Indian People Solidarity with Palestine and Boycott Disinvestment movement were distributing leaflets in support of Palestine and anti-Israel in Pune दि. 8 मे रोजी ‘इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ आणि ‘बीडीएस’ (बॉयकॉट, डिसइन्व्हेस्टमेंट, सँक्शन्स) चळवळीचे कार्यकर्ते पुणे, कर्वेनगर येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनात आणि इस्रायलविरोधी पत्रके वाटून, इस्रायल तसेच ज्यूंच्या निषेधासाठी आवाहनही करत होते. पुणेकरांनी या लोकांना पुणेकरांचे अस्सल तर्कवादी देशनिष्ठ रंग दाखवले. देश, समाज आणि धर्मासंबंधी भारतीयांच्या
Read More
विकसित भारताचे स्वप्न पाहात देशभरात ‘पेटंट चळवळ’ वृद्धिंगत होण्यासाठी सातत्याने झटणार्या, नाशिकच्या डॉ. निलेश पावसकर यांच्याविषयी...
राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्यअध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे एका महिलेने जीव गमावल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयावर धडक मोर्चा काढला आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर चिल्लर पैसे फेकत निषेध व्यक्त केला.
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी तथाकथीत अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
"भारतामध्ये परिवर्तनाच्या चळवळी मध्यमवर्गाने सुरू केल्या होत्या, परंतु याच मध्यमवर्गाने आता या सामाजिक चळवळी गिळंकृत केल्या आहेत" असा दावा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला आहे. ज्येष्ठ लेखक अशोक बेंडखळे यांच्या ' ५१ नामवंतांची भाषणे' या पुस्तक प्रकाशानाच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवयित्री नीरजा, संधिकाल प्रकाशनाचे अरविंद जोशी, वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीचे विश्वस्त प्रमोद महाडिक आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर मध्यम वर्गावर टीका करताना पुढे म्हणाले की " पूर्वीच्या काळी
धर्मांतरणविरोधी चळवळ ते गावासाठी एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करणार्या, डहाणूच्या सावजी बीज यांच्याविषयी...
पाच लाख रुग्णांवर उपचार, एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया आणि दहा हजारांहून अधिक लॅसिक उपचार... २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम करणार्या डोंबिवलीच्या डॉ. अनघा अनिल हेरूर या खर्या अर्थाने नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कर्मयोगिनी ठरल्या आहेत. त्यांचा नेत्रदीपक प्रवास जाणून घेऊया....
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या दीर्घकालीन सत्तेला संपुष्टात आणले. जगभरातील काही माध्यमांनी याला ‘ऐतिहासिक’ आणि ‘लोकशाहीचा विजय’ म्हणून सादरही केले. पण, खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे की, हा लोकशाहीचा विजय होता की सत्तांतराच्या प्रयोगाचा एक भाग? आणि हे विद्यार्थी नेते, ज्यांना आत्तापर्यंत ‘क्रांतीचे नायक’ म्हणून गौरवले जात होते, ते खरोखरच देश चालवण्याइतके सक्षम आहेत का? ‘नाहिद इस्लाम’ या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून सक्रिय राज
मुंबई : "मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार" असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
सिडको कार्मिक विभागाच्या प्रधान व्यवस्थापक प्रमदा बिडवे यांनी जारी केलेले परिपत्रक दैनिक मुंबई तरुण भारतच्या हाती लागले आहे.
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या ( Shree Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती आता अवघ्या काही दिवसांवर. अयोध्येचा लढा हा काही फक्त एका मंदिरासाठीचा लढा नव्हता, या लढ्याला अनेक कंगोरे होते. या यशस्वी लढ्यातून भारतीयांनी काय कमावले, त्यासाठी किती संघर्ष केला, याविषयी भाष्य करणार्या ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे परीक्षण...
श्यामबाबूंनी ( Shyam Benegal ) ज्या काळात ते सिनेमे केले आहेत, त्या काळाच्या कसोटीवर ते सिनेमे खरे उतरले आहेत, या दृष्टीने त्यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
मुंबई : “भारतात स्वातंत्र्याच्या काळापासून सहकार ( Cooperative ) चळवळीची भूमिका महत्त्वाची आहे. सद्यस्थितीत सहकाराची सीमा केवळ भारत नाही, तर संपूर्ण विश्व असायला हवी आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. पृथ्वीचा ढासळत चाललेला समतोल वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘सहकार भारती’चे आठवे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर येथे होत आहे. त्यावेळी अधिवेशनाच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते.
