( Disha Salian was murdered after being gang-raped Reinvestigate again Father Satish Salian files petition in High Court ) दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Read More
छत्तीसगड राज्यातील पत्रकार मुकेश चंद्राकरची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव हे सुरेश चंद्राकर आहे. पोलिसांनी एक विशेष पथक तयार करत आरोपी सुरेशला हैदराबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती स्वतः आयजी पी सुंदरराज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
विवाह समारंभात झालेल्या ओळखीतुन २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देत तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या स्वयंम सतीश परांजपे (३३) या तरुणाची कोयत्याने ३० वार करून निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी, कोपरी पोलिसांनी मयुरेश नंदकुमार धुमाळ (२४) याच्यासह पिडित तरुणीला अटक केली असुन त्यांच्याकडून धारदार कोयता आणि कटर हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना कोपरीतील अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीतील घरात घडला.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये गुफरान नावाच्या तरूणाने एका अल्पवयीन विद्यार्थ्यानीची चाकूने भोसकून हत्या केली. गुफरानने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर वार केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीला दुसऱ्या मुलासोबत पाहून गुफरानला राग आला, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. गुफरानला पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये ताजमहालच्या परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. रविवार, दि. १९ मे २०२४ येथील मशिदीच्या आवारात २२ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. दुपारी जेव्हा लोक नमाजासाठी आले तेव्हा मुलीचा मृतदेह लोकांना दिसला. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.
बिहारमधील पूर्णियामध्ये पोलिसांनी १५ वर्षीय तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले असून, त्याला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या मोहम्मद तय्यब आणि नजीर खान याला अटक केली आहे. या दोघांनी अल्पवयीन मुलीचा गळा चिरून मृतदेह झाडाला लटकवला होता. प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येतील आरोपी मोहम्मद तय्यबचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
तालुक्यातील मंगरूळ येथील एका इसमास प्रेमसंबंधाच्या संशयावरून जीवे ठार मारल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंगरूळ गावी घडली.