केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत केलेल्या घोषणेनुसारस, '७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३' मध्ये सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपट 'आत्मपॅम्फलेट' आणि 'नाळ २' या चित्रपटांना स्वर्ण कमळ पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.
Read More
एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली. विश्वचषकील प्रत्येक सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर झालेला पराभव भारतीय खेळाडूंच्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, अशा स्थितीतही भारतीयांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर केल्या आहेत. तर काही जणांना दुर्दैवाने कुणी त्यांना वाईट म्हणणारे मीम्स व्हायरल केले आहेत. परंतु, या सगळ्यात अभिनेता जितेंद्र जोशीने केलेल्या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत ही ओरड गेली अनेक वर्ष ऐकली जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'नाळ भाग २' या चित्रपटालाही याचा सामना करावा लागला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागाला अर्थात नाळ या चित्रपटाला २०१८ साली प्रदर्शनानंतर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, 'नाळ भाग २' च्या वाट्याला प्रेक्षकांनी गर्दी न केल्यामुळे हिरमोड झाला आहे. यावर आता अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपले मत मांडले आहे. आणि ज्याचे नशीब वाईट असेल त्याच्याच वाट्याला नाळ सारखे चांगले चित्रपट येत न
दिवाळी हा सण प्रत्येक माणसासाठी खास असतो. दिव्यांची रोषणाई, रांगोळीचे रंगीबेरंगी रंग, गोड-तिखट फराळाचा खमंग सुवास या सकारात्मक वातावरणात सर्व नकारात्मक विचार विरुन जातात. दिवाळीच्या अशाच आठवणींत अभिनेता जितेंद्र जोशी रमला. नुकताच त्याचा ‘नाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने महाएमटीबीशी संवाद साधताना बालपण जरी गरीबीत गेले असले तरी आमची प्रत्येक दिवाळी आमच्या आजीनी खास बनवली अशी आठवण सांगत जितेंद्र भावूक झाला.
६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेला मराठी चित्रपट ‘नाळ’ आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘नाळ भाग २’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे कथानक तर उत्तम आहेच, पण या चित्रपटातील प्रत्येक कलाकार आणि विशेषत: बालकलाकार म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांन
‘सैराट’ सारखा सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. विविध विषयांना आणि प्रामुख्याने गावाची नाळ ही प्रत्येक चित्रपटातून जपणाऱ्या नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एकीकडे मराठीत आपले स्थान बळकट करणाऱ्या मंजुळेंनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपट करत हिंदीत देखील दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले. आता पुन्हा एकदा हिंदीत नवी कलाकृती आणण्याच्या तयारीत नागराज मंजुळे आहेत अशी माहिती समोर येत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन खान यांनी गेली अनेक वर्ष आपल्या चाहत्यांसाठी दरवर्षी धमाकेदार चित्रपट घेऊन येत असतातच. यावर्षी किंग खान अर्थात शाहरुख खाने याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत, तर सलमान खानचा देखील आगामी ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. मात्र, यावेळी ‘टायगर ३’ ची टक्कर दोन जबरदस्त मराठी चित्रपटांसोबत होणार आहे. या आधीही अनेकवेळा हिंदी-मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जुगलबंदी झाली आहे.
'नाळ'च्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा घेऊन येत आहेत 'नाळ भाग २'. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाची प्रेक्षकांशी 'नाळ' जोडली गेली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपले नाव कोरले. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाने दिवाळीतही चित्रपटगृहात 'हाउसफुल्ल'चे बोर्ड झळकवले. चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण