अभिनेता विकी कौशलचा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत इतिहास रचला आहे. प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३३.१ कोटींची कमाई केली होती. यामुळे १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम आता ‘छावा’च्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘गल्ली बॉय’च्या नावावर होता.
Read More
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘स्त्री २’ हा चित्रपट देशभरात १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. अवघ्या काहीच दिवसांत या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला होता. आणि आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला देखील ‘स्त्री २’ ने मागे टाकले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीवर हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटांचा पगडा वाढताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळवला होता. यात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन झळकले होते. दरम्यान, याच चित्रपटावर अभिनेता अर्शद वारसी याने आपले मत मांडले असून ‘कल्की’मध्ये प्रभास जोकर वाटत होता असे त्याने थेट म्हटले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहेच शिवाय बॉक्स ऑफिसवरी नवा इतिहास रचला आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'कल्की २८९८ एडी' ने पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन यांचा कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या जगभरात डंका वाजवत आहे. बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार करत या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींची कमाई केली आहे. आता लवकरच हा चित्रपट हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. यात अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन व दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, सेटवरील गमती सांगताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी बच्चन साहेबांबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली आहे.
दिग्दर्शक नाग अश्विन यांचा 'कल्की 2898 एडी' हा मल्टी स्टारर चित्रपट सध्या देशातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर कमालीचा धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चिक्कार कमाई कर जगभरात इतिहास रचला आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशभरात ५१० कोटींच्या पुढे तर जगभरात ८३२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोटी अपडेट समोर आली असून या चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नियमांनुसार, कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंचर दोन ते तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जातो, पण कल्कीच्या निर्मात्यांनी एका महिन्याच्या आतच चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे जाहिर केले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाशी मराठमोळी अभिनेत्री नेळा शितोळे हिचं खास कनेक्शन आहे. या चित्रपटासाठी काय योगदान आहे जाणून घेऊयात…
नाग अश्विन दिग्दर्शित साय-फाय चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. कलियुगाचा भविष्यात होणारा अंत आणि त्यासाठी वाचवायला जन्म घेणाऱ्या कल्कीची कथा यात मांडण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पडूकोण आणि प्रभास यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २७ जून रोजी पॅन इंडिया प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे.
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध ते भविष्यात कलयुगाचा होणारा अंत आणि सर्व सजीवांचा जीव वाचवण्यासाठी जन्म घेणारा कल्की अवतार या कथनावर आधारित कल्की २८९८ एडी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नाग अश्विन दिग्दर्शित अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार यासाठी चाहते वाट पाहात आहेत. आणि याबद्दलच चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा खुलासा केला आहे.
‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून यशस्वीपणे त्याने हिंदी, तमिळ आणि अन्य भाषांमध्ये ५०० कोटी कमावले आहेत. नुकताच अभिनेता रणवीर सिंहने आता कल्की २८९८ एडी हा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नी दीपिकाचे कौतुक केले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने एक वेगळेच सिनेमॅटिक युनिव्हर्स प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. जगाचा सर्वनाश भविष्यात कसा होणार आहे आणि त्याला कोण वाचवणार आहे या पौराणिक कथांवर आधारित कल्की चित्रपटाचे कथानक बांधण्यात आले आहे. २७ जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत जगभरात ३०० कोटींचा आणि देशात १०० कोटींच्या पल्ला पार केला आहे.
'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २७ जूनला प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचे प्रदर्शनापुर्वीच कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची हिंदी भाषेतील २ लाख तिकीटं आत्तापर्यंत विकली गेली आहेत. त्यासोबतच या चित्रपटाने अॅडव्हान्स तिकीट बुकिंगमध्ये ५० कोटींचा टप्पा देखील पार केला आहे.
अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपसून चर्चा सुरु होती. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकमुळे तर ट्रेलर कधी येणार याचीच प्रेक्षक वाट पाहात होते. आणि आता त्यांची ही उत्सुकता संपली असून कल्की २८९८ एडी या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेलरच्या शेवटी आणखी एका सुपरस्टारची विशेष झलक दिसली आहे.
लहान मुलांना परीक्षेच्या पेपरमधील प्रश्न जितके कठीण वाटले नव्हते तितके ‘कट्टपाने बाहुबली को क्यु मारा?’ या प्रश्नाने भंडावून सोडलं होतं. चित्रपटसृष्टीतील अनेक आयकॉनिक चित्रपटांपैकी एक म्हणजे एस.एस. राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट. सर्वसामान्यत: चित्रपट हे मुळात लार्जर दॅन लाईफ असं माध्यम आहे. त्यातही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना कल्पनेच्या बाहेरील मोठं जग दाखवलं. आणि एस.एस राजामौली यांच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी तर अनोखं पौराणिक जग समोर आणलं. विशेष म
बहुप्रतिक्षित आणि चर्चित 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहिर करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून लोकं वाट पाहात आहेत. परंतु, आता प्रतिक्षा संपली असून कल्की चित्रपट येत्या (Kalki 2898 AD) जुन महिन्यात प्रदर्शित होणार हे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
बहुचर्चित ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटातील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘अश्वत्थामा’चा पहिला लूक समोर आला आहे. नुकताच या चित्रपटातीचा एक टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला. यात ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दिसत असून त्यांचा आजवर कधीही न पाहिलेला असा दमदार लूक पाहायला मिळत आहे.
