जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी. जनतेच्या सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
Read More
संगीत क्षेत्रात प्राविण्यप्राप्त असलेले रवींद्र पोंक्षे. सामाजिक जाणिवेतूनअनेक वर्षे त्यांनी रचनात्मक कार्य केले. संगीतकार आणि संवेदनशील कलाकार म्हणून ही स्वतःचा ठसा उमटवणार्या रवींद्र पोंक्षे यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासह सामाजिक भानही लक्षणीय आहे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
आज शाश्वततेच्या दृष्टीने आपल्या सर्वांना जागरूक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार दि. ४ जून रोजी केले.
महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ जून २०२५ रोजी रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे योजिले होते. त्याप्रमाणे, भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण मंडळातील प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम करण्यात आले व सदर कार्यक्रमाला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आह
(Cancer awareness campaign at kalyan and dombivali) राज्य सरकार आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम पार पडली. या मोहिमेला आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्या पुढाकाराने ही मोहीम पार पडली.
आज अन्नाची होणारी नासाडी ही फार मोठी समस्या आहे. देशासमोरील उपासमारीच्या समस्येवर अन्नाची नासाडी थांबवणे हा सुद्धा एक पर्याय आहे. यासाठीच संतजनांनी सुद्धा अन्नाच्या ब्रह्मशक्तीची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव वेळोवेळी करून दिली. तीच जाणीव नव्या रुपात करून देण्यार्या आणि गरजुंची क्षुधातृप्ती करणार्या रेस्टोरेंट क्रिकेट लीगविषयी...
पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दि. ११ ते दि. १९ जानेवारी या कालावधीत ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. समाजाला (कुटुंबांना) रा. स्व. संघाची ओळख व्हावी, संघकार्याची (सेवाकार्यांची) माहिती मिळावी व प्रत्यक्ष संघ/सेवा कार्यातील त्यांचा सहभाग वाढीस लागावा, तसेच सेवा वस्तीतील कुटुंबांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेस पूरक सहकार्य ‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’तील ( Kutumb Prabodhan Gatividhi ) दोन उपक्रमांमधून मिळून त्यास चालना मिळावी, असा हेतू यामागे होता. तसेच ‘कुटुंब प्रबोधना’च्या वेगवेगळ्या आयामांच्या विस्ताराचाही
भारतामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे दरवर्षी नव्याने सुमारे अडीच लाख रुग्ण आढळतात. दरवर्षी ऑक्टोबर महिना हा ‘स्तन कर्करोग जनजागृती’ महिना म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने स्तनाच्या कर्करोगामागची कारणे काय आहेत? त्याची लक्षणे कशी ओळखावी? या आजारावर कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत? ‘स्तन कर्करोग जनजागृती महिना’ म्हणजे काय? २०२४च्या स्तन कर्करोग जनजागृतीची संकल्पना काय आहे? याविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने डोंबिवलीतील ‘अनिल कॅन्सर क्लिनिक’चे संस्थापक अणि कॅन्सरच्या सुमारे २५ हजारांहून
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,मुंबई विभागाच्या माध्यमांतून दि. १३ जून २०२४ पासून नशा मुक्त भारत पंधरवडा हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. दि. १७ जून २०२४ रोजी दादर स्थानकाजवळ अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात ८०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ज्यात आरपीएफ कर्मचाऱ्यांचा ही सहभाग होता. यावेळी अंमली पदार्थ विरोधी ई-प्रतिज्ञापत्राचा प्रचार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ असणाऱ्या जागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे विशेष जनजागृती प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा व विशेष करून लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच प्रदर्शनात असणारा आग विझवणारा 'फायर रोबो' हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, असे मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात आले आहे.
कर्करोग... काही वर्षांपूर्वी फार क्वचित कानावर पडणारा हा शब्द हल्ली वारंवार कानी पडतो, वाचनात येतो. आपल्या कुटुंबात, आप्तेष्टांमध्ये, मित्रपरिवारामध्ये अमूक एका व्यक्तीला कर्करोग झाल्याची बातमी धडकते आणि आपल्याही मनात ‘मला तर कर्करोगाचे निदान होणार नाही ना’ हा विचार क्षणभर स्पर्श करुन जातो. तेव्हा, असा हा काही वर्षांपूर्वी फार अंतरावर वाटणारा कर्करोग आता मानवी जीवनशैलीच्या अगदी समीप येऊन ठेपलेला. परंतु, त्याविषयी सामान्यांना पुरेशी आणि शास्त्रीय माहिती नाही. तेव्हा, आज दि. ७ एप्रिल या ‘जागतिक आरोग्य दिना’नि
दैनंदिन जीवनात डिजिटल माध्यमांचा आपण प्रामुख्याने वापर करत असतो. डिजिटल माध्यमांचा वापर करत असताना अनेकदा सायबर क्राईम घडण्याची दाट शक्यता असते म्हणूनच विवा महाविद्यालयातील बीएएमएससी विभाग (मराठी) आणि इका फाऊंडेशन विरार यांच्या संयुक्त विद्यमाने बापूजी बाबाजी जाधव स्मारक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चांदिप येथे डिजिटल जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ फेब्रुवारी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या एमबीए व एमसीए च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचा निर्धार केला.
