शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शंभर व पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याने, यापुढे मागणी करण्यात येऊ नये, अशी तंबी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली.
Read More
(Jalna ) राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. एकीकडे कॅापीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरु झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत या पेपरच्या प्रती झेरॅाक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, एकामागोमाग एक निर्णयांचा धडाकाच लावला आहे. अमेरिकन जनता आणि राजकारण्यांना ट्रम्प यांचे निर्णय पटो अथवा न पटो, आता त्यांच्या पालनाशिवाय गत्यंतर नाहीच. असाच एक निर्णय म्हणजे, पेपर स्ट्रॉऐवजी पुन्हा प्लास्टिक स्ट्रॉच्या सरसकट वापराची अंमलबजावणी.
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव गेल्या तीन-चार दिवसांपासून भलतेच चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा घाट घातला होता. आता कोणालाही प्रश्न पडेल की, हे सगळे पराभूत उमेदवाराचेच कारस्थान असावे. पण, नाही, हा सगळा डाव रचला तो चक्क विजयी उमेदवारानेच. माळशिरस मतदारसंघातून विजयी झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ. उत्तमराव जानकर. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा १३ हजार, १४७ मतांनी पराभवदेखील केला. म्हणजे हा फरक थोडाथोडका, शे-दोनशेचाही नसून, दहा हजारांहून
'पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड'च्या नफ्यात मोठी वाढ झाली असून सहामाहीत कंपनीने चांगली कामगिरी नोंदविली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पुदुमजी पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडचा नफा ९९ टक्क्यांनी वाढला आहे. सहामाहीत करपूर्व नफ्यात मोठी वाढ नोंदवत कच्च्या मालाची किंमत आणि निव्वळ कमी झाल्यामुळे ७,७०३ कोटी रुपये इतके आहे.
पेपरफुटीच्या घटना वाढू लागल्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धापरीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचे विधेयक शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी विधानसभेत सादर करण्यात आले. पेपरफुटी करणार्याला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आणि एक कोटी रुपये दंडांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले.
नीट(NEET) पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई सुरूच आहे. सीबीआयने ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम आणि पत्रकार जमालुद्दीन यांना झारखंडमधील हजारीबाग येथून अटक केली आहे. सीबीआयने याआधी आणखी चार आरोपींना अटक केली असून सर्व आरोपींना विमानाने दिल्लीत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
NEET पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या कारवाईला वेग आला आहे. सीबीआयच्या रडारवर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्यातील पेपर लीक प्रकरणातील सहभागींच्या शोधात आहे. NEET मध्ये फसवणुकीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सारनाथ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. या वेळी फसवणुकीप्रकरणी या ३३ आरोपींची चौकशी करून सीबीआय सॉल्व्हर टोळीच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
काँग्रेसने कालच ‘न्यायपत्र २०२४’ अंतर्गत दहा मुद्द्यांसह आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या ‘न्यायपत्रा’त काँग्रेसचे सरकार निवडून आले, तर विदेशनीती कशी असेल, या विषयीदेखील १२ मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. खरं तर स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून काँग्रेसनेच देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. त्यामुळे काँग्रेसच्या काळात भारताची विदेशनीती नेमकी कशी राहिली आणि त्या काळात भारताने किती कमावले अन् किती गमावले, हे तसे सर्वज्ञातच.
मोदी सरकारने युपीए सरकारच्या कथित गैरव्यवहारांची पोलखोल करण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी काळात झालेला भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाने ठरवले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या निर्णयाची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांची प्रतिमा पारदर्शक असली तरी याकाळात मात्र अनेक मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे चर्चेत आली. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा ,चारा घोटाळा अशा घोटाळ्य
क्रिप्टो वर सरसगट बंदी घालणे हा महागडा व अव्यवहार्य असल्याचा दावा International Monetary Fund (IMF) ने केला एका Synthesis पेपरमध्ये केला आहे. या सल्याचा दाखला देत क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्यापेक्षा एक विस्तृत नियमावली बनवायला हवी असे मत क्रिप्टो ट्रेडर्सने मांडले आहे. गुरूवारी हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून आठवड्याच्या शेवटपर्यंत G २० च्या सगळ्या सदस्यांना हा रिपोर्ट प्रस्तुत केला जाईल.
मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमांवर सत्य घटनांवर आधारित चित्रपट आणि वेब मालिकांची रांग लागलेली पाहायला मिळते. अशात अलीकडच्या काळात ओटीटीवर अनेक वेब मालिका या वास्तविक मांडणीतून आकारास येत असून प्रेक्षकांनाही त्या आवडत असल्याचे दिसून येते. यात 'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी' या सीरिजचं नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. १९९२ साली शेअर बाजार घोटाळा प्रकरणातील आरोपी हर्षद मेहतावर ही मालिका आधारित होती. आता याच मालिकेच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी देशातील अजून एक मोठा घोटाळा वेब मालिकेच्या माध्यमातून समोर आणला
पालघर जिल्ह्यातील वनवासी भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्य करणार्या ‘सेवा विवेक’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या आकर्षक राख्यांचे विमोचन राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच पुणे येथील राजभवनात करण्यात आले.
उल्हास नदीचे वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. काही उपाययोजना अद्याप कागदावर असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन कागदी घोडे नाचवून काहीतरी तात्पुरती उपाययोजना राबविते, मात्र पुढे त्याचे फलित शून्य असते.
निसर्गाच्या सुंदर दृश्यांना आपल्या जादूई हाताने लहान लहान आकारात त्यांच्या चित्रकृती साकारणार्या ‘टायनी क्वीन’ महालक्ष्मी यांच्या अनोख्या कलेचा प्रवास पाहूया...
आपण पाकिस्तानच्या जनतेसाठी आणि पाकिस्तानच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हा त्याग करत आहोत, अशी प्रतिक्रिया शरीफ यांनी दिली आहे. त
शिक्षकांनीही सुरुवातीला ऑनलाईन पेपर तपासणीकडे ‘तांत्रिकदृष्ट्या सर्वांना झेपेल का?’ वगैरे चष्म्यातून पाहिल्याने आणि पुरेशा पूर्वप्रशिक्षणाअभावी उदासीनता होती
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईच्या पेपर फुटीप्रकरणासंबंधीच्या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी आज याविषयी आपल्या सोशल मिडीयावरून घोषणा केली आहे.
यामध्ये दिल्लीतील एका कोचिंग क्लासेस संचालक आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे.
एसईचा पेपर फुटल्याच्या घटनेवरून ठाकरे यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले.
ही खूप दुःखद घटना आहे. या १६ लाख विद्यार्थ्यांची व त्यांची पालकांचे पीडा मी समजू शकतो. मी ही एक पालक आहे. विद्यार्थ्यांची काय मानसिकता असते याची मला पुरेपूर कल्पना आहे असे जावडेकर यावेळी म्हणाले.
Pachora, Bhadgaon, Paper Horses, R O Plant