साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पु.ल. कट्टा कल्याण या संघटनेचे संस्थापक सदस्य रमेश करमरकर यांचे दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरी अकस्मात निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी स्वप्नगंधा आणि पत्नी स्नेहल असा परिवार आहे.
Read More
माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन झाले आहे. शुक्रवार, २ मे रोजी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते अरुणकाका या नावाने सर्वत्र परिचित असून त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
माजी आमदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, माजी प्रदेश सरचिटणीस तसेच विदर्भ विभागाचे माजी संघटन डॉ. रामदास आंबटकर यांचे बुधवार, ३० एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाल्याची माहिती पुढे आली आहे. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Madhukarrao Pichad भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. आदिवासींच्या हक्कासाठी व्यापक लढा उभा करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती.
शाहीर मधुकर नेराळे यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं खूप मोठं नुकसान झालंय. कोण होते हे मधुकर नेराळे ( Madhukar Nerale ) आणि काय होतं त्यांचं कलाक्षेत्रातील योगदान जाणून घेऊया या व्हिडिओतून
‘शारदा ज्ञानपीठम्’चे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक, लेखक, पत्रकार पंडित वसंतराव गाडगीळ यांचे १८ ऑक्टोबर रोजी पुण्यात वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी गाडगीळ यांनी अवघे आयुष्य समर्पित केले होते. प्राचीन संस्कृत ग्रंथांसह, वेद, उपनिषदांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत अध्यापन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, ‘शारदा’ संस्कृत मासिक, असे संस्कृतच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच. अशा या ऋषित
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक नीला उपाध्ये यांचे दि. ७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. अफाट उत्साह, दुर्दम्य आशावाद, प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि तितक्याच संवेदनशील मनाच्या नीला मॅडम... “पत्रकारितेच्या क्षेत्रात मानवी मूल्ये जपणे जितके महत्त्वाचे तितकेच आपले संस्कार शाबूत राखणेही महत्त्वाचे” अशी शिकवण देणार्या नीला मॅडम. त्यांच्या निधनानेे अक्षरश: जिवाला चटका लागला. या श्रद्धांजलीपर लेखात सारांश रूपाने त्यांच्या आणि माझ्या स्नेहबंधाचे शब्दचित्रण...
विद्या विकास एज्युकेशन सोसायटी व स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संचालक श्री. प.म. राऊत यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वार्ध्यक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शाळेतून ज्ञानदानाचे काम सुरु करून १९६२ साली पंतनगर, घाटकोपर येथे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिक कार्यास सुरुवात केली.
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या विश्वस्त स्नेहलता देशमुख यांचे दि. २९ जुलै रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांमध्ये महत्त्वाचं कार्य केलं.
सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुहास तानाजी गवते (वय 60) यांचे सोमवारी निधन झाले. त्याच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. सुहास गवते यांनी बालनाट्यचा मेकअप आणि ड्रेस डिपार्टमेंट पाहत त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या हाताखाली ते तयार झाले. स्मिता तळवलकर यांच्या अस्मिता चित्रचे ते प्रमुख मेकअप मन होते.
महाराष्ट्रातील नावाजलेले उद्योगपती, मराठे इन्फोटेक प्रा. लि.चे संस्थापक विनय मराठे यांचे रविवारी सायंकाळी ठाण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई वसुधा मराठे, पत्नी वैशाली मराठे, मुलगी गौरी मराठे, मुलगा सुमुख मराठे, नात आणि जावई असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर जवाहर बाग स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.
समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला हा अक्षरबोध आपल्या अंगी 100 टक्के उतरविण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक अक्षरव्रती आहेत, त्यांच्यात अग्रणी ठरावेत, असे पांडुरंग तथा अरविंदराव गोखले होते. ‘होते’ म्हणण्याचे कारण, या अक्षरब्रह्माच्या उपासकाने दि. 20 डिसेंबर, 2023 रोजी या जगाचा निरोप घेतला, एका प्रकारे कळत्या वयापासून घेतलेल्या सुंदर अक्षराच्या एका व्रताची सांगता झाली.