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या वतीने शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी 'दक्षता जागरूकता सप्ताहाअंतर्गत' 'वॉकेथॉन' आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता मुख्य दक्षता अधिकारी यू. दिनेश शानभाग यांच्या हस्ते या वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
“या जन्मी मनुष्य म्हणून जन्म मिळणे हे मागच्या जन्मीचेच पुण्य आहे. त्यातही या जन्मात भारतात हिंदू म्हणून जन्माला येणे हे त्याहून जास्त भाग्यच आहे. या कोवळ्या वयात आत्मभान, समाजभान असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी पालकांसह शाळेचेही मार्गदर्शन असतेच. आपल्या भोवती समाजात अनेक बर्या वाईट घटना घडत असतात. त्या घटनांची सत्य परिस्थिती दाखविण्याचे काम ‘संवाद आपल्या कन्यांशी’ या सभेमार्फत होत आहे, याचा विशेष आनंद आहे,” असे प्रतिपादन ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’चे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी के
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असलयाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
राजपक्षी कोकण किनाऱ्याचा
देखो 'मगर' प्यार से!
केळीच्या बागेत आपला परिवार वाढवणारे आणि वेड्या बाभळीच्या जंगलात अधिवास करणारे आमचे वाघ आहेत, जळगाव जिल्ह्यातील बागायतदार वाघांना अद्याप ओळख मिळालेली नाही. म्हणून जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी त्यांना ‘दारिद्य्ररेषेखालील बागायतदार वाघ’ म्हणतात. आता ‘मुक्ताई भवानी वन्यजीव अभयारण्य’ घोषित केल्याने या वाघांना रेशनकार्ड तर मिळाले, आता हे क्षेत्र संकटग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र घोषित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
नवी मुंबई महापालिकेने 'ग्रीन स्कूल' विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आता पर्यावरण अभ्यास हा केवळ एक विषय म्हणून शिकवला जाणार नाही. ही कल्पना 'नेदरलँड्स'मधील शाळांच्या संकल्पनेवर आधारित आहे. हा प्रकल्प येत्या नवीन शैक्षणिक वर्षातच जूनपासून चार शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.
‘फूड अॅण्ड न्यूट्रिशियन ऑर्गनायझेशन ऑफ युएन’ या संघटनेने जगाला आवाहन केले आहे की, ‘कोविड’च्या संकटकाळात अन्नाची नासाडी करू नका, गरजूंना अन्न वितरण करा. कारण, कोरोनामुळे कामधंदे ठप्प पडले आहेत. लोकांकडे पैसे नाहीत. नवा अन्नसाठा बाजारात उपलब्ध होण्यासाठीची परिस्थितीही आशादायक नाही. अन्नाच्या नासाडीसंदर्भातही या संस्थेने जागृती केली आहे.
केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिमसाठी अक्षय कुमारचा पुढाकार!
राणेबागेतील पेंग्विन कक्षाच्या पशुवैद्यक डॉ. मधुमिता काळे-वझे यांची मुलाखत
समाजकार्य करताना उपेक्षित, दुर्लक्षित, वनवासी बांधवांना आरोग्य, शिक्षणाच्या मूलभूत क्षेत्रात सर्वस्वी आधार देऊन त्यांच्या जीवनाला कलाटणी देणार्या प्रमोद नांदगावकर यांच्याविषयी...
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन व अमरावती येथील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ‘महा मतदार जागृती’ रथ फिरविण्यात येणार आहे.
मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे यासाठी राज्यात 'मतदार जागरुक मंच' स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये १८ हजारांहून अधिक व्यक्तींना मतदानाविषयी विविध माध्यमातून जागृती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. गोवर आणि रुबेलाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण करण्यात येईल.