अविश्वास ठरावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण केले. भाषणाद्वारे त्यांनी काँग्रेससह विरोधी आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कच्चातिवु बेटाचादेखील उल्लेख केला. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मोदींनी जे सभागृहाबाहेर जाऊन कान लावून ऐकत आहेत, त्या विरोधी पक्षांनी कच्चातिवुबद्दल सांगावे, असे आवाहन केले.
Read More
केंद्र सरकारने संसदेत अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला आणि देशभरात नकारात्मकता पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. क्षेत्रीय पंचायती राज परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान एका महिला खासदाराला फ्लाइंग किस दिल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींवर करण्यात आला होता. या कृत्याबद्दल भाजपच्या महिला खासदारांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता काँग्रेसच्या एका महिला आमदाराने आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बचावासाठी अजब विधान केले आहे. या महिला आमदाराच्या म्हणण्यानुसार, जर राहुल गांधींना फ्लाइंग किस द्यायचे असेल तर ते एका मुलीला देतील?,असे वादग्रस्त विधान केले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे. या ठरावावरील चर्चेत असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा भाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकार मुस्लिमांसोबत भेदभाव करत असल्याचा आपला जुनाच आरोप केला.
अविश्वास प्रस्तावावर संसदेत बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "विरोधकांना देशाची चिंता नाही, पंतप्रधानपदाच्या गरिमेची चिंता नाही, राष्ट्रपतीपदाची चिंता नाही. त्यांना फक्त राजकारण करायच आहे. मी या संसदेत 20 वर्षांपासून खासदार आहे. पण असे दृश्य मी कधीच पाहिले नाही".
आज अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी गेल्या तीन दिवस लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. लोकसभेत ते म्हणाले की, ही आमची नाही, तर ही विरोधकांची फ्लोर टेस्ट आहे आणि आम्ही २०२४ मध्ये परत निवडूण येऊ. देव खूप दयाळू आहे आणि कोणत्या तरी माध्यमातून बोलतो...विरोधकांनी हा ठराव आणला हा देवाचा आशीर्वाद आहे असे मला वाटते. २०१८ च्या अविश्वास प्रस्तावादरम्यान मी म्हणालो होतो की ही आमच्यासाठी फ्लोअर टेस्ट नव्हती तर त्यांच्यासाठी फ्लोर टेस्
राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर महिला खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की, 'मला एका गोष्टीवर माझा आक्षेप व्यक्त करायचा आहे. ज्यांना माझ्यासमोर बोलण्याचा अधिकार दिला गेला त्यांनी आज निघताना आपले स्त्रीविरोधी चरित्र दाखवले.
विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचारावर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर दिली. त्यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. मणिपूरमधील व्हायरल व्हिडीओच्या घटनेवर गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "४ मेची घटना लज्जास्पद आहे, पण हा व्हिडिओ संसदेच्या अधिवेशनाच्या एक दिवस आधी का आला. हा व्हिडिओ पसरवणाऱ्या व्यक्तीने तो तेव्हाच पोलिसांच्या हवाली करायला हवा होता. ज्या दिवशी व्हिडिओ सापडला त्याच दिवशी ९ लोकांची ओळख पटली आणि त्यांना पकडले गेले आणि आता
विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव हा सरकारविरोधात नसून त्यांच्यातीलच अविश्वासाचे निदर्शक आहे. त्यामुळे लोकसभेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना आता आपल्या मुलास सेट करणे आणि जावयास भेट देणे एवढेच काम उरले आहे, असा टोला भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी लगाविला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव स्वीकारला आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट दरम्यान लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत.
रोजगाराचा प्रश्न असेल किंवा राफेल कराराचा मुद्दा, राहुलनी केलेले सर्व आरोप हे अर्धवट आणि अपुर्या माहितीच्या जोरावर. त्यानेही काही साध्य होत नाही म्हटल्यावर आता ‘आम्ही सेक्युलर’ म्हणवणारी मंडळी हिंदुत्वाच्या रामकथांची पारायणं करतही सुटली आहेत. जनुवेधारी, सश्रद्ध असे हे निर्मळ मनाचे असलेले काँग्रेस अध्यक्ष आता जिथे-तिथे ‘मी किती हिंदू’ याचेच दाखले देताना दिसतात.
धो डाला...!
रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)कडे सध्या लोकसभेत ३५१ जागा आहेत. ज्यातील २७१ जागांचे पूर्ण बहुमत एकट्या भारतीय जनता पक्षाकडे आहे.
मोदी सरकार पाडायचे हा काँग्रेसचा निश्चय असल्याने अविश्वास प्रस्तावाचे नाटक करून काँग्रेसने आपण सरकार पाडण्यामध्ये किती उतावीळ आहोत हे दाखवून दिले आहे असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत मांडले आहे.
मोदी सरकारकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असून विरोधकांचा अविश्वास ठराव फोल ठरणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान यासाठी टीडीपीने आपल्या सर्व खासदारांसाठी पक्षादेश काढला असून अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे, असे टीडीपीने म्हटले आहे.