अरविंदराव गोखले रोज संध्याकाळी शाखा वेषात शाखेवर पूर्ण वेळ उपस्थित असायचे. बाल-तरुणांचे विविध खेळ, शारीरिक कार्यक्रम ते घेत असत. त्यात स्वत:ही आवर्जून सहभागी व्हायचे. सांघिक गीत हा त्यांच्या आवडीचा विषय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंत रामचंद्र जाधव (६३) यांना मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली. गेले काही महिने ते न्युमोनियाशी झुंज देत होते. मुंबईतील एका खासजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री १.१५ वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. परिचयातील सर्व स्वयंसेवक त्यांना प्रेमाने 'बावा शिक्षक' म्हणायचे.
प्रदीप पटवर्धन यांनी वयाच्या ६५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीमध्ये जगभरात हॉलीवूडचे नाव खूप मोठे आहे. याच हॉलीवूडच्या 'गॉडफादर' सिनेमाने जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवला आहे.
‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे संचालक सुनील मेहता यांचे बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. मेहता यांच्यासोबत काही काळ काम केलेल्या अक्षय वाटवे यांनी सुनील सरांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
गणेश मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष व विश्वस्त आणि बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले अच्युत मधुसुदन कऱ्हाडकर यांचे मंगळवारी सायंकाळी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आनंद आणि श्रीनंद,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सरदार तारासिंग यांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस यांच्या शोकसंवेदना
कोरोनाची लागण झाल्याने श्वास घेण्यास होत होता त्रास!
टायगर श्रॉफने वाहिली श्रद्धांजली!
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ‘बाबूजी नहीं रहे…’, असे त्यांनी ट्विट करत, लालजी टंडन यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी दिली.
कर्करोगाशी लढता लढता मागितली होती मदत!
सरोज खान यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभिमराव नरसिंगराव (बी. एन.) देशमुख काटीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.
हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार हा गेली दोन वर्ष 'ग्लायोब्लास्टोमा' (ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजेच त्याच्या वाढदिवसालाच अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथील रुग्णालयात त्याच्यावर कर्करोग शस्त्रक्रीया झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा जन्म नागपूर येथील असून तो ४२ वर्षांचा होता.
जाहिरातीत फ्रॅक्ट्रीचा मालक इरफान कॅबिनमध्ये बसलेला असतो, तितक्यात एक कर्मचारी त्याला नव्या प्रकल्पाबद्दल सांगण्यासाठी येतो. 'सर ये नया प्रोजेक्ट न थो़डा डिफिकल्ट लग रहा है', इरफान त्याला विचारतो 'क्या ?' 'सर वो नया प्रोजेक्ट' कर्मचारी पुन्हा पुटपूटतो. 'नही वो कौनसा वर्ल्ड डिफ्', इमरान पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहतो. 'सर तुम्ही यापूर्वी कधी डिफिकल्ट (Difficult) शब्द ऐकला नाही का ?' यावर 'ऐकला असता तर इतक्या मोठ्या फ्रॅक्ट्रीचा मालक कधी बनू शकलो नसतो.', असे सांगत इरफान तिथून निघून जातो. जातान
ज्येष्ठ अभिनेते रविराज काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन
फ्रान्स दौऱ्यावर असल्याकारणाने पंतप्रधान मोदींनीही फोनवरून जेटलींच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. आपण खूप जवळचा मित्र गमावला असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली. त्यावेळी अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांनी तुम्ही देशासाठी परदेशात गेले आहेत. त्यामुळे दौरा अर्धवट सोडून परत येऊ नये असे पंतप्रधान मोदींना सांगितले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्टंट मॅन म्हणून जवाजलेले दिग्दर्शक आणि ऍक्शन कोरिओग्राफर वीरू देवगण म्हणजेच सुपरस्टार अजय देवगण यांच्या वडिलांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
जेष्ठ समाजसेविका तसेच भाजपच्या माजी कल्याण जिल्हा सरचिटणीस ज्योती पाटकर यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासपात्र नेते आर. के. धवन यांचे आज निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली येथील बी.एल. कपूर रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.