मुंबई : “इव्हीएम ( EVM ) मशीनविरोधात आंदोलन करणे, हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला विरोध आहे. जनतेने विचार करून महायुतीला निवडून दिले आहे. त्यांना तुम्ही एवढे अडाणी कसे समजू शकता?” असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी आपल्या ’एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
नवी दिल्ली : भारताने मंगळवारी एक निवेदन जारी करून संत चिन्मय दास ( Chinmay Das ) यांची अटक आणि जामीन नाकारल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचप्रमाणे बांगलादेशला सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
पेसा भरती आंदोलनात MP Dr.Hemant Savara यांची महत्वाची भूमिका
कॅनडामधील हिंदू समाजला वेळोवेळी त्रास देण्याचा चंग तिथल्या सरकारने बांधला आहे की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कॅनडा मधील हिंदू समाजातील लोकांना काही खलिस्तानी फुटीरतावादी लोकांकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. अशातच, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या सरकार आणि पोलिसांवर आहे, त्या पोलिसांनीच आता सामान्य हिंदू नागरिकांकडून खंडणी मागण्याचे काम सुरू केले आहे. सुरक्षा हवी असेल, तर ७०,००० डॉलर्स द्या अशी मागणी या पोलिसांनी केली आहे.
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कॅनडाचा चांगलाच समाचार घेतला आहे. जयशंकर म्हणाले की " काल ज्या प्रकारे हिंदू मंदिरावर जो हल्ला झाला तो चिंताजनक आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याच बरोबर भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर पाळत ठेवणे ही बाब सुद्धा असभ्य होती. कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर न करता भारतावर आरोप करायचा हे आता कॅनडा सरकारचे धोरणच होऊन बसले आहे."
कॅनडामध्ये हिंदू मंदिरातील भक्तांवर खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता ब्रॅम्प्टन मधील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता समाज माध्यामांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मध्ये एक पुजारी तिथल्या भक्तांना "बटेंगे तो कटेंगे"चा संदेश देताना दिसत आहेत. जात, धर्म, विचारधारा या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संघर्षाचे नवे अध्याय दिवसेंदिवस निर्माण होत असतानात आता एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना एका घटनेचा गौप्यस्फोट केला आहे. कॅनडामध्ये असताना काही खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामधून मी थोडक्यात बचावलो. भारताच्या आणि भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील झालेल्या बेबनावाला पूर्णपणे जस्टिन ट्रूडो जबाबदार असून, ट्रूडो हे खलिस्तानी प्रोपोगंडाचा प्रचार करत आहेत असे जाहीर विधान पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे. ट्रूडो यांना केवळ शीखांची मतं मिळवायची असून, जाणीवपूर्वक खलिस्तानी लोकांना फूस लावली जात आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडवल्यानंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या समोर आता नवीन आव्हान उभे राहिले आहे. ट्रूडो यांच्याच पक्षातील खासदारांनी त्यांना २८ ऑक्टोबरच्या आत राजीनामा द्यायला सांगितला आहे. खासदारांचा हा सल्ला ट्रूडो यांनी मान्य केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांच्याच पक्षातील लोकांनी दिला आहे.
(India-Canada Diplomatic Row)हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे पुन्हा भारतावर बिनबुडाचे आरोप करत, भारताच्या कॅनडामधील राजदूतांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताने कॅनडातील उच्चायुक्त आणि सर्व अधिकार्यांना पुन्हा मायदेशी बोलावले आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण तयार झाल्याचे दिसून आले आहे. भारताने कॅनडामधील राजदूतांना आणि उच्चपदस्थ अधिकारी यांना मायदेशी बोलवण्यात आले आहे.
जागतिक मुस्लीम समुदायाचे हित साधण्याची जबाबदारी एकमेव आपल्याच खांद्यावर असून, ती पूर्ण करणे म्हणजे धर्माचे काम करणे आहे, अशा आविर्भावात कायम वावरणार्या पाकिस्तानचे इस्लामशी असलेले प्रेम किती बेगडी आहे, हे आज पाहूया!
