टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रप
Read More
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. या कार्यक्रमातील विनोदवीर एक एक करत मराठी चित्रपटांत काम करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेता गौरव मोरे बॉईज ४ आणि लंडन मिसळ या चित्रपटात झळकला होता. आता त्याच्यापाठोपाठ अभिनेता पृथ्वीक प्रताप देखील लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पृथ्वीक डिलिव्हरी बॉय या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंज करणार असून त्याला अभिनेता प्रथमेश परब याची साथ लाभणार आहे.
दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या 'दृश्यम' या चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडले होते. यातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय हा वाखाण्याजोगा होता. यात अजय देवगण, तब्बू यांच्यासोबत एक मराठमोळा चेहरा झळकला होता, तो म्हणजे सगळ्यांचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब. २७ ऑक्टोबरला प्रथमेशचा 'सिंगल' हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने प्रथमेशने महाएमटीबीशी गप्पा मारल्या आणि दृश्यम या त्याच्या हिंदीतील पदार्पणाच्या चित्रपटातील काही आठवणींना उजाळा दिला.
टाईमपास १ आणि २ नंतर हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या टाईमपास ३ची सगळीकडे चर्चा होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे यातील संवाद तसेच गाणी सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या भावना!
प्रीतम एस. के. पाटील लिखित आणि दिग्दर्शित 'खिचिक' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. या टीजरमध्ये प्रथमेश परब आणि त्याच्याकडे पाठ फिरवून जाणारी मुलगी दिसत आहे. तो तिच्याकडे हात जोडून विनंती करत असताना पुढे जाऊन ती मुलगी एक कागदाचा बोळा खाली टाकताना दिसते.
दहा बाय दहा’ च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावे लागते, त्यानंतर काय होते? यावर आधारित हे नाटक आहे.
अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारीत कलाकृती येत्या २२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार स्व. अरुण साधूंच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट; राज्य शासनाचे तीन पुरस्कार आणि दोन नामांकने जाहीर