(Veteran Nuclear Scientist M. R. Srinivasan passes away at 95) प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. मंगळवारी २० मे रोजी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी तामिळनाडूतील उदगमंडलम येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारताने एक असा शास्त्रज्ञ गमावला आहे ज्यांनी देशाला अणुऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न साकार केले.
Read More
केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा रूपांतरणासाठी छोट्या अणुभट्ट्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. बुधवारी संसदेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अणुऊर्जामंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, अणुऊर्जा हा वीज निर्मितीसाठी सर्वात आशादायक स्वच्छ ऊर्जा पर्यायांपैकी एक मानला जातो. आगामी काळात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर पडत आहे.
चीनमध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीत ऑक्सिजन संपल्याने गुदमरल्याने चिनी खलाशांचा मृत्यू झाला. ब्रिटिश गुप्तचर अहवालाचा हवाला देत ‘द मिरर’ या वृत्तपत्राने हा दावा केला आहे. या दुर्घटनेत ५५ चिनी खलाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनची पाणबुडी नौदलाच्या जाळ्यात अडकली. हे जाळे अमेरिकन आणि ब्रिटिश जहाजांना अडकवण्यासाठी विणण्यात आले होते. ही घटना ऑगस्ट महिन्याची आहे. हे सर्व दावे मिररने ब्रिटिश गुप्तचर अहवालाद्वारे केले आहेत.
भारतातील पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात आला आहे. पहिल्या स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पाने (केएपीपी) वीज निर्मिती सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदनही केले आहे.
जपान सध्या त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पातील किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडण्याच्या तयारीत आहे, ज्याला खुद्द जपानी नागरिकांकडून जोरदार विरोध सुरू झाला. त्यानिमित्ताने जपानकडे हे किरणोत्सारी पाणी कुठून आले आणि ते समुद्रात का सोडले जाणार आहे, हे जाणून घेऊया.
स्वयंसेवी संस्थांची कार्यपद्धती, त्यांना परदेशातून मिळणारा निधी, त्यांच्याकडून केली जाणारी प्रत्यक्ष कामे याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प, जलविद्युत निर्मिती प्रकल्प, युरेनियमचे उत्खनन, कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान, कोळशाच्या खाणी, मोठे औद्योगिक प्रकल्प अशा विशिष्ट क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांवर ‘लक्ष’ ठेवले पाहिजे.
दोन्ही देशांमधील कराराअंतर्गत माहितीची देवाण घेवाण
१९५० मध्ये अमेरिकेच्या पुढाकारानेच इराणच्या अणुकार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आज याच अणुकार्यक्रमामुळेच इराणमध्ये आर्थिक अरिष्टाची परिस्थिती उद्भवली.
रत्नागिरीतील शिवसेना आमदार राजन साळवी यांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिला आहे. त्यामुळे सध्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आयएसआयएसने पाकिस्तानची तुलना थेट उत्तर कोरियाशी करत, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अणु उर्जा वापराविषयी माहिती आपल्या अहवालामध्ये दिली आहे.
'तुम्ही आम्हाला तुमच्या अणुशक्तीविषयी सांगता, परंतु अमेरिकेची अणुशक्ती तुमच्या पेक्षा कित्येक पटीने मोठी असून आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो कि, या अणुशक्तीचा वापर करण्याची वेळ अमेरिकेवर कधीच येऊ नये'