सिंधुदुर्गातील तिलारीच्या खोऱ्यातून चतुराच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (maharashtra myristica swamp). या प्रजातीचे नामकरण 'मॅक्रोमिआ कान्हाराईंसिस', असे करण्यात आले असून मराठीत तिचे नाव 'राय भिंगरी' ठेवण्यात आले आहे (maharashtra myristica swamp). दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे गावातील दुर्मीळ 'मायरेस्टिका स्वॅम्प' परिसरातून या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. (maharashtra myristica swamp)
Read More
वन विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधून साडे अकरा फुटांच्या किंग कोब्रा सापाचा बुधवार, दि. १७ एप्रिल रोजी बचाव केला (king cobra dodamarg). दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातून या सापाचा बचाव करण्यात आला आहे (king cobra dodamarg). पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो. (king cobra dodamarg)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील तिलारीच्या खोऱ्यात हत्तीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे (sindhudurg elephant). याठिकाणी अधिवास करणाऱ्या हत्तीच्या मादीने गुरुवारी दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी पिल्लाला जन्म दिला (sindhudurg elephant). त्यामुळे तिलारी खोऱ्यात अधिवास करणाऱ्या हत्तींच्या संख्या सहा झाली आहे. (sindhudurg elephant)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधीव 'वाईल्डवन फिल्ड स्टेशन अॅण्ड नेचर स्टे'च्या आवरात दुर्मीळ 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन झाले आहे (tillari black panther). या आठवड्यात निसर्ग भ्रमंतीदरम्यान नेचर स्टेमधील कर्मचाऱ्यांना 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन झाले (tillari black panther). तिलारीचा हा संपूर्ण परिसर जैवविविधतेने संपन्न असून याठिकाणी दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ जीवांचा अधिवास आढळतो. (tillari black panther)
दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले (tiger in dodamarg). या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे (tiger in dodamarg). दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे. असे असूनही तालुक्याचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा मुद्दा अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे. (tiger in dodamarg)
जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींचे पुनरागमन झाले आहे (human-elephant conflict in sindhudurg). कोल्हापूरात काही काळ व्यस्थित केल्यानंतर हत्तींचा कळप पुन्हा कोकणात उतरला असून फळबागांमध्ये त्यांनी ठाण मांडले आहे. (human-elephant conflict in sindhudurg)
पर्यावरणाची आवड जोपासून त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार्या नॅचरलिस्ट आणि वन्यजीव छायाचित्रकार गजानन शेट्ये यांचा हा प्रवास...
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात चिघळलेल्या मानव-हत्ती संघर्षावर उतारा म्हणून ठोस उपाययोजनात्मक बाबी राबवण्याचे निर्देश वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले ( Sindhudurg elephant ). या प्रश्नासंबंधी भागधारकांची बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. बैठकीत उपस्थित गावकऱ्यांनी हत्ती पकड मोहिमेचा ग्राहक धरला, तर वन अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईमध्ये जलदपणा आणण्याच्या अनुषंगाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ( Sindhudurg elephant )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील उघाडे गावातून संरक्षण जाळीत अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या खवले मांजराची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
दोडामार्ग तालुक्याच्या पंतुरली गावात विजेचा शाॅक लागून एका गव्हा रेड्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणी गव्याला विजेचा शॉक देऊन ठार केलेल्या संशयित आरोपी ला कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतात घुसून सातत्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या असलेल्या पणतुलीं येथील सुनील भिकाजी गवस (वय ५१) याने या बाबतची माहिती वन विभागाला कळवली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागेतली केळी फस्त केली आहेत. गेले तीन दिवस मोर्ले गावात हत्तीचा मुक्काम असून गावातील केळी, काजू बागांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचे कुंपण तोडून हत्तींनी केळीच्या आणि काजू बागेत नुकसान केले आहे.
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात एक किंग कोब्रा मृत अवस्थेत आढळून आला आहे. वन विभागाला याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन या सापाला ताब्यात घेण्यात आले. या सापाचे डोके कोणी तरी ठेचल्याचे दिसून आले.
सिंधुदुर्गच्या तिलारी मधील केर-भेकुर्ली भागातून नाकाड्या चापडा ('हम्प नोज पिटवायपर') या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. तिलारीतील वन्य अभ्यासकांनी ही नोंद केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाचे ( sahyadri tiger ) छायाचित्र टिपण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. वाघाने शिकार केलेल्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये त्याचे छायाचित्र कैद झाले आहे. नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यातील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाच्या (sahyadri tiger) पावलांचे ठसे आणि त्याने केली शिकार आढळून आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थानने (डब्लूआयआय) केलेल्या पहिल्या सर्वेक्षणामध्ये वन्यजीवांच्या १९ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये दुर्मीळ प्राण्यांची नोंद करण्यात आली असून लवकरच हिवाळी सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सावंतवाडी आणि दोडामार्गमधील वाढती वृक्षतोड आणि लागवडीखाली जाणारी जमीन पाहता या क्षेत्राला पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी 'डब्लूआयआ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये जगातील सर्वात मोठा विषारी साप असणाऱ्या 'किंग कोब्रा' सापाला जीवदान देण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यात प्रथमच 'किंग कोब्रा' सापाच्या बचावाची घटना घडली आहे. पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो.
पश्चिम घाटामध्ये अधिवास करणार्या अनेक दुर्मीळ जीवांपैकी एक जीव म्हणजे उडणारा सरडा. साधारण मध्य आणि दक्षिण पश्चिम घाटामध्ये आढळणार्या या सरड्याची नोंद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातूनही करण्यात आली आहे. जाणून घेऊया या रहस्यमयी उडणार्या सरड्याविषयी...
सिंधुदुर्गातील आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाची पदचिन्ह आणि त्याने केलेली शिकार मिळून आली आहे. वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेल शरीर याठिकाणी आढळून आले आहे. या परिसरात नर वाघाचा वावर असल्याची शक्यता असून तिलारी, आंबोली आणि चंदगड परिसरातील राखीव वनक्षेत्रांना काॅन्झर्वेशन रिझर्व्हचा दर्जा दिल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित झाला आहे.