उल्हासनगरमधील पवई चौक परिसरात असलेल्या 'आचल पॅलेस बार'वर पोलिसांनी छापा टाकला आहे. बेकायदेशीरपणे बार चालवणे आणि अश्लील कृत्ये करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल बारचा चालक, मॅनेजर, वेटर, १० बारबाला आणि ८ ग्राहकांसह एकूण २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त भाजपच्या वतीने रविवार, दि. २५ मे रोजी पवई येथील गणेश विसर्जन घाटावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर घाटाचे पूजन करून राजमाता अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली.
पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्या स्वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पवई तलावाच्या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी मलजल
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
सुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी केले.
वन विभागाने पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करू पाहणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे (powai crocodile). बुधवार, दि. १० जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली (powai crocodile). आय.आय.टी पवई परिसरात हा आरोपी मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी आला होता. (powai crocodile)
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असणारा पवई तलाव दि. ८ जुलै रोजी पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी फक्च औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. पावसादरम्यान ओव्हर फ्लो होणारा हा मुंबईतील पहिला तलाव आहे.
पवई परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ५७ जणांना अटक त्यात सहा महिलांचा समावेश आहे. याशिवाय १५ महिलांना नोटीस देण्यात आली आहे.
वीज उप केंद्रातील बिघाडाचा फटका बसलेल्या पवई निम्नस्तर सेवा जलाशयाच्या कामगार, कर्मचाऱयांनी अहोरात्र प्रयत्न करत या निम्नस्तर सेवा जलाशयाच्या आवारातील विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला. ही कामगिरी बजावलेल्या जल अभियंता खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवार, दि. १६ मे रोजी कौतुक केले. महानगरपालिका आयुक्तांच्या आस्थेवाईक संवादामुळे कामगार, कर्मचारी भारावून गेले.
मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. ही रस्ते काँक्रिटीकरणाची कामे अत्युच्च व सर्वोत्तम दर्जाची व्हावीत यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्ते बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
मुंबई : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ४०० कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी इस्पितळ आणि क्रीडा संकुलाचा पायाभरणी व भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.
मूळचा गुजरात येथील दर्शन सोळंकी या ‘पवई आयआयटी’च्या विद्यार्थ्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी ‘आयआयटी’ वसतिगृहाच्या परिसरातच आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने समाज ढवळून निघाला. काही संघटनांनी ठामपणे सांगितले की, दर्शन मागासवर्गीय होता म्हणून त्याच्याशी जातीभेद केला गेला. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. यावर ‘पवई आयआयटी’ने अंतर्गत अहवाल सादर केला. महाराष्ट्र सरकारने दर्शनच्या मृत्यूसंदर्भात विशेष तपास पथक नियुक्त केले. दर्शनच्या मृत्यूनंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि घटना यांचा मागोवा घेणारा हा लेख..
पवईतील वादग्रस्त आणि अनधिकृत सायकल ट्रॅकवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'काहींना अजूनही मुंबई ही आपल्या बापाचीच आहे असं वाटतं. आपल्याला हवं तिथं सायकल ट्रॅक आणि इतर कामे करायची, स्वतः राज्याचे पर्यावरण मंत्री असताना मुंबईच्या पर्यावरणाचे नुकसान होईल असे उद्योग करायचे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पवई सायकल ट्रॅक पदकामासाठी काढण्यात आलेल्या कंत्राटाचे ६६ लाख रुपये आदित्य ठाकरेंनी स्वतः मुंबईकरांना परत करावेत. मुंबई अपने बाप की नहीं है..याद रखना,' अ
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एस' वाॅर्डमधील पवई तलावातील 'सायकल ट्रॅक'चे अर्धवट बांधकाम हटवण्यासाठी अखेर निविदा मागवण्यात आल्या आहेत. या साठी सुमारे ६६ लक्ष खर्च होणार आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागातून या निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामार्फत पवई तलाव परिसर पूर्ववत करण्यात येणार आहे. या बांधकामाधिन असलेल्या 'जॉगिंग’ आणि ‘सायकल ट्रॅक'ला मुंबई उच्च न्यायालयाने गतवर्षी दि. ६ मे रोजी बेकायदेशीर ठरवले होते. तसेच तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेही बांधकाम न करण्याचे निर्देश बृहनमुंबई महानगरपालिकेला दिले होते
पवई 'सायकल ट्रॅक' प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेला बजावली न्यायालयाच्या अवमानाची नोटीस
बृहन्मुंबई महानगर पालिकेने पवई तलावातील सायकल ट्रॅक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष याचिका अखेर बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी मागे घेतली. सुनावणीच्या एक दिवस आधी ही याचिका मागे घेतली असली तरी हा बांधकामाधीन असलेला सायकल ट्रॅक पालिकेकडून कधी काढला जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पवई तलावातील 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चे काम थांबवून, तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी महानगरपालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 'सायकल ट्रॅक'चे काम थां
सालाबादप्रमाणे यंदाही जुलै आणि आता ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसात मुंबईची तुंबई झालीच. त्यामुळे मुंबई महानगरपालिका पूरस्थिती रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा सातत्याने दावा करीत असली तरी यंदाही पालिकेने केलेल्या सर्व उपाययोजना फोल ठरल्या आहेत. त्यामुळे यावर्षीही मुंबईही बुडत्यांचे शहरच ठरले आहे.
पवई तलावातील 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चे काम थांबवून, तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी महानगरपालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 'सायकल ट्रॅक'चे काम थांबवण्यात आले, परंतु, तलाव परिसर पूर्ववत करण्याच्या आदेशांचे पालन पवई तलाव परिसरात अजिबात झालेले दिसत नाही. या बद्दल विचारले असता "गरजेनुसार पालिका पाऊले उचलेल, नो कॉमेंट्स'’ असे उत्तर देण्यात आले आहे.
पवई तलाव परिसरातील आंबेडकर उद्यानालगत असलेल्या पाण्यात ५० मीटरहून अधिक लांबीपर्यंतचा खडी-दगडांचा भराव घालून बेदरकारपणे ‘सायकल ट्रॅक’च्या बांधण्यास सुरुवात झाली होती. हा बांधकामाधिन असलेल्या 'जॉगिंग’ आणि ‘सायकल ट्रॅक' मुंबई उच्च न्यायालयाने यावर्षी दि. ६ मे रोजी बेकायदेशीर ठरवला होता. तसेच तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेही बांधकाम न करण्याचे निर्देश बृहनमुंबई महानगरपालिकेला दिले होते. केलेले बांधकाम तत्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्ववत करण्यास सांगितले होते. तसे न करता, मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्य
"माजी मुख्यमंत्र्यांना जर मुंबईच्या पर्यावरणाचे एवढेच प्रेम होते तर त्यांनी स्वतःच्या पर्यावरण मंत्री मुलाने बांधलेला पवई सायकल ट्रॅक का नाही रोखला" अशा शब्दांत पलटवार करत भाजप आमदार नितेश राणे ठाकरेंची पोलखोल केली
काश्मीरी हिंदूंवर होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. मंगळवार, दि. ७ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता 'आयआयटी बी फॉर भारत'द्वारे या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत इस्लामिक जिहादींतर्फे काश्मीरी हिंदूंची भर दिवसा हत्या करण्यात आली. आयआयटी कॅम्पसमध्ये या सर्व मृतात्म्यांना सुमारे दोनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयआयटीचे आजी माजी प्राध्यापकही उपस्थित होते. काश्मिरी हिंदूंच्या हत्या प्रश्नावर त
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक इमारती आणि दरडींखाली राहणार्या रहिवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
मुंबईमधील पवई तलावाच्या सुशोभीकरणासाठी उभारण्यात येणाऱ्या कारंज्यांच्या खर्चाने पालिकेच्या खिशाला मोठे भगदाड पडणार आहे
पवई चांदिवली भागात ३२२ कोटींचे नवीन रुग्णालय मुंबई महानगर पालिका बांधणार आहे. त्यासाठी सल्लागार म्हणून नेमलेल्या कंपनीला फक्त सल्ला देण्याचे ६ कोटी पालिका मोजणार आहे.
मुंबई महापालिकेने पवई तलावाच्या जैवविविधतेच्या देखरेखीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापली असतानाही, तलावातील जलचरांवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू होते. यावेळी जलपर्णींवर आसरा घेतलेल्या मगरी आणि त्यांच्या पिल्लांचा विचार न करता हे काम रेटण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या कामावेळी पालिकेने नेमलेल्या तज्ज्ञ समितीमधील सदस्य उपस्थित नसण्याबाबत पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.
सुदैवाने जीवितहानी नाही
प्रकल्प रद्द करण्यासाठी 600 पेक्षा अधिक नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पवईमधील नॅशनल इस्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या (एनआयटीआयई) कॅम्पसमध्ये बिबट्याचे पिल्लू सापडले आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास हे पिल्लू याठिकाणी आढळून आले. सध्या वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव अभ्यासक घटनास्थळी असून पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पालिका प्रशासन हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये दोन बैलांच्या झुंजीत विद्यार्थ्याला उडविल्याचे समोर आले आहे. काल सकाळी मुलांच्या वसतिगृहाजवळ ही घटना घडली असून बैलांची धडक बसल्याने विद्यार्थी जखमी झाला आहे.
आजही आपल्या एका देशात तीन भारत राहतात. हिंदुस्थान, इंडिया आणि भारत. यातील दरी सांधायची असेल तर विषमतामुक्त देशाची निर्मिती व्हायला हवी. तशी व्यवस्था निर्माण करायला हवी." असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
देशात हवामान आधारित असणारी शेतीसाठी सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन दुप्पट आणि खर्च कमी होण्यास मदत झाली तर डिजीटल सोल्युशन शेतकऱ्यांसाठी योगदान ठरेल, त्यामुळे शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.