भारतात सणासुदींच्या काळात मोठ्या प्रमाणात जाहिरातींवर खर्च केला जातो. या जाहिराती बहुतेकवेळा हिंदूंच्या सणांबाबतच असतात. मात्र, त्यामध्ये काम करणारे कलाकार हिंदू धर्मियांच्या धार्मिक वैशिष्ट्यांबाबत उदासीन असतात. त्यामुळेच यांना वठणीवर आणण्यासाठी ‘नो बिंदी, नो बिझनेस’ मोहीम राबविली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.
धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक संजय भालेराव यांनी धारावीतील सर्वेक्षण प्रक्रिया ही आदर्श निवडणूक आचासंहितेचा भंग करून सुरू करण्यात आली असून त्याला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दि. ८ जून रोजी होणाऱ्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. जरांगे पाटलांकडून सुरुवातीला ४ जून रोजी उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण आचारसंहितेमुळे ४ जून रोजी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर जरांगेंनी ८ तारखेला उपोषणाला बसणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता ८ जूनला ही त्यांना उपोषणाला परवानगी देण्यात आलेली नाही.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या एक हजार ६९४ झोपड्यांतील रहिवाशांची पात्रता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यांची प्रारूप यादी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर अन्य झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता त्यांचीही प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 'एसआरए'कडून येत्या काही महिन्यांत ही प्रारूप यादी जाहीर केली जाईल.
दि. १ मे १९६० या दिवशी मराठीला एक स्वतंत्र ओळख मिळाली. तोवर मराठीचा वापर, तिचा उपयोग व्यवहारात होता, परंतु भाषेला म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती. भाषेला जेव्हा सत्तेची जोड असते, तेव्हा तिचा पैस, तिचा विस्तार चौखूर उधळतो. शिवकालापासून ते पेशवाईपर्यंत मराठीने हिंदुस्थानावर राज्य केले. होळकर, शिंदे, पवार अशा नावांच्या आधाराने तिने धार, इंदूर, माळवा, दिल्लीपर्यंत मजल मारली. त्यानंतर फंदफितुरी, लाचारी बळावली आणि फिरंगी भाषेचा कराल मेघ हिंदुस्थान ग्रासून राहिला. स्वातंत्र्य मिळवलं. आता सत्तेची परिभाषा बदलली होती. भ
शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हरियाणा पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आणि बॅरिकेड्स तोडणाऱ्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट आता रद्द करण्यात येणार आहेत. हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर अशांतता पसरवणाऱ्यांवर पोलीस मोठी कारवाई करणार आहेत. अशा हल्लेखोरांची ओळख पटली आहे.
अहिंसक मार्गांनी सुरु झालेल्या मराठा आंदोलनाला यापूर्वीच हिंसक वळण लागले. आंदोलनाचे नेतृत्व करणार्या जरांगेंच्या तोंडी ‘माझ्यावर गोळ्या झाडा’, ‘माझा बळी घ्या’ अशी आत्मघातकी भाषा आली. उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात त्यांनी केलेली जातीयवादी अश्लाघ्य शेरेबाजी तर महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारीच! अशा या ‘रांगेचाच नेता’ ठरलेल्या जरांगेंमुळे नेमके हे आंदोलन कशासाठी सुरु झाले? आणि आज हे आंदोलन कुठे जाऊन थांबले आहे? हेच कळेनासे झालेले दिसते.
मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार विरोधी पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) वर प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे. झेडपीएम सध्या २९ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट फक्त ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ३ आणि काँग्रेस अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.
