no

मणिपूरमध्ये ७ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ ; मणिपूर ही आशेची भूमी, शांततेशिवाय विकास नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील चुराचांदपूर येथे ७ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचा भूमिपूजन व शुभारंभ केला. या वेळी त्यांनी मणिपूरच्या जनतेच्या धैर्यशीलतेचे कौतुक केले आणि राज्याला आशा व आकांक्षांची भूमी असे संबोधले. मोदी म्हणाले की, मणिपूर ही संस्कृती, परंपरा, विविधता आणि रंगत यांचा अद्वितीय संगम असून ती भारताच्या एकात्मतेची मोठी ताकद आहे. मणिपूर या नावातच ‘मणि’ म्हणजे रत्न आहे. हे रत्न ईशान्य भारताच्या तेजात भर घालणार आहे, असे ते म्हणाले.

Read More

उपराष्ट्रपती निवडणूक – बी. सुदर्शन रेड्डी यांचे नामांकन दाखल

काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २० नेते प्रस्तावक बनले. नामांकनाच्या वेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संसद संकुलातील प्रेरणा स्थळावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली. उपराष्

Read More

इमारतीला बेकायदेशीर नोटिसांप्रकरणी हायकोर्टाने मुंबई महापालिकेला धरले धारेवर; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठन करण्याचे दिले निर्देश

राज्य सरकारच्या अधिकारांचा गैरवापर केलेल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्या.आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देत म्हटले आहे की “बेकायदेशीर नोटिसी प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणे आणि चौकशी करणे हे एक संवैधानिक न्यायालय म्हणून आमचे कर्तव्य आहे.” या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अधीन असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र

Read More

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

मुंबईतील धार्मिकस्थळे भोंगेमुक्त ; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती; १ हजार ६०८ भोंगे हटवले, १ हजार १४९ मशिदींचा समावेश

मुंबईतील धार्मिकस्थळे भोंगेमुक्त झाल्याची माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. यापैकी मुंबईत १ हजार ६०८ भोंगे हटवले असून, त्यात १ हजार १४९ मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारे आणि १४७ इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर आता भोंगा नाही. यासंदर्भातील अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read More

अभिराम भडकमकर यांच्या 'सीता' कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव!

प्रख्यात लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या सीता या कादंबरीने प्रकाशनानंतर अल्पावधीतच यशाची अनेक शिखरं गाठली. अशातच आता पुन्हा एकदा या कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव झाल्याचे दिसून येत आहे. इचलकारंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकारंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने 'सीता' या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात नागपूरच्या 'अभिव्यक्ती' वैदर्भीय लेखिका संस्थेच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार 'सीता' या साहित्यकृतीला प्रदान करण्या

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121