने रस्त्यावरील पाच ते सहा वाहनांना धडक दिली. काळजाचा थरकाप उडविणार्या या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्त्यावर रविवारी रात्री घडली. ही व्हॅनिटी व्हॅन नेमकी कोणाची आहे याची चौकशी पोलिसांकडून केली जात असून चालकाला अटक करण्यात आली आहे.
पुणे : गणेशोत्सव देखाव्यांमध्ये 'अफजल खानाचा वध' हा देखावा सादर करण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर याबाबत मंत्रालय स्तरावरून हालचाली झाल्याने कोथरुड पोलीस ठाण्याकडून संगम तरुण मंडळाच्या या देखाव्याला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयासाठी 'संगम तरुण मंडळ ट्रस्ट, कोथरूड'चे अध्यक्ष ऍड. किशोर शिंदे यांनी फडणवीस-शिंदे सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना आभार मानले.
दि.१ जानेवारी, २०१८ रोजी पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची सुनावणी गुरुवार, दि. ५ मे रोजी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी गुरुवारी आयोगासमोर दिलेली साक्ष आणि त्यांच्या विधानांवर ‘विवेक विचार मंचा’तर्फे बाजू मांडणार्या अॅड. प्रदीप गावडे यांनी गुरुवारी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला....
पुण्यातील डेक्कन परिसरातील मशिदींवरील अनाधिकृत भोंगे हटवावे, यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. हे भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून पुणे पोलिसांना चार दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. ’चार दिवसात मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, अन्यथा दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार,’ असा इशारा या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशनला हेमंत संभूस यांनी हे पत्र दिले आहे.
म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील चौकशी सुरु असताना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अखेर पोलिसांनी अटक केली
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पुण्यातील घरी एका माथेफिरुने घरात घुसून तिच्या वडिलांवर चाकूहल्ला केला
'जसा राजा तशी प्रजा' या म्हणी प्रमाणे सध्या वनमंत्री संजय राठोड यांचे समर्थक विरोधकांवर तुटून पडले आहेत. एका मुलीच्या हत्येचा थेट आरोप लावण्यात आल्यानंतर नेत्याचे वर्तन कसे असावे, त्यांच्या समर्थकांनी काय भूमिका घ्यावी, याबद्दल तारतम्य उरलेले नाही. मात्र, बोलणाऱ्याला फोन करून धमक्या देणे, हाणामारी, चाकुसुऱ्यांनी भोसकून टाकण्याचा बाता राठोड समर्थक करताना दिसत आहेत. स्वतः भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
पुणे शहरात गणेश कला क्रीडा मंच सभागृहात दि. ३० जानेवारीला रोजी ‘भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ आयोजित ‘एल्गार परिषद २०२१’ या कार्यक्रमात शरजील उस्मानीने केलेल्या अत्यंत द्वेषपूर्ण विधानांचे पडसाद राज्यभर उमटले. उस्मानीच्या विधानांचा सर्वस्तरातून निषेधही झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानीच्या वक्तव्याला अयोग्य म्हणत, “न्यायाधीश राहिलेल्या माणसाने उस्मानीचे भाषण तिथेच थांबवायला हवे होते,” असे म्हणून कोळसे-पाटलांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर मुख्यमंत्री ठाक
हिंदू धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी करत पुण्यातील भाजप नेत्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. शरजीलच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
स्वारगेट पोलिसांकडे मागितली परवानगी
काही दिवसांपूर्वी शिरूरमधील न्हावरे गावातील महिलेवर जीवघेणा हल्ला करून दोन्ही डोळे केले होते निकामी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, राज्य सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यास कमी पडले, असा आरोप मराठा समाजाने केला असून सरकारचा निषेध करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, १७ सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात येत आहेत.
गेल्या ४० दिवसांहून अधिक काळ आपण सर्व विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत. दैनंदिन व्यवहारच नाही तर आयुष्यच थबकून गेलं आहे.
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा विचार करताना सामान्य दलित कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत. त्यानिमित्ताने नक्षल्यांना प्रत्यक्ष हिंसाचाराच्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून मात्र आपण सजग असले पाहिजे. संवेदनशील भागात पोलिसांच्या, सशस्त्र दलाच्या जवानांच्या हिंसाचारात गुंतलेल्या आरोपींचा त्यात विचार करणे दलित चळवळीचा अपमान ठरेल.
डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांचा अमेरिकेला पलायन करण्याचा होता बेत
पुणे पोलीसांकडून उच्च न्यायालयात माहिती
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी झारखंडमध्ये फादर स्टॅन स्वामींच्या घरावर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे.
पुणे येथील भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदाअंतर्गत नवलखा व अन्य चार जणांवर आरोप लावले होते.
आनंद तेलतुंबडे या तथाकथित विचारवंताची अटक पुणे जिल्हा न्यायालयाने नुकतीच अवैध ठरवली. त्या अनुषंगाने ‘विक्टीम कार्ड’ खेळण्यासाठी या वेळेचा पुरेपूर उपयोग केला जातो आहे. मात्र, जसे भासवले जात आहे, त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यासाठी तेलतुंबडे प्रकरणातील न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचा अन्वयार्थ लावून इतिहासात उद्भवलेल्या यासमान परिस्थितींचा शोध घेणे अनिवार्य ठरते.
मुद्दा तेलतुंबडेचा जरी असला तरी बुद्धिजीवी गोटातला दुटप्पीपणाही समोर आणलाच पाहिजे. दुसरीकडे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पडत जर तेलतुंबडेला अटक केली असेल तर त्यात काय चुकीचे केले? कारण, सर्वोच्च न्यायालयानेच सत्र न्यायालायात जाण्यास सांगितले होते, तसे ते गेलेही. सत्र न्यायालयाने निकाल दिला व तेलतुंबडेला अटक झाली.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ विचारवंत आणि मानवी हक्क कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांना शनिवारी पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेदेखील तेलतुंबडेंची याचिका फेटाळून लावल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, येथेही तेलतुंबडेला दिलासा मिळू शकला नाही.
या पत्रात नमूद करण्यात आलेला मोबाईल क्रमांक हा दिग्विजय सिंह यांचाच आहे. या वृत्ताला पुणे पोलीसांनी दुजोरा दिला आहे.
हैदराबाद उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी करताना हा निर्णय दिला. त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे व पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
पाच जणांना पोलीस कोठडी मिळावी ही पोलिसांची मागणी फेटाळून लावली असून त्यांच्या नजरकैदेत ४ आठवड्यांची वाढ करण्यात आली
या पाच जणांच्या अटकेत कोणतेही राजकारण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.