मिझोराममध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास ३० ते ३५ वर्षांनी परिवर्तन झाले मणिपूर हिंसाचाराची छाया दिसून आली. राज्यात काँग्रेसला अवघी एक १ जागा मिळाली आहे. त्याचवेळी मिझो नॅशनल फ्रंटचा (एमएनएफ) एकछत्री अंमल संपून जोरम पीपल्स मुव्हमेंटचा (झेडपीएम) सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चिघळला असून त्याने आता हिंसक रुप धारण केले आहे. राज्यभरातील मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुढे येत आहे. यातच आता मुंबईत मराठा आरक्षणासाठी मुंडन आंदोलन करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासाठी आता राज्यभरात आंदोलन करण्यात येत असून मंगळवारी धाराशिवमध्येही मराठा संघटनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा कळवा विभागाच्या व्हॉल्वमन कर्मचार्याना ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्याचे वेतन अद्यापही अदा केलेले नाही. म्हणून काम बंद न करता कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असुन कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
महात्मा गांधींवरील आरोप किंवा मतभेद गृहीत धरूनही स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. प्रामुख्याने त्यांनी चळवळीला जे भारतीय अधिष्ठान दिले, त्यामुळे त्या योगदानाला झळाळी प्राप्त होते. त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या या योगदानाचा मागोवा घेणे औचित्याचे ठरावे.
ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज २९ सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी २ वाजता ही बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
"जनतेच्या सहभागातून होणारी सहकाराची चळवळ यशस्वी होते याचे अमूल उद्योग समुह हे मोठे उदाहरण आहे. भारताचे सहकाराचे मॉडेल मानव केंद्रित असून मोदी सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेसह अर्थकारणाला मोठी गती दिली आहे. देशात कृषी विभागातून सहकार विषयाला वेगळे करत सहकार क्षेत्रात प्राण फुंकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे," असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलनादरम्यान पोलीसांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी त्यानंतर लाठीचार्ज केला. यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. मात्र, जालन्यात नेमकं काय घडलं? याची सुरुवात कुठून झाली? या प्रश्नाचा घेतलेला हा आढावा.
कंत्राटी कामगारांना बेस्टच्या कामगारांसारख्या सुविधा द्याव्यात, बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करावा आदी विविध मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज बुधवार (२ ऑगस्ट) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम बेस्टच्या वाहतुकीवर झाला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.
बारावीमध्ये तीनदा अपयशी ठरल्यानंतरही ते खचले नाही. नव्या उमेदीने उभे राहत ते रंगभूमीच्या सेवेसह रिक्षाचालक म्हणून हजारो लोकांना वाचनाचे महत्त्व पटवून देत आहेत. जाणून घेऊया प्रशांत प्रकाश कांबळे यांच्याविषयी.
मुंबई : मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे बुधवार दिनांक २१ जून रोजी मुंबई महानगरातील २४ प्रभागातील शिव योगा केंद्रांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात ‘फिट मुंबई’ चळवळ अंतर्गत विविध स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बंदर विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. बंदरांचा विकास करून त्याद्वारे जलमार्गांद्वारे होणारा व्यापार वाढविणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक ‘इकोसिस्टीम’ तयार करण्यासही प्राधान्य दिले जात आहे.
ठाणे : १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली होती. धरपकडीचे सत्र सुरू होते. झांशीमधील एका मराठी कुटुंबाने आम्हाला राहण्यासाठी आसरा दिला, अशी आठवण आ. संजय केळकर यांनी सांगितली. अयोध्येला ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक रवाना झाल्यानंतर त्यांना आ. संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ३४ वर्षांपूर्वीच्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली.
अशोकराव चौगुले यांनी डाव्या मंडळींच्या विचारांची/लेखनांची केवळ चिरफाडच केलेली नाही, तर ती करीत असताना त्यांनी कधीही युक्तिवादाच्या नियमांना फाटा दिलेला नाही. ज्याची मांडणी करायची ती तार्किक करायची, आपल्या प्रतिपादनासाठी पुरावे द्यायचे. प्रतिपक्षाच्या प्रतिपादनातील विसंगती उघड करायच्या. त्यांच्याच प्रतिपादनातील अंतर्विरोध स्पष्ट करायचा. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांच्यापुढे नवीन प्रश्न ठेवायचे आणि त्याची उत्तरे त्यांच्याकडून मागायची ही अशोकरावांनी अवलंबलेली पद्धती होती. खर्या अर्थाने ते एक बौद्धिक योद्
ठाणे : सण-उत्सवाच्या माध्यमातुन संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच ज्ञानदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ सुरु केली आहे. ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात गुरुवारी (दि.६ एप्रिल रोजी) हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात अतिथी भाविकांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.