घरातील हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, शिक्षणाची कास धरून साहाय्यक राज्यकर आयुक्तपदापर्यंत उत्तुंग झेप घेणार्या ज्ञानेश्वर धात्रक यांच्याविषयी...
Read More
शिवसेना सोडण्यापूर्वी राज माझ्याकडे आला आणि नाशिकची मागणी केली,” अशी आठवण खुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. "नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील,” असे बाळासाहेब नेहमी म्हणत. ते होते तोपर्यंत हे खरेही होते. मात्र, त्यांच्यापश्चात पक्षावर मांड ठोकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा बालेकिल्ला पूर्णपणे सुटला आहे. त्याचा पाया राज ठाकरे, तर कळस भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चढवण्याचे काम केले. आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने ना
नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उबाठा गटाचे नाशिकमधील महानगर प्रमुख विलास शिंदे हे नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप केला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला १५ दिवसांमध्ये नाशिकमध्ये दुसरा तडाखा बसला असून सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रभागातील ४ तर इतर ४ असे आठ नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह रविवार दि. २९ जून रोजी ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकमधील उबाठा गटाच्या अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
उबाठा गटाचे नाशिकमधील उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी फोन करत या कारवाईचे आदेश दिले. सुधाकर बडगुजर यांनी मंगळवार, ३ जून रोजी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता बुधवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे भूकंप होतो. ते प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला जातात आणि त्याठिकाणी विघटन होते, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उबाठा गटाचे नाशिकचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची बुधवार, ४ जून रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आता बडगुजर यांनी हकालपट्टीनंतर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उबाठा गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर हे पक्षात नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच उबाठा गटात भूकंप येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, २ जून रोजी नाशिक येथे श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा धमकीवजा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली असून शपथविधीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी आजपर्यंत अनेक खाती सांभाळली आहे. आता जे काही खाते मिळेल त्याप्रमाणे निश्चितपणे काम करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
prosperity journey of Nashik उद्योग आणि कृषी क्षेत्राचा उत्तम मिलाफ साधत मुंबई, पुण्यानंतर नाशिक वेगाने आपला विकास साधत आहे. इथल्या ग्रामीण भागानेही चांगलीच कात टाकायला सुरुवात केली असून द्राक्षे, टोमॅटो आणि कांदा पिकाने शेतकरी वर्गाला आर्थिक समृद्ध केले, तर मधल्या काळात आलेल्या अनेक उद्योगांनी नाशिकच्या विकासाची चाके गतिमान केली.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील केळी व्यापारी सुरेश त्र्यंबक नाईक यांनी एक अनोखे पाऊल उचलले. देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त व्हावा, या हेतूने त्यांनी पंतप्रधान मदतनिधीत १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश जमा केला आहे.
नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यात वनरवाडी गावात बुधवार दी.२३ एप्रिलच्या सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पायल चव्हाण २१ वर्षीय युवती शेतात गवत कापयचे काम करत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. कुणालाही काही समजायच्या आत बिबट्याने पायलला जवळपास 6 ते 7 फूट फरफटत नेले.
कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी यांचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (Nashik Ring Road) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी दिले. तसेच नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
nilesh deshpande nashik रांगोळीला ‘महारांगोळी’चे स्वरूप देऊन त्याला सामाजिक जनजागृतीची जोड देणार्या नाशिकच्या निलेश मधुकर देशपांडे यांच्याविषयी...
नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून काठे गल्ली येथील अनधिकृत सातपिर बाबा दर्गा हटवण्याची मोहिम मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री सुरु करण्यात आली. मात्र, यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना पोटदुखी सुरु झाल्याचे दिसते.
Rajendra Pahade Nashik खेळण्या-बागडण्याच्या वयात सुरू केलेल्या व्यवसायात अत्युच्च स्थान गाठत, इतरांचेही आयुष्य प्रकाशाने उजळून टाकणार्या नाशिकच्या राजेंद्र नेमिचंद पहाडे यांच्याविषयी...
मनुष्यातून कर्तृत्वसंपन्न आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी झटणारेनाशिक येथील ‘जागर मनाचा’ संस्थेचे संस्थापक शंतनू श्रीरंग गुणे यांच्याविषयी...
( 35 new flights from Nashik from tomorrow ) नाशिक येथून बुधवार, दि. २ एप्रिल रोजीपासून तामिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून देशातील या प्रमुख औद्योगिक शहरात अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दि. ३१ मार्च रोजीपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे. यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनी
(Beed District Jail) बीडच्या जिल्हा कारागृहात सोमवार दि. ३१ मार्चला वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते टोळीचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. कारागृहात गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर महादेव गितेसह आणखी चार जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. तसेच आता मकोका मधील आठवले टोळीतील आरोपींची रवानगीही नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशींनी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेचा लाभ घेतल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढे आणली होती. दरम्यान, आता या बांग्लादेशींविरोधात बुधवार, २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Preparations for Garud Rath in Nashik are in the final stages ) गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेबरोबरच नाशिककरांसाठी श्रद्धा, जल्लोष आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीराम रथ’ आणि ‘गरुड रथा’च्या मिरवणूक उत्सवासाठी ‘श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळा’ची नुकतीच शौनकाश्रम, पंचवटी येथे बैठक पार पडली.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी कायदा तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, २३ मार्च रोजी दिली. त्यांनी २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रत्येक शहराला आपली स्वतःची ओळख असते. ही ओळख जपत ते शहर मार्गक्रमण करत आपल्यापाशी असलेला पुरातन अनमोल ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. अशीच आपली पौराणिक आणि धार्मिक ओळख नाशिक शहराने जपली आहे. पेशवेकाळापासून सुरू झालेला रहाडींचा रंगोत्सव बदलत्या काळानुसार अधिक खुलत चालला असून येणारी नवीन पिढी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करीत आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून २० रहाडी असलेल्या नाशकात सध्या सात रहाडी अस्तित्वात आहेत. पुढील काळात सर्वच्या सर्व रहाडी खुल्या करुन नाशिकच्या या रंगोत्सवाला अधिक झळाळ
‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला आहे.
'अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा किनारा तुला पामराला' आज १० मार्च, कोलंबसचे गर्वगीत गाणाऱ्या कुसुमाग्रजांचा आज स्मृतिदीन. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य विश्वात स्वताचा वेगळा ठसा उमटवला. विष्णु वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव. नाशिक जवळच्या शिरवाडे या गावात त्यांचा जन्म झाला. शब्दांच्या माध्यमातून सुवर्णकाळ उभं करणाऱ्या कुसुमाग्रजांना त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने ओळख मिळवून दिली. ज्येष्ठ साहित्यीक विष्णु सखाराम खांडेकर अर्थात 'ययाति'कार खांडेकर यांनी विशाखा या क
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी दि. २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकं
धार्मिक शहर म्हणून असलेल्या Nashik city ची ओळख मधल्या काळात, ‘वाईन कॅपिटल’ म्हणून करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी करून पाहिला. परंतु, दिवसागणिक त्यातील फोलपणा उघडा पडून, शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटण्याचाच हा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यामुळे शेतकरी वर्गाने, वाईन उद्योगाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. त्यामुळे नाशकातला वाईन उद्योग बाळसे धरण्याआधीच मातील रुतला, तो परत कधीच वर आला नाही. आता नावाला चार-दोन कंपन्या आपले अस्तित्व धरून आहेत. यातून आपल्या पुरातन संस्कृतीची जपणूक करून, त्यातूनच आपला विकास साधणे क
ज्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्य उजळून निघाले असे विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जन्मभूमी असणारे शिरवाडे वणी हे गाव ' कवितांचे गाव ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी शालेय शिक्
मराठी भाषेला सातासमुद्रापार नेण्यास हातभार लावणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या नावाने त्यांच्या मूळ गावी शिरवाडे-वणी येथे कुसुमाग्रज महोत्सव होणार आहे. हा महोत्सव पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार असून तो दोन दिवस चालेल अशी घोषणा उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली.
प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभाचा समारोप होत असून अनेकांना ओढ लागलीये ती नाशिक येथे येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची... #Prayagraj #Nashik #Trimbakeshwar #SinhasthaKumbhmela #News #Hindu #Sanatan #MahaMTB
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी रक्तदानालाही तितकेच महत्त्व दिले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि सेवाकार्य मानणार्या नाशिकच्या भगवंता झिपरा राऊत यांच्याविषयी...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह नेत्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही ४९३ घरे २० टक्के सर्वसमावेश योजनेतील असून या घरांच्या सोडतीची साठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा महोत्सव असेल.
Employment-rich Nashik भारताला जगातील श्रेष्ठ अर्थव्यवस्था म्हणून प्रतिष्ठित करण्याचा उद्देश ‘स्वावलंबी भारत अभियाना’चा आहे. या अभियानाला नाशिकमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आतापर्यंत 2 हजार, 500 तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून सहकार्य करण्यात आले आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि अभियानाच्या नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुरू असलेल्या कार्याबाबत...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (दि. २४ जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मालेगावमध्ये विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. तसेच ते गोरेगावमध्ये एका परिसंवादातही सहभागी होणार आहेत.
नाशिक जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून महायुतीने महाविकास आघाडीला ( MVA ) धोबीपछाड दिल्यानंतर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मविआची नौका किनार्याला लागण्यापूर्वीच बुडण्याच्या मार्गावर आहे. एक-एक करुन मविआतील तिन्ही घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असून, उबाठा आणि काँग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. ज्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली, अशा उत्तम कांबळे यांचा मुलगा जॉय कांबळे यांनी नुकताच काँग्रेसचा ‘हात’ सोडत, हाती शिवबंधन बांधले. त्यांच्या पाठोपाठ ३० व
नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपला मिेळेल, असा विश्वास महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी व्यक्त केला. मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार, ११२ किमीचे अंतर अवघ्या ४४ दिवस, १७ तास, १५ मिनिटांत पूर्ण करुन, विश्वविक्रमाला साद घालणार्या शेतकरीपुत्र वैभव शिंदे याच्याविषयी... ( Tamaswadi Express )
५५ कोटी रुपयांचे कथित जमीन हस्तांतरण प्रकरण अंगलट आल्यानंतर, वैद्यकीय रजेवर गेलेल्या नाशिक मनपाचे ( Nashik Municipal Corporation ) तत्कालीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या जागी राज्य शासनाने त्यांचे उत्तराधिकारी म्हणून राहुल कर्डीले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. परंतु, एका दिवसातच हा निर्णय फिरवत ‘एनएमआरडीए’च्या मनीषा खत्री यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली. खत्री यांनी पदभार हाती घेतल्यापासूनच, रोज काही ना काही घडामोडी घडत आहेत. पहिल्या दिवसापासूनच ‘अॅक्शन मोड’वर आलेल्या खत्री, रोज नवीन निर्णय