यंदाचे वर्ष मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी फार चांगले गेले. प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींच्या घरात कमाई केली. नुकताच शाहरुख खान याचा २०२३ मधील शेवटचा चित्रपट डंकी आणि प्रभासचा सलार चित्रपट प्रदर्शित झाला. पण अनपेक्षितपणे प्रभासच्या सलारने शाहरुखच्या डंकीला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ३० कोटींची कमाई केली असून या वर्षात त्याच्या प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या तुलनेने ही फार कमी आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाने समस्त हिंदु लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात असताना आता सर्वोच्च न्यायालयानेही आदिपुरुष चित्रपटाला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वादग्रस्त चित्रपट ‘आदिपुरुष’चे चित्रपट प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. एखाद्या विषयाचे चित्रपटाच्या माध्यमातून सादरीकरण त्याचे अचूक प्रतिबिंब असू शकत नाही, असे सांगतानाच सहिष्णुतेची पातळी घसरल्याचे निरीक्षणही न्यायालयाने यावेळी केले आहे.
ध्या आदिपुरुष या रामायणावर आधारित चित्रपटाची बरीच चर्चा भारतभर पहायला मिळत आहे.'सुपरस्टार' प्रभास'ने यात भगवान श्रीरामांची भूमिका साकारली आहे.
प्रभास, कृति सेनन आणि सैफ अली खान ही स्टारकास्ट असणारा आदिपुरूष हा सिनेमा १६ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात प्रभास भगवान श्री रामची भूमिका साकारत आहे, तर कृति सेनन माता सीतेच्या भूमिकेत तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यापुर्वी 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी हनुमानजींसाठी प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसंतसे या सिनेमाची उत्सुकता वाढत चालली आहे. ओम राऊतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्यामध्ये प्रभू श्रीरामाची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे.
500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या टीझरवरून वाद सुरूच आहे. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन यांचा 'आदिपुरुष'चा 1.46 मिनिटांचा टीझर 2 ऑक्टोबर 2022 रोजी अयोध्येत रिलीज झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटात राम, हनुमान आणि रावणाच्या चुकीच्या चित्रणावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी बुधवारी (५ ऑक्टोबर २०२२) सांगितले की, "भगवान राम, हनुमान आणि रावण यांचे चित्रण महाकाव्यानुस
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर श्री रामच्या नगरी अयोध्येत प्रदर्शित झाल्यापासून निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटातील प्रभास आणि सैफ अली खानचा लूक ट्रोल होत आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माते आणि स्टारकास्टने केलेल्या चुकांमुळे चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा कोणत्या चुका आहेत? ज्यामुळे 500 कोटींचा चित्
सुजीथ दिग्दर्शित साहो या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रभास च्या चेहऱ्यावर स्पॉटलाईट असून त्याच्या चेहऱ्यावर एक तेज झळकत आहे. हे ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर आज प्रदर्शित झाले असून या पोस्टरच्
सुजिथ दिग्दर्शित 'साहो' चित्रपटाची चित्रपटक्षेत्रात सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, सध्या चित्रपटांमध्ये असलेली स्पर्धा लक्षात घेता चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शनाची तारीख १५ ऑगस्टऐवजी ३० ऑगस्ट करण्याचा निर्णय घेतला.
'साहो' चित्रपटामधील प्रभास चा लूक आपण पहिला असेलच आता आज चित्रपटात आणखी एक महत्वाची भूमिका असलेल्या निल नितीन मुकेशच्या डॅशिंग लूकचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. २०१७ सालीच निल नितीन मुकेशने 'साहो' मधील आपल्या सहभागाविषयी प्रेक्षकांना अंदाज दिला होता. त
प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या साहो या चित्रपटाचे वेड प्रेक्षकांवर असतानाच नुकतेच त्यावरील एक गेम देखील लॉन्च करत असल्याचे साहोची निर्मिती संस्था असलेल्या युव्ही क्रिकेएशन्सने जाहीर केले.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या बहुचर्चित 'साहो' या चित्रपटातील 'सायको सैय्या' या गाण्याच्या यशानंतर 'एन्नी सोनी' या गाण्याचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला.
साहो चित्रपट त्याच्या बदललेल्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे आधीच चर्चेत होता आणि आता त्याचे आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यातील जबरदस्त केमेस्ट्री दाखवणारे हे पोस्टर आज प्रदर्शित झाले.
बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचा घोषणा आज करण्यात आली. पूर्वनियोजित तारखेनुसार १५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र आता चित्रपटातील काही महत्वाच्या ऍक्शन सिक्वेन्सवर काम सुरु असल्यामुळे चित्रपट ३० ऑगस्टला प्रदर्शित करणार असल्याचे चित्रपटकर्त्यांनी प्रसारित केलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.
'साहो' या बिग बजेट ऍक्शन थ्रिलर चित्रपटामधील 'सायको सैया' हे बहुप्रतीक्षित पार्टी सॉंग आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा एक वेगळाच अवतार या गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'साहो' या भारतातील आगामी ऍक्शन थ्रिलर चित्रपटाविषयी सर्वत्र चर्चा असताना या चित्रपटातील पहिल्याच 'सायको सैया' या गाण्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. 'सायको सैया' हे गाणे ध्वनी भानुशली यांनी गायले असून तिनिष्क बागची यांनी लिहिले आहे.
बाहुबलीमधील आपल्या जबरदस्त अभिनयाच्या अविष्कारानंतर आता आणखी एका अद्वितीय अशा अवतारात प्रभास आपल्याला दिसून येणार आहे. 'साहो' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या या चित्रपटाचा देशात प्रचंड बोलबाला आहे.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रभासच्या 'साहो' या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. परंतु या चित्रपटातील एक महत्वाचा भाग असलेल्या शंकर एहसान आणि लॉय या त्रिकुटाने मात्र चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनातून बाहेर पडल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.