‘जनरल प्रॅक्टिस’ आणि ‘फॅमिली फिजिशियन’ ही देखील एक प्रकारची वैद्यकीय स्पेशालिटी आहे. ‘फॅमिली डॉक्टर’ला सर्व वैद्यकीय विषयांचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ‘हिस्ट्री’ व तपासणीवर अचूक निदान करण्याची क्षमता आवश्यक आहे. निदान पक्के झाल्यावर पुढील उपचार देणे सोपे जाते. आजारांच्या निदान व उपचार याशिवाय लसीकरण, कुटुंब नियोजन, साथीच्या आजारांचा नियंत्रणाबद्दल लोकशिक्षण, दुर्धर आजारात रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांस दिलासा देणे इत्यादी अनेक कामे चांगला ‘फॅमिली डॉक्टर’ करू शकतो.
Read More
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते. अशा साधकांना ‘गंधर्व’ही म्हणतात. साधकाची ‘गंधर्व’ ही एक उच्च आपतत्त्वीय अवस्था आहे. सर्व सिद्ध, यक्ष, गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात. कारण, याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते. आपतत्त्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे. आपतत्त्व सिद्धीसंबंधी वेदांमध्ये अनेक सुंदर ऋचा लिहिलेल्या आहेत व संध्यावंदनाच्या वेळी द्विज या ऋचा म्हणतात. ‘आपोहिष्ठा मयोभुवः तान उर्जे दधातनः। महेरणाय चक्षसे योवः शिवतमो रसः तस्य भाजयतेह नः। उशतीरीव मातर: तस्मा अर गमाम वः। यक्ष क
एखाद्या शिवसैनिकाला जखम झाली तर आपण धावून जाता! इथे तर लाखो मतदार जनता जनार्दन आहेत ते शिवसैनिकांपेक्षाही महत्त्वाचे आहेत! आपला पक्ष वाढविण्याकरिता तरी आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही? मला पूर्ण खात्री आहे. आपण आम्हाला ‘आयसीयू’च्या निकषांप्रमाणे व सर्व रुग्णांना कोरोनाच्या उपचाराकरिता कमीत कमी ५० डॉक्टर्स फिजिशियन नियुक्त करा! आणि १५०परिचारिकांच्या जागा भरा, सर!