"मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी "तली मंडळी सादर करत आहेत हे गाणं जे सर्वांसाठी COPYRIGHT FREE आहे.!! कुणीही कुठेही अपलोड करू शकता. धम्माल गाणं Enjoy करा, Hook step वर Reels करा आणि आम्हाला टॅग करा..!!! 🤩😍
Read More
मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी ८०-९० च्या दशकात गाजवणारे विनोदवीर ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज १० ऑगस्ट रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. आज दुपारी विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी कलाविश्वातून कलाकारांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे निश्चित झाले.
“मराठी प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर न पाहता येण्यासारखा आशय जर असेल तरच ते चित्रपट किंवा नाट्यगृहात जाऊन गर्दी करतील. त्यामुळे जुन्या संकल्पनांची कात टाकून नव्या कल्पना रुजू करणे अत्यंत महत्वाचे आहे”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, लेखक यांना महत्वाचा सल्ला दिला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराटी रसिक प्रेक्षकांना सोयीसाठी ‘तिकीटालय’ हे ॲप ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक म
नाट्यकर्मीं आणि प्रेक्षकांमधील दुवा म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल. ‘यशवंतराव नाट्य संकुल’ या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. ज्येष्ठ कलाकार, लेखरक दिग्दर्शक यांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेले काही वर्ष ही वास्तू बंद होती. आणि त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीनंतर नव्याने निवडून आलेले अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस या वास्तुचे नुतनीकरण सुरु होते. आता हे नाट्यसंकुल कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज झाली आहे. बहुप
काही दिवसांपूर्वी रंगमंचावर आलेले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक बुक माय शोवर नंबर.१ ठरले आहे.