महापालिका भाडेतत्त्वावर घेणार असलेल्या 300 बसबाबत इतर राज्यातील ‘ई-बस’च्या दरासंदर्भात विचार करुन अंतिम निर्णय घेतला जाईल आणि महापालिका प्रशासनासोबत चर्चा केली जाईल, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
Read More
वाघोली येथील सोलासीया सोसायटीच्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या ‘ड्रेनेज चेंबर’मध्ये सफाई काम करताना तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चेंबरमध्ये प्रवेश करताना जीविताचे रक्षण व्हावे, म्हणून तिघांना कोणतेही साधन साहित्य पुरविले गेले नसल्याचे दिसून येते. या घटनेची चौकशी करावी, तसेच ‘ड्रेनेज’ सफाईचे काम यंत्रांद्वारे करावे, अशी मागणी ’विवेक विचार मंच’च्या वतीने करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून देण्यात येणार्या नागरी सुविधा नागरिकांना नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि या ‘डिजिटल’ प्लॅटफॉर्मचा नागरिकांकडून जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती (डेटा) उपलब्ध करून शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी साहाय्य करण्यासाठी ‘द अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क 2022’ या उपक्रमाद्वारे प्रगतीची योग्य पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
“स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःची क्षमता ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. ध्येय नक्की काय आहे आणि ते आपल्याला का साध्य करायचे, हे अगोदर ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असून खडतर मेहनत करून विश्वासाने ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित लढविणार आहे. त्याबाबतचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर तयारीला लागणार असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विकासकामांचा ‘सीएम’, ‘डीसीएम’ दरमहा आढावा घेणार आहेत.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या सदस्य पदासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या नियोजन समितीच्या सदस्य पदाच्या ३० जागांसाठी एकूण